विभाग पहिला सामान्य ज्ञान
1. भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधनाचां उल्लेख आधुनिक भारताचे चाणक्य असा केला जातो.
A. चरणसिंग
B. व्ही.पी.सिंग
C. अटलबिहारी वाजपेयी
D. पी.व्ही.नरसिंहराव
2. सचिन तेंडूलकरने आपले 100 वे शतक कोणत्या मैदानवर झळकावले होते.
A. वानखेडे स्टेडीयम
B. ईडन गार्डन
C. लॉर्डस
D. शेर- ए - बांगला स्टेडीयम
3. 2018 च्या प्रारंभी कोणत्या राज्यात राष्ट्रीय कर्करोग संस्था स्थापन करण्यात आली.
A. राजस्थान
B. पंजाब
C. हरियाणा
D. हिमाचल प्रदेश
4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात आपले पहिले भाषण खालीलपैकी कोणत्या वर्षी दिले होते.
A. ऑक्टोंबर 14
B. ऑक्टोंबर 15
C. ऑगस्ट 14
D. सप्टेंबर 14
5. खालीलपैकी भारताच्या कोणत्या पंतप्रधनांनी संसदेत मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा केल्यानंतर त्याला देशव्यापी विरोध झाला होता.
A. राजीव गांधी
B. व्ही.पी. सिंग
C. चौथरी चरणसिंग
D. चंद्रशेखर
6. 1983 मध्ये कन्याकुमारी ते दिल्लीतील राजघाटापर्यंत पदयात्रा काढणारे नेते खालीलपैकी कोण आहे?
A. चंद्रशेखर
B. लालकृष्ण अडवाणी
C. रामविलास पासवान
D. व्ही. पी.सिंग
7. सर डॉन ब्रॅडमॅन यांच्यानंतर कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जलद 25 शतक झळकवणारा दुसरा फलंदाज ------------ हा आहे.
A. विराट कोहली
B. महेला जयवर्धने
C. केन विल्यम्सन
D. स्टीव्ह स्मिथ
8. ------------- हा देश ऑस्ट्रेलीया समुहाचा 43 वां सदस्य देश ठरला.
A. चीन
B. पाकिस्तान
C. भारत
D. ब्राझील
9. युनेस्को द्वारा ----ते ------ पर्यंत युनेस्को वारसा सप्ताह साजरा केला जातो.
A. 14 ते 20 नोव्हेंबर
B 20 ते 24 नोव्हेंबर
C 19 ते 25 नोव्हेंबर
D 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर
10. जागतिक व्यापार संघटनेने 2019 या वर्षापासून ------- हा दिवस जागतिक कापूस दिवस म्हणून घोषित केले.
A. 7 ऑक्टोंबर
B. 15 ऑक्टोंबर
C. 6 नोव्हेंबर
D. 26 नोव्हेंबर
11. कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर ठिकाण आहे?
A. कोल्हापूर
B. कराड
C. नरसोबाची वाडी
D. चीपळून
12. पