Saturday, September 5, 2020

रेल्वेकडून 1 लाख 40 हजार रिक्त पदांसाठी डिसेंबरमध्ये परीक्षा होणार1 lakh 40 thousand vacancies from Railways The exam will be held in December


रेल्वेकडून 1 लाख 40 हजार रिक्त पदांसाठी
डिसेंबरमध्ये परीक्षा होणार.



 ठळक बाबी


➡️केंद्र सरकारच्या कुठल्याही सरकारी नोकरीवर बंदी किंवा रोख लावण्यात आलं नसल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

➡️केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात येणाऱ्या एसएससी, युपीएससी, रेल्वे भरती किंवा पोस्ट भरती यांसह इतरही भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबविण्यात येणार आहे.

➡️रेल्वेनेही तब्बल 1,40, 640 रिक्त पदांसाठी लवकरच परीक्षा घेणार असल्याचे घोषित केले आहे.

➡️लवकरच या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले जाणार आहे.

➡️अर्थ विभागाने 4 सप्टेंबर रोजी काढलेले परिपत्रक हे पदांच्या निर्मित्तीसाठीच्या अंतर्गत प्रक्रियेचा भाग असून भरती प्रक्रियेशी त्याचा संबंध नसल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

➡️15 डिसेंबर 2020 पासून रेल्वेच्या रिक्त जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.


➡️भारतीय रेल्वेकडून रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते.

➡️कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन पडल्याने या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या

➡️मात्र, रेल्वेने डिसेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येतील, असे सांगितले आहे.

➡️15 डिसेंबर 2020 पासून रेल्वेच्या रिक्त जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. 

➡️देशभरातील 1,40,640 जागांसाठी रेल्वेकडे तब्बल 2.42 कोटी अर्ज आले आहेत.

➡️ अर्जांची छाननीप्रक्रिया पूर्ण झाली असून ही परीक्षा संगणकीकृत असणार असल्याची माहिती आहे

➡️रेल्वेकडे तीन श्रेणींसाठी हे अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामध्ये एनटीपीसीसाठी (तांत्रिक नसलेल्या, गार्ड, लिपीक, क्लर्क) 35,208 जागा रिक्त आहेत तर, 1663 जागा मंत्रालयीन स्तरावर आहेत उर्वरीत 1,03,769 जागा ( ट्रॅकमन, सफाई, पॉईँटमन) यांसाठी आहेत.

➡️. परीक्षा घेण्यासाठी विशेष सूचना व नियमावली तयार करण्यात आली आहे कोरोना लॉकडाऊन, सामाजिक अंतर पालन करुनच या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.


                                      संकलन : - लोकसत्ता न्युज पेपर
            
---------------------------English-------------------------------


1 lakh 40 thousand vacancies from Railways
The exam will be held in December.




 Highlights

The Union Finance Ministry has clarified that no ban has been imposed on any government job.

 Other recruitment processes including SSC, UPSC, Railway Recruitment or Post Recruitment conducted by the Central Government will be implemented as before.

Railways has also announced that it will soon conduct examinations for 1,40,640 vacancies.

The schedule of these examinations will also be announced soon.

The Finance Ministry has clarified that the circular issued by the Finance Department on September 4 is part of the internal process for the creation of posts and has nothing to do with the recruitment process.

Equest for Railway Vacancies will be conducted from 15th December 2020.

Applications were invited from Indian Railways for the vacant posts.

Exams for these posts were canceled due to lockdown due to Acorona epidemic

However, the Railways has said that the exams will be held in December.

Equest for Railway Vacancies will be conducted from 15th December 2020.

Railways has received 2.42 crore applications for 1,40,640 seats across the country.

 Scrutiny of applications has been completed and it is learned that this examination will be computerized

Railways has received these applications for three categories of which 35,208 posts are vacant for NTPC (Non-Technical, Guard, Clerk, Clerk), 1663 posts are at Ministry level and the remaining 1,03,769 posts are for Trackman, Cleaning, Pointman.

. Special instructions and rules have been prepared for taking the exam.

                 Compilation: - Loksatta News Paper
            


IBPS recruitment 1557 + vecancy - IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती


   ➡️  IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती ⬅️


           Mega recruitment of ‘Clerk’ post through IBPS

    
एकूण जागा : - 1557+ जागा 
       
पदाचे नाव : - लिपिक  ( clerk )

शैक्षणिक पात्रता : - 1. कोणत्याही शाखेतील पदवी. 2. संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वय मर्यादा : - 01 सप्टेंबर 2020 रोजी 20 ते 28 वर्षे  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण : - संपूर्ण भारत

फी : - जनरल/ओबीसी : ₹850/-   (SC/ST/PWD/ExSM: ₹175/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : - 23 सप्टेंबर 2020

परीक्षा

पूर्व परीक्षा : -5 , 12 , 13 डिसेंबर 2020

मुख्य परीक्षा  : - 24 जानेवारी 2021


परीक्षेचे वेळापत्रक : - 


महत्वाची सूचना : - उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पाहूनच अर्ज करावे.

महत्त्वाचे वेब पेज.                                                             

मूळ जाहिरात.                                                                   

ऑनलाइन अर्ज                                                                  

अधिकृत वेबसाईट                                                             


Current events 5 september 2020 - चालू घडामोडी सुपरफास्ट दिनांक 5 सप्टेंबर 2020


चालू घडामोडी~ सुपरफास्ट~ दिनांक 5 सप्टेंबर 2020




➡️2 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत “राष्ट्रीय नागरी सेवा क्षमता विकास कार्यक्रम” (NPCSCB) राबविण्यासाठी मंजुरी दिली गेली.

➡️हा निर्णय भारत सरकारच्या नव्या “मिशन कर्मयोगी” या अभियानाच्या अंतर्गत घेण्यात आला आहे. 

➡️भारताने जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (WIPO) ‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020’मध्ये 48 वा क्रमांक मिळवलेला आहे.

➡️मध्य आणि दक्षिण आशियायी देशात भारत पहिल्या क्रमांकावर आहे.

➡️गरीब देशांमध्ये भारत जगातला तिसऱ्या क्रमांकाची नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्था आहे.

➡️स्वित्झर्लंड हा देश GII 2020 याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.


➡️ स्वीडन द्वितीय तर अमेरिका हा देश तृतीय क्रमांकावर  आहे.

➡️जनता दल-यूनायटेड (JD-U), बिहार हा देशातला पहिला राजकीय पक्ष ज्याने स्वतःचे बहू-कार्ये डिजिटल  संकेतस्थळ तयार केले.

➡️भारतीय रेल्वे मंडळाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी  व्ही. के. यादव आहेत.

➡️भारतीय वास्तुविद्या संस्था (IIA) या संस्थेच्यावतीने दिला गेलेला वर्ष 2020 साठी ‘बाबुराव म्हात्रे सुवर्ण पदक’ जिंकणारा व्यक्ती एस. गोपाकुमार आहेत.

➡️केरळस्थित साऊथ इंडियन बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मुरली रामकृष्णन यांची निवड झाली.

➡️आतापर्यंतचा पहिला "इंटरमीडिएट मास" कृष्णविवर, ज्याचे वजन आपल्या सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 142 पट जास्त आहे  GW190521.


➡️भारतीय रेल्वे संघाकडून सलग ११ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व केलेले महाराष्ट्रातील अमर पवार (७१ वर्षे) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

➡️रिलायन्स जिओ इन्फ्राटेल कंपनीच्या वायरलेस इन्फ्रास्ट्रक्चरच्या (मोबाइल टॉवर्स) २५,२१५ कोटी रुपयांच्या विक्रीसाठी भारत सरकारनं ब्रुकफिल्ड असेट मॅनेजमेंटला मंजुरी दिल्याचं वृत्त आहे.

➡️रशियाने विकसित केलेली आणि मंजुरी दिलेली ‘स्पुटनिक व्ही’ ही करोनावरील लस प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. 

➡️भारतीय नौदल आणि रशियाचे नौदल यांचा 11 वा द्वैवार्षिक संयुक्त सागरी सराव 4 आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आला आहे.

➡️“इंद्रा नेव्ही-20”चा मुख्य उद्देश दोन्ही नौदलामधले आंतर-संचालन अधिक दृढ करणे आणि बहु आयामी सागरी अभियानासाठी आकलन आणि पद्धती विस्तृत करणे हा आहे.

➡️‘बँकिंग नियमन अधिनियम-1949’च्या अंतर्गत 27 जुलै 2020 पासून ही बँकिंग कंपनी बंद झाली - आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक.

➡️कॅनेडियन स्पेस एजन्सीची प्रथम महिला अध्यक्ष - लिसा कॅम्पबेल

➡️भारत आणि हा देश यांच्या भागीदारी अंतर्गत दाऊकंडी-सोनमुरा (त्रिपुरा) अंतर्देशीय जलमार्ग शिष्टाचार मार्ग कार्यरत झाला - बांगलादेश.


➡️आदिवासी कल्याण मंत्रालय आणि भारतीय लोक प्रशासन संस्था (IIPA), नवी दिल्ली या संस्थांमध्ये या शहरात राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्था (NITR) उभारण्यासाठी करार झाला - नवी दिल्ली.

➡️पोलीस ठाण्यात स्वयंचलित ट्रान्सक्रिप्शन सिस्टमद्वारे केस डायरी लिहिण्यास प्रारंभ करणारा भारतातला पहिला राज्य पोलीस विभाग - बिहार.

➡️महाराष्ट्र सरकारने या शहरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील आरे मिल्क कॉलनीतली 600 एकर भूमी राखीव वन म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला - मुंबई.

➡️मुलींचे शिक्षण आणि आरोग्य सुधारण्यासाठी या राज्य सरकारने मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना लागू केली आहे - उत्तरप्रदेश

➡️आसाम सरकारची स्वयंरोजगार योजना - स्वामी विवेकानंद आसाम युवा सशक्तीकरण (स्वयम) योजना.

Police Bharti Online Free Test 37- महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाइन फ्री टेस्ट - 37

Police Bharti Online Free Test 37 महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाइन फ्री टेस्ट - 37 चालू घडामोडी 2020 प्रश्नांचा समावेश

Friday, September 4, 2020

Police Bharti Online Free Test - 4 Sub - Marathi - पोलीस भरती ऑनलाईन सराव पेपर क्र. 4 विषय - मराठी व्याकरण


Police Bharti Online Free Test- 4
Sub - Marathi

महाराष्ट्र पोलीस भरती 2020 ऑनलाईन फ्री
सराव पेपर क्रमांक 4 विषय मराठी व्याकरण





Current event's 4 September 2020चालू घडामोडी ~ सुपरफास्ट ~ दिनांक 4 सप्टेंबर 2020


                      चालू घडामोडी 

                      ~ सुपरफास्ट ~

                     दिनांक 4 सप्टेंबर 2020




✒️भारताचा टेनिसपटू सुमित नागल याने US OPEN टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत विजय मिळवला. 

✒️लिआँने वोल्फ्सबर्गने युरोपियन फुटबॉलवरील आपले वर्चस्व  पुन्हा एकदा सिद्ध करताना महिलांच्या चॅम्पियन्स लीग फुटबॉलचे सलग पाचव्यांदा विजेतेपद  मिळवले.

✒️लॉकडाउन शिथिलीकरणाच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पास सक्ती रद्द करण्यात आल्यानंतर आता मध्य रेल्वेनेही राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु करण्याला परवानगी दिली आहे. 

✒️राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग उद्यापासून (२ सप्टेंबर २०२० पासून) सुरू होत असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केलं आहे. यासंदर्भातील एक पत्रक मध्य रेल्वेने जारी केलं आहे.

✒️बहुप्रतिक्षित IPL 2020ची अधिकृत घोषणा BCCIने ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच केली. 

✒️युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे.तर स्पर्धेचा अंतिम सामना 10 नोव्हेंबरला  खेळवण्यात येणार आहे हेदेखील स्पष्ट करण्यात आले.

✒️ड्रीम 11ला यंदाचे टायटल स्पॉन्सर्स जाहीर  करण्यात आले.

✒️2 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत “राष्ट्रीय नागरी सेवा क्षमता विकास कार्यक्रम” (NPCSCB) राबविण्यासाठी मंजुरी दिली गेली.

✒️पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक मनुष्यबळ परिषद
क्षमता विकास आयोग

✒️डिजिटल मालमत्ता मालकी आणि परिचालन तसेच ऑनलाइन

✒️प्रशिक्षणासाठी तंत्रज्ञान मंचासाठी विशेष प्रयोजन कंपनी (SPV).

✒️कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली समन्वय मंडळ 

✒️कार्यक्रमाची मुख्य मार्गदर्शक तत्वे.

✒️पंतप्रधान केअर 2019 -2020 च्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालात पंतप्रधान मोदींनी 2.25 लाखांचा निधी दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

✒️ तसेच पीएम केअर्स निधीला स्थापनेपासून केवळ पाच दिवसांमध्ये 3076.62 कोटी रुपये ऐच्छिक देणगीच्या रुपात जमा झाल्याचा उल्लेख यात करण्यात आला आहे. 




Police Bharti Online Free Test -36 - पोलीस भरती ऑनलाईन सराव पेपर 36


पोलीस भरती ऑनलाईन सराव पेपर क्रमांक 36



Police Bharti Online Free Test- 35

Police Bharti Online Free Test -34

Police Bharti Online Free Test - 33

Police Bharti Online Free Test - 32

Thursday, September 3, 2020

Police Bharti Online Free Test -35 - महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाईन फ्री टेस्ट -35


Police Bharti Online Free Test -35 

महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाईन फ्री टेस्ट -35

           जय हिंद मित्रांनो
आज आपण पोलीस भरती 2020 ऑनलाईन फ्री टेस्ट - 35 घेणार आहोत. आपण दिलेल्या प्रतिसादामुळे आणखी नवनवीन टेस्ट सिरीज घेणार आहोत.मित्रांनो पोलीस भरती ही ऑनलाइन होणार आहे त्यामुळे आपलं ऑनलाईन परीक्षा देण्याची सराव होण खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे परीक्षा मध्ये आपलं नक्कीच फायदा होणार आहे.



Super fast current events 3 September 2020 - सुपरफास्ट चालू घडामोडी दिनांक 3 सप्टेंबर 2020

MPSC | PSI STI ASO | पोलीस भरती | जिल्हा परिषद |  तलाठी| ग्रामसेवक | रेल्वे | स्टाफ सिलेक्शन कमिशन | बँक |सर्व स्पर्धा परीक्षा


सुपरफास्ट  चालू घडामोडी  दिनांक 3 सप्टेंबर 2020


महत्त्वाचे चालू घडामोडी


✒️ भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी विश्वातल्या आतापर्यंतच्या सर्वात दूरवरच्या आकाशगंगेचा शोध लावून या अंतराळ शोध क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. (शास्त्रज्ञांनी त्याला ‘AUDFs01’ असे नाव दिले आहे.)

✒️इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स म्हणजेच आयुका या पुण्याच्या संस्थेच्या एका शास्त्रज्ञांच्या पथकाने डॉ कनक साहा यांच्या नेतृत्वाखाली या आकाशगंगेचा शोध लावला आहे.

✒️अॅस्ट्रोसॅट (ASTROSAT) ही 1513 किलो वजनी भारताची पहिली समर्पित बहू-तरंगी अंतराळ वेधशाळा आहे.

सुपरफास्ट चालू घडामोडी 2 सप्टेंबर 2020


✒️ पुन्हा एकदा सरकारनं ११८ अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्वांमध्ये क्रेझ असलेल्या पबजी या गेमचाही समावेश आहे.

✒️रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचं नाव जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामिल करण्यात आलं आहे.

✒️आता त्यांची मुलगी ईशा अंबानी आणि मुलगा आकाश अंबानी यांना फॉर्च्युनच्या '४० अंडर ४०' या यादीत स्थान देण्यात आलं आहे.

✒️दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने वापरलेल्या ‘एनिग्मा मशीन’चे रहस्य उलगडून युद्धाचा निकाल हिटलरविरोधात लागण्यात सिंहाचा वाटा असलेल्या अॅलन टय़ुरिंग यांची ओळख ‘संगणकशास्त्राचे जनक’ अशी आहे.

✒️चीनकडे जगातील सर्वात मोठे नौदल, युद्धनौकांमध्ये अमेरिकेला टाकलं मागे.

सुपरफास्ट चालू घडामोडी 1 सप्टेंबर 2020


✒️राज्याच्या गृहविभागाकडून २५ अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

✒️रजनीश सेठ यांनी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

✒️भारतीय रिझर्व्ह बँकेनी योजनेवर स्पष्टीकरण नसल्यामुळे ही योजना 6 सप्टेंबर 2020 रोजी 1 सप्टेंबर 2020 पासून संपुष्टात आणली – ऋण अधिस्थगन योजना.

✒️आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) याचे पहिले मुख्य अर्थशास्त्रज्ञ - एरिक बर्गलोफ (स्वीडिश).

✒️भारत, जापान आणि या देशाने हिंद-प्रशांत क्षेत्रात एक लवचिक पुरवठा साखळी तयार करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे - ऑस्ट्रेलिया.

✒️मर्कम कॅपिटल संस्थेनी तयार केलेल्या जागतिक सौर कंपन्यांच्या ताज्या क्रमवारीनुसार, कार्यकारी सौर प्रकल्पांच्या बाबतीत प्रथम क्रमांकाचे जागतिक सौर ऊर्जा निर्मिती संपदा मालक - अदानी ग्रुप (इंडिया).

✒️भारताचे पहिले डेटा सेंटर आणि इंटरकनेक्शन प्रदाता जे ओपन क्लाउड एक्सचेंज सेवा प्रदान करतात - GPX.

✒️भारत सरकारने या संस्थेत एक “AVGC (अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक सेक्टर) सेंटर फॉर एक्सलन्स” आणि औद्योगिक संरचना केंद्र विकसित करण्याची योजना आखली आहे – भारतीय तंत्रज्ञान संस्था,

✒️भारतातली पहिली महिला रुग्णवाहिका चालक – एम. वीरलक्ष्मी (तामिळनाडूमध्ये).

✒️भारत सरकारच्या ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2020’चे विजेता - हवाई दल क्रिडा नियंत्रण मंडळ.
_________________________________________________

Wednesday, September 2, 2020

Police Bharti Online Free Test -09 - पोलीस भरती 2020 ऑनलाईन फ्री टेस्ट -09 विषय - सामान्य ज्ञान

पोलीस भरती ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका क्र.09

विषय - सामान्य ज्ञान


Chalu ghadamodi 2 September 2020 - चालू घडामोडी सुपरफास्ट दिनांक 2 सप्टेंबर 2020



  चालू घडामोडी सुपरफास्ट दिनांक 2 सप्टेंबर 2020




महत्वाची चालू घडामोडी



✒️श्रीगरमधील दहशतवाद्यी कारवायांच्या बिमोड करण्यासाठी आता सीआरपीएफने प्रथमच एका महिला अधिकाऱ्याकडे दहशतवाद विरोधी अभियानाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.

✒️सन १९९६ च्या बॅचमधील तेलंगण केडरच्या आयपीएस अधिकारी चारू सिन्हा आता श्रीनगर सेक्टरमध्ये सीआरपीएफच्या महानिरीक्षक (आयजी) म्हणून काम पाहणार आहेत.

✒️भारताचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांनी 1 सप्टेंबर 2020 रोजी पदभार स्वीकारला.

✒️मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या हस्ते 30 ऑगस्ट 2020 रोजी पहिल्या "रोल ऑन रोल ऑफ' (रो-रो) रेल्वे सेवेचे आभासी पद्धतीने उद्‌घाटन करण्यात आले. 

पोलीस भरती फ्री सराव पेपर


✒️ही सेवा बंगळुरू (नेलमंगला) आणि सोलापूर (बाळे, महाराष्ट्र) या शहरांच्या दरम्यान आहे.

✒️अत्यावश्‍यक वस्तूंची जलद वाहतूक करण्यासाठी रेल्वे मंडळाने एप्रिलमध्ये बंगळुरू (नेलमंगला) ते सोलापूर (बाळे, महाराष्ट्र) पर्यंत पहिल्या "रोल ऑन रोल ऑफ' (रो-रो) सेवेला मान्यता दिली होती.

✒️पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात पुन्हा घुसखोरी करून ‘जैसे थे’ परिस्थिती बदलण्याचा चिनी लष्कराचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला, अशी माहिती लष्कराने सोमवारी दिली.

✒️पूर्व लडाखमधील पँगाँग टीएसओ क्षेत्रातील दक्षिण किनाऱ्याजवळ २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. 

✒️भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीत एप्रिल ते जून २०२० या तिमाहीत तब्बल २३.९ टक्क्यांनी घट झाली आहे. 

✒️हाफीजने टी२० क्रिकेटमधील २००० धावांचा टप्पा गाठला. २००० धावा आणि ५० बळी अशी दुहेरी कामगिरी करणारा हाफीज पहिलाच पुरूष क्रिकेटपटू ठरला.


पोलीस भरती सराव पेपर सामान्य ज्ञान


✒️चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोव्हा आणि जर्मनीची अँजेलिक कर्बर यांनी सोमवारी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत विजयी सलामी नोंदवली.

✒️मुंबईतील आतंरराष्ट्रीय विमानतळ विकसित करणाऱ्या जीव्हीके समूहाच्या मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ लि (एमआयएएल) या कंपनीचा ७४ टक्के वाटा अधिग्रहित करण्याचे समीकरण अदानी समूहाने जुळवले असून त्यामुळे मुंबई विमानतळाबरोबरच नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पही अदानी समूहाच्या ताब्यात गेला आहे. 

✒️न्यायालय अवमान प्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना सुप्रीम कोर्टाने एक रुपयाचा दंड ठोठावला आहे. 

✒️ 9 एप्रिल 2020 रोजी जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्था (WADA) यांच्यावतीने ‘प्ले सेफ ऑन प्ले ट्रू डे 2020’ कार्यक्रम आयोजित केला गेला होता.

✒️अहमदपूर येथील वीर मठ संस्थांचे मठाधिपती डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज (वय १०३) यांचे मंगळवारी (१ सप्टेंबर) नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना सायंकाळी चार वाजता निधन झाले. 

✒️डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जन्म १९१७मध्ये झाला होता.

✒️भारताच्या पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिवरामकृष्ण अय्यर पद्मावती यांचं शनिवारी (दि.२९) निधन झालं, त्या १०३ वर्षांच्या होत्या.

पोलीस भरती सराव पेपर 100 गुण

Police bharti sarav prashnapatrika 34 - महाराष्ट्र पोलीस भरती 2020

पोलीस भरती 2020 ऑनलाईन सराव पेपर



Tuesday, September 1, 2020

Current events superfast MPSC police - चालू घडामोडी सुपरफास्ट दिनांक 1 सप्टेंबर 2020

चालू घडामोडी सुपरफास्ट दिनांक 1 सप्टेंबर 2020


जय हिंद मित्रांनो 
      दररोज या वेबसाईटवर चालू घडामोडी तारखेप्रमाणे टाकल्या जातात. त्यामुळे हे लिंक आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करा. सराव दररोज पोलीस भरतीची सराव प्रश्नपत्रिका याच वेबसाईटवर सोडवायला भेटतील.

       चला आजची चालू घडामोडी बघूया

✒️रशियामध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या बहुपक्षीय लष्करी कवायतींमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.

✒️माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे.

✒️तर सेंद्रिय शेतीच्या क्षेत्राचा विचार केला तर भारत नवव्या क्रमांकावर आहे. 

✒️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे मोदी यांनी संपूर्ण सप्टेंबर महिना हा देशभरात पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल, असं सांगितलं.

✒️‘मेक इन इंडिया’ उपक्रमांपैकी एक असलेल्या या प्रकल्पासाठी संरक्षण मंत्रालयाने एल अँड टी समूह व माझगाव डॉक्स लि. 

✒️ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत पहिल्यांदा विजेता ठरला आहे.


✒️ ८४ वर्षीय प्रणव मुखर्जी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आर्मी रुग्णालयात उपचार सुरु होते.

✒️सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. 


✒️सिक्कीम या संपूर्ण राज्यामध्ये केवळ सेंद्रिय शेती केली जाते.

✒️ पूर्णतः सेंद्रिय शेती करणारे हे जगातले पहिले राज्य ठरले आहे.



✒️भारतीय नौदलासाठी 6 पारंपरिक पाणबुडय़ा बांधण्याच्या 55 हजार कोटी रुपयांच्या महाप्रकल्पासाठी पुढील महिन्यापर्यंत निविदा प्रक्रिया सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे.


✒️या 2 भारतीय शिपयार्ड व 5 विदेशी संरक्षण साहित्य कंपन्या यांची नावे विचारात घेतली आहेत.

✒️‘FIDE ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2020’ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रशिया आणि भारत संघ संयुक्त विजेता ठरले.



✒️आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (FIDE) प्रथमच ऑनलाईन स्वरूपात ऑलिम्पियाडचे आयोजन केले होते.

✒️भारतीय संघात कर्णधार विदित गुजराती, विश्वनाथन आनंद, कोनेरू हम्पी, डी हरिका, आर प्रज्ञानानंद, पी हरीकृष्ण, निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांनी रशियाविरुद्ध भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.

✒️आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ चे मुख्यालय अथेन्स (ग्रीस) येथे आहे.

                                                       जय हिंद






Police Bharti Online Free Test -33 महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका-33

पोलीस भरती 2020

                          चालू घडामोडी 2020

जय हिंद मित्रांनो,

सगळ्या प्रकारचे अद्यावत प्रश्नांचा समावेश आहे रोज एक सराव पेपर असतो . विषयानुसार जसे की गणित, बुद्धिमत्ता, मराठी, सामान्य ज्ञान पैकी एका विषयाची पंचवीस मार्क ची रोज सराव प्रश्नपत्रिका असते.



पोलीस भरती 100 गुणाचा पेपर

Monday, August 31, 2020

Police bharti online question paper no. 04- sub - IQ test ----महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाईन प्रश्नपत्रिका

Police Bharti Online Free Test 32 - महाराष्ट्र पोलीस भरती 2020 ऑनलाईन फ्री टेस्ट

current affairs 2020 -चालू घडामोडी सुपरफास्ट दिनांक 31 ऑक्टोबर 2020



 चालू घडामोडी सुपरफास्ट दिनांक 31 ऑगस्ट 2020





✒️कोनेरू हम्पी हिने शानदार कामगिरी करत महत्त्वाच्या क्षणी विजय मिळवल्यामुळे भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पोलंडचा पराभव करून फिडे ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या अंतिम फे रीत धडक मारली आहे.

✒️शुक्रवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी अमेरिकेला इशारा दिला जर वी-चॅटवर अमेरिकेनं बंदी घातली तर चीनचे नागरिक अॅपल कंपनीवर बहिष्कार टाकतील, असं ते म्हणाले.
✒️दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिवंगत सुशांतचा सन्मान केला जाणार आहे. 

✒️दादासाहेब फाळके पुरस्कारची सुरवात 1969 साली झाली. 

✒️ पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्या तर्फे दिला जातो व पुरस्कारात सुवर्ण कमळ आणि 10 लाख रुपये यांचा समावेश असतो.

✒भारताचे माजी क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी यांचा शनिवार, 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते खेळ प्रोत्साहन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

️✒ASEAN समूह आणि भारत या देशांच्या अर्थ मंत्र्यांची 17 वी सल्ला-मसलत बैठक आभासी पद्धतीने 29 ऑगस्ट 2020 रोजी घेण्यात आली.

️✒️बैठकीला ASEAN समूहाच्या सर्व 10 देशांचे प्रतिनिधी आणि भारताच्यावतीने केंद्रीय वाणिज्य व उद्योग तसेच रेल्वे मंत्री पीयूष गोयल उपस्थित होते.

✒️पीयूष गोयल आणि व्हिएतनामचे उद्योग मंत्री त्रान तुआन अन्ह यांनी बैठकीचे अध्यक्षपद संयुक्तपणे भूषवले.

✒️आग्नेय आशियाई राष्ट्र संघ (Association of Southeast Asian Nations -ASEAN) ही आग्नेय आशियामधली एक राजकीय व आर्थिक संघटना आहे.

✒️त्याची स्थापना इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर व थायलँड या देशांनी 8 ऑगस्ट 1967 रोजी केली.

✒️जकार्ता (इंडोनेशिया) शहरात त्याचे मुख्यालय आहे.

✒️आज समूहात ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलँड आणि व्हिएतनाम या 10 देशांचा समावेश आहे.

✒️भारतात दरवर्षी 29 ऑगस्ट या दिवशी ‘तेलुगू भाषा दिन’ साजरा केला जातो प्रसिद्ध तेलुगू लेखक गिडीगु वेंकट राममूर्ती यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो

✒️चक्रवर्ती समिती (Chakravarty Committee) भारतीय मौद्रिक प्रणालीच्या कामकाजासंबंधीचा अभ्यास करण्याकरिता स्थापन करण्यात आलेली समिती.

✒️“राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान” (National Digital Health Mission) या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

police bharti question paper 2020 - महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका

पोलीस भरती ऑनलाईन फ्री सराव प्रश्नपत्रिका क्रमांक - 6






विभाग पहिला :-  सामान्य ज्ञान




1. भारतीय राज्यघटनेत संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली?
A. आयर्लंड
B. अमेरिका
C. ब्रिटन
D. फ्रान्स

2. पुढीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीस लघु राज्यघटना (मिनी कन्स्तिच्युशन) असे म्हटले जाते?
A. 42 वी
B. 44 वी
C. 62 वी
D. 78 वी

3. हायड्रोक्लोरिक ॲसिड (HCL) आपल्या शरीरात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होते?
A. यकृत
B. वृक्क
C. प्लिहा
D. जठर

4. पितळामध्ये कशाचा समावेश असतो?
A. तांबे व कथील
B. तांबे व जस्त
C. लोह व निकेल
D. ॲल्युमिनियम व ब्रांझ

5. RADAR कशाचे संक्षिप्त रूप आहे?
A. रेडिओ डिटेक्शन अॅण्ड रेंजींग
B. रेडिओ रेकॉर्डिंग
C. रेडिओ डेटा रेकॉर्डिंग
D. यापैकी नाही

6. आंतरराष्ट्रीय नाणे निधीची स्थापना कधी झाली?
A. 24 ऑक्टोंबर 1944
B. 1 जानेवारी 1945
C. 27 डिसेंबर 1945
D. 1 डिसेंबर 1945

7. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?
A. समाजस्वास्थ्य
B. आत्मवृत्त
C. शिक्षणवृत्त
D. करुणा

8. हरित क्रांती कोणत्या पिका संबंधी घडून आली?
A. तांदूळ व हरभरा
B. गहू व ऊस
C. तांदूळ व गहू
D. तांदूळ व बाजरी

9. भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला?
A. डच
B. इंग्रज
C. पोर्तुगीज
D. फ्रेंच

10. पूर्वेचे व्हेनिस असे कोणत्या शहरास म्हटले जाते?
A. कोचीन
B. मुंबई
C. चेन्नई
D. कलकत्ता

11. वृत्तपत्रांचा कागद भारतात पुढील पैकी कोणत्या ठिकाणी तयार होतो?
A. होशंगाबाद
B. नेपानगर
C. कोलकाता
D. मुंबई

12. जगातील सर्वात खोल महासागर कोणता?
A. पॅसिफिक
B. हिंदी
C. अटलांटिक
D. आर्क्टिक

13.  भारत जोडो अभियान कोणी सुरू केले होते?
A. महात्मा गांधी
B. विनोबा भावे
C. बाबा आमटे
D. साने गुरुजी

14. दूध व मांसाकरीता प्रसिद्ध असलेली महाराष्ट्रातील बकरी ची जात पुढीलपैकी कोणती?
A. जाफराबादी
B. जमनापरी
C. उस्मानाबादी
D. सानेन

15. ......... या पिकाची वाढ खोडापासून होते?
A. केळी
B. डाळिंब
C. हळद
D. मका

16. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचे पंचायतराज असा उल्लेख करणारे व्यक्ती कोण?
A. पंडित नेहरू
B. महात्मा गांधी
C. वसंतराव नाईक
D. राजीव गांधी

17. महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती पुढील पैकी कोण
A. बाबा आमटे
B. पु ल देशपांडे
C. प्र के अत्रे
D. सुलोचना

18. चलन वाढायचा फायदा ........ होतो.
A. ऋणकोस
B. BPL कुटुंबास
C. धनकोस
D. सामान्य जनतेस

19. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा जिल्हा पुढीलपैकी कोणता?
A. मुंबई शहर
B. अहमदनगर
C. पुणे
D. नागपूर

20. महाराष्ट्रातील कोणते ठिकाण लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे?
A. पैठण
B. सातारा
C. सावंतवाडी
D. चीपळून

21. प्रच्छन्न बेरोजगारी कोणत्या क्षेत्रात अधिक प्रमाणात आढळून येते?
A. शेती
B. साखर कारखाने
C. शहर विभाग
D. यापैकी नाही

22. पंपाज गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहे?
A. उत्तर अमेरिका
B. ऑस्ट्रेलिया
C. दक्षिण आफ्रिका
D. दक्षिण अमेरिका

23. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना अहमदनगर येथे जिल्हाधिकारी असताना भिल्लांचे बंड मोडून काढल्याबद्दल....... ही पदवी इंग्रजांनी दिली.
A. सर 
B. डि. लिट
C. राव बहादुर
D. कैसर ए हिंद

24. बिळे करून राहणारे समुद्रातील प्राणी पुढीलपैकी कोणत्या वर्गातील प्राणी आहे?
A. संघ हेमिकार्डाटा
B. संघ कार्डाटा
C. संघ मोलुस्का
D. संघ अनॅलिडा

25. छातीत दुखणे व श्वसनासाठी त्रास ही लक्षणे कोणत्या आजाराची आहे?
A. कॉलरा
B. कुष्ठरोग
C. निमोनिया
D. धर्नुवा

चालू घडामोडी सुपरफास्ट


विभाग दुसरा :- गणित 



1. एका भूमितीय श्रेणी चे पहिले पद 6 आहे व सामान्य गुणोत्तर 2 आहे तर त्याचे 9 वे पद काय असेल?
A. 50
B. 22
C. 1536
D. 1236

2. 9 +9 × 9 ÷ 9 ची किंमत ........ आहे.
A. 89
B. 79
C. 161
D. 81

3. चाऱ्याची एक गासडी 9 वासरे व 7 गाईंना पुरते. तर याच मानाने 9 गासड्या चारा 54 वासरे व किती गाईंना पुरेल?
A. 84
B. 102
C. 63
D. 81

4. खालील समीकरण बरोबर येण्यासाठी कोणती दोन गणितीय चिन्हे आपापसात बदलणे आवश्यक आहे?  
12 ÷ 2 - 6 × 3 + 8 = 16
A. ÷ व +
B. - व + 
C. × व +
D. ÷ व ×

5. 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती असेल?
A. 220
B. 224
C. 225
D. 22

6. शाळेतील 288 मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत हे त्याच्या निमपट रांगांची संख्या आहे. तर प्रत्येक रांगेत किती मुले असतील?
A. 12
B. 16
C. 20
D. 24 

7. प्रारंभिक 200 संख्यांचे ( 1 , 2 , 3 ते 200 ) एकदा लेखन करण्यासाठी संगणकावरील संख्यांची बटणे किती वेळा दाबावे लागतील?
A. 491
B. 492
C. 493
D. 494

8. 4 + 44 + 444 + 4444 + ................ या श्रेणीमध्ये नऊ साखळ्या आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर दशांश च्या ठिकाणी कोणता आकडा येईल?
A. 5
B. 9
C. 3
D. 6

9. दोन अंकी मूळ संख्येतील अंकांची आदला बदल करून मूळ संख्याच तयार होतात अशा एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?
A. 8
B. 9
C. 10
D. 11

10. पावणेपाच वाजता मिनिट काटा खालीलपैकी कोणत्या अंकावर असेल?
A. IX
B. III
C. VI
D. V

11. 1 ते 1000 मधील तीन अंकी एकूण संख्या किती?
A. 100
B. 999
C. 989
D. 900

12. 0.2 + 0.2 × 0.002 - 0.02 = ?
A. 0.01956
B. 0.11804
C. 18004
D. 0.001956

13. पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
A. 3/4
B. 13/18 
C . 7/8
D. 13/16

14. 1/8 मध्ये 1/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल?
A. 13
B. 16
C. 39 
D. 40

15. खालीलपैकी कोणत्या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे?
A. 3,401
B. 3,241
C. 40,123
D. 21,415

16. एका पेटीत दोन डझन आंबे आहे अशा 24 पेट्यातील एकूण आंबे किती होतील?
A. 288
B. 600
C. 329
D. 576

17. एका संख्येला 9 भागल्यास बाकी 8 उरते व 8 ने भागल्यास बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती?
A. 71
B. 143
C. 72 
D. 144

18. 85,085  ÷ 17 = ?
A. 5,005
B. 505
C. 55
D. 550

19. 9,302 - 4,823 = ?
A. 4479
B. 4579
C. 5679
D. 5479

20. एका वर्तुळाचा परी आणि व्यास यामधील फरक 15 सेंटिमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती?
A. 12.20 सेंटीमीटर
B. 14 सेंटीमीटर
C. 7 सेंटीमीटर
D. 3.5 सेंटीमीटर

21. 4 तास 5 मिनिटात एक बस 126 किमी अंतर जाते. तर ती बस 35 मिनिटात किती अंतर जाईल?
A. 18 किमी
B. 20 किमी
C. 22 किमी
D. 26 किमी

22. 828 व 612 यांचा मसावी किती?
A. 36
B. 34
C. 42
D. 38

23. खालीलपैकी कोणता अपूर्णांकाचा 198/550 सममूल्य अपूर्णांक नाही?
A. 126/35
B. 18/5
C. 90/25
D. 54/40

24. ताशी 108 किमी वेगाने जाणारी गीतांजलि एक्सप्रेस एक सिग्नल खांबाला 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती?
A. 170 मिटर
B. 240 मीटर
C. 310 मीटर
D. 300 मिटर

25. एका बागेत आंब्याची एकूण 676 रोपे लावायची आहेत. जेवढ्या रांगा तेवढीच आंब्याची रोपे प्रत्येक रांगेत लावायची असल्यास प्रत्येक रांगीन किती रोपे लावता येतील?
A. 16
B. 25
C. 26
D. 36

पोलीस भरती 2020 सराव प्रश्नपत्रिका


विभाग तिसरा :- मराठी 



1. हरिणासारखे डोळे असणारी............
A. मृगावती
B. मीनाक्षी
C. मीनाली
D. मृगाक्षी

2. चुकीचा असलेला वाक्यप्रचार ओळखा?
A. जमीनदोस्त होणे - जमिनीवर झोपणे
B. टेंबा मिरवणे - दिमाख दाखवणे
C. जीव भांड्यात पडणे - संकट टळल्यामुळे बरे वाटणे
D. तिलांजली देणे - त्या करणे

3. पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव?
A. रौप्य महोत्सव
B. सुवर्ण महोत्सव
C. अमृत महोत्सव
D. हिरक महोत्सव

4. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. अति तेथे माती
A. खूप कष्ट केल्यास मातीमोल होतात.
B. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.
C. अतिशहाणपणा फायदेशीर नसते.
D. अति श्रम फुकट जातात

5. चक्र या शब्दातील च हा वर्णन कोणत्या प्रकाराचा आहे?
A. मुर्धन्य
B. दंततालव्य
C. कंठ तालव्य
D. तालव्य

6 संधी करा. नौ + इक
A. नावीक
B. नौक
C. नाईक
D. नाविक

7. एकमेकांचे शेजारी असणारे वर्णन हे जर स्वरांनी जोडले असतील तर तो संधीचा कोणता प्रकार आहे?
A. शब्द संधी
B. स्वर संधी
C. व्यंजन संधी
D. विसर्गसंधी

8.विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते?
A. केशवसुत
B. कुसुमाग्रज
C. केशव कुमार
D. बालकवी

9. आमचा बाप अ्न आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
A. नरेंद्र जाधव
B. शंकरराव खरात
C. नामदेव ढसाळ
D. केशव मेश्राम

10. शब्दाच्या जाती किती आहेत?
A. सहा
B. नऊ
C. आठ
D. सात

11. जय शब्द, दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्यांना काय म्हणतात?
A. विशेषण
B. शब्दयोगी
C. केवलप्रयोगी
D. उभयान्वयी

12. नाटकाच्या आरंभीचे स्तवन गीत, याला काय म्हणतात?
A. अभंग
B. नांदी
C. स्वगत
D. भरत वाक्य

13. वात या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा?
A. पावक
B. अनल
C. पावन
D. अनिल

14. तो पहा समोर हत्ती आला या वाक्याचा काळ ओळखा?
A. अपूर्ण भूतकाळ
B. साधा भूतकाळ
C. पूर्ण वर्तमानकाळ
D. अपूर्ण वर्तमानकाळ

15.  खालीलपैकी कोणता एक प्रयोगाचा मुख्य प्रकार नाही?
A. कर्मणी
B. भावे
C. कर्तरी
D. अभावे

16. पाच मुली दहा मुले हे शब्द संख्या विशेषणांच्या कोणत्या प्रकारात येतात?
A. गणनावाचक
B. क्रमवाचक
C. पृथकत्ववाचक
D. आवृत्तिवाचक

17. व , हा ,सि , लो , न , क या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्यातील पाचवे अक्षर कोणते?
A. क
B. हा
C. न
D. व

18. सच्छील या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता?
A. सत् + छील
B. सच् + शील
C. सत् + शील
D. स: + शील

19. तत् +मय या संधी युक्त शब्दाचा योग्य पर्याय निवडा?
A. तत्मय
B. तम्नय
C. तज्मय
D. तन्मय

20.  खालील प्रश्नातील शुद्ध शब्दांचा योग्य पर्याय निवडा?
A. चिरंजीव
B. चिरंजिव
C. चीरंजिव
D. वीरंजिव

21. अर्धवट तोडलेले विधान दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात?
A. अर्धविराम
B. लोपचिन्ह
C. अपूर्णविराम
D. अपसारण चिन्ह

22. ताप थांबला का तिचा या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल?
A. प्रश्नचिन्ह
B. अर्धविराम
C. अपूर्णविराम
D. उद्गारचिन्ह

23. खालील पर्यायातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा?
A. मुल
B. चूल
C. फुल
D. पूल

24. खेडे या शब्दाचे अनेकवचनी रुप शोधून त्याचा योग्य पर्याय निवडा?
A. खेड्या
B. खेडे
C. खेडी
D. खेडा

25. हा मुलगा चतुर आहे. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार होता?
A. संबंधी सर्वनाम
B. दर्शक सर्वनाम
C. सार्वनामिक सर्वनाम
D. प्रश्नार्थक सर्वनाम

पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका 5 -100 गुण


विभाग  चौथा :- बुद्धिमापन



1. 17 , 20 , 24 , 29 ,?
A. 30
B. 32
C. 34
D. 35

2. 1728 , 1000 , 512 , 216 , ?
A. 169 
B. 196
C. 125
D. 64

3. 841 , 784 , 729 , 676 , ?
A. 776
B. 476
C. 625
D. 400

4. 485 , 442 , 401 , 362 , ?
A. 325
B. 289
C. 256
D. 400

5. 60 , 80 , 110 , 150 ,?
A. 200
B. 210
C. 220
D. 230

6. 66 , 70 , 76 , 84 , ?
A. 94
B. 100
C. 104
D. 102 

7. 2 , 3 , 6 , 18 , ?
A. 108
B. 110
C. 112
D. 24

8. 2 , 10 , 12 , 24 , 48 , ?
A. 96
B. 100
C. 101 
D. 110 

9. 1 , 7 , 8 , 15 , ?
A. 20
B. 22
C. 23
D. 25

10. 2 , 6 , 18 , 54 , ?
A. 110
B. 101
C. 112
D. 162

11. 7 , 12 , 9 , 20 , 11 , 28 , ? , ?
A.13 व 36
B. 36 व 13
C. 13 व 23
D. 8 व 10

12. 20 , 25 , 31 , 38 , ?
A. 46
B. 50
C. 55
D. 48

13. 289, 280 , 271 , 262 , ?
A. 254
B. 253
C. 262
D. 264

14. T ,V , X , Z , ?
A. Y
B. D
C. C
D. B

15. A , Y , W , U ?
A. R
B. V
C. S
D. Q

16. M , N , O , P , ?
A. T
B. S 
C. R
D. Q

17. A , Z , X , U , Q , ?
A. L
B. S
C. T
D. I


18. A , I , Q , Y , G , ?
A. H
B. O
C. I
D. K 

19. D , W , P , I , ?
A. B
B. C
C. D
D. A

20. 1 , 16 , 81 , 256 , ?
A. 301
B. 402
C. 509
D. 625

21. 8 : 512 : : 22 : ?
A. 10,648
B. 4,212
C. 5,324
D. 8, 412

22. 7 : 28 : : 17 : ?
A. 68
B. 78
C. 88
D. 98

23. कमान‌ : 123 : : मानक : 
A. 321
B. 231
C. 132
D. 234

24. सांकेतिक भाषेत FHQK म्हणजे GIRL, तर रणेस म्हणजे काय असेल?
A. HJSM
B. TPGU
C. SOFT
D. BOYS

25. A चा रांगेत 23 वा क्रमांक असून त्याच्या अलीकडे B व पलीकडे C उभे आहेत. B रांगेत मध्यभागी आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
A. 42
B. 44
C. 45
D. 43
_________________________________________________





Sunday, August 30, 2020

पोलीस भरती 2020 ऑनलाईन फ्री टेस्ट -31 -Maharashtra police bharti 2020 online free test

चालू घडामोडी सुपरफास्ट दिनांक 30 ऑगस्ट 2020 पुरस्कार विजेते यांची यादी जाहीर




चालू घडामोडी सुपरफास्ट दिनांक 30 ऑगस्ट 2020


📝 Unlock 4.0 - केंद्राकडून गाईडलाईन्स जारी.. 
‘अनलॉक ४’मध्ये कोणा कोणाला परवानगी ? जाणून घ्या

➡️देशात कंटेनमेंट झोन वगळता अन्य ठिकाणी लॉकडाऊन नाही.

➡️शाळेत ऑनलाईन वर्गासाठी 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर स्टाफला बोलावण्याची परवानगी

➡️ २१ सप्टेंबरपासून केवळ १०० लोकांच्या उपस्थितीत सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी

➡️ मेट्रो रेल्वे सेवा टप्प्याटप्प्याने सुरु करणार

➡️ २१ सप्टेंबरपासून ओपन थिएटर सुरु करण्यास परवानगी

➡️ २१ सप्टेंबरनंतर विवाह सोहळ्यास ५० ऐवजी १०० जणांना उपस्थित राहता येणार

➡️ २१ सप्टेंबरनंतर अंत्यसंस्कारासाठी २० ऐवजी १०० जणांना हजार राहण्यास परवानगी

📝राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं यंदा ऑनलाईन वितरण

➡️देशात आज  राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं

📝राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारे खेळाडू एकुण 5

➡️क्रिकेटपटू रोहित शर्मा
➡️पैलवान विनेश फोगाट
➡️टेबिल टेनिसपटू मनिका बत्रा
➡️महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल 
➡️पॅराऑलिम्पियन मरियाप्पन थांगावेलु

📝अर्जुन पुरस्कार मिळवणारे खेळाडू एकुण 27

➡️अतानु दास (तिरंदाजी)
➡️दुती चंद (अॅथलेटिक्स)
➡️ सात्विकसाईराज रेंकीरेड्डी
➡️चिराग शेट्टी, (बॅडमिंटन)
➡️विशेष भृगुवंशी (बास्केटबॉल)
➡️मनीष कौशिक, लवलीना बोरगोहेन (बॉक्सिंग) 
➡️इशांत शर्मा, दिप्ती शर्मा (क्रिकेट)
➡️अजय अनंत सावंत (घोडेस्वारी)
➡️संदेश झिंगन (फुटबॉल)
➡️ अदिती अशोक (गोल्फ)
➡️आकाशदीप सिंह, दीपिका (हॉकी)
➡️दीपक (कबड्डी) 
➡️सरिका सुधाकर काळे (खो-खो)
➡️ दत्तू बबन भोकानल (रोईंग)
➡️ मनु भाकर, सौरभ चौधरी (नेमबाजी)
➡️ मधुरिका सुहास पाटकर (टेबल टेनिस)
➡️ दिविज शरण (टेनिस)
➡️ शिवा केशवन (लूस)
➡️दिव्या काकरान, राहुल आवारे (कुस्ती)
➡️सुयश नारायण जाधव (पॅरा जलतरणपटू)
➡️संदीप (पॅरा अॅथलीट), मनीष नरवाल (पॅरा नेमबाजी

📝द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव विभाग) मिळवणारे खेळाडू 

➡️धर्मेंद्र तिवारी (तिरंदाजी)
➡️पुरुषोत्तम राय (अॅथलेटिक्स)
➡️शिव सिंह (बॉक्सिंग)
➡️रोमेश पठानिया (हॉकी)
➡️ कृष्ण कुमार हुड्डा (कबड्डी)
➡️विजय भालचंद्र मुनिश्वर (पॅरा लिफ्टर)
➡️नरेश कुमार (टेनिस)
➡️ओमप्रकाश दहिया (कुस्ती)

📝द्रोणाचार्य पुरस्कार (सर्वसामान्य विभाग) मिळवणारे खेळाडू 

➡️जूड फेलिक्स (हॉकी)
➡️योगेश मालवीय, (मल्लखांब)
➡️जसपाल राणा (नेमबाजी)
➡️कुलदीप कुमार हंडू (वुशु)
➡️गौरव खन्ना (पॅरा बॅडमिंटन)


➡️. यंदाच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या अॅथलेटिक्क्स प्रशिक्षक पुरुषोत्तम राय यांचं निधन झालं आहे. 

➡️हॉलिवूडचा सुपरस्टार चॅडविक बोसमन यांचं शुक्रवारी निधन झालं आहे. ते ४३ वर्षांचे होते.‘ब्लॅक पँथर’फेम अभिनेता 

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…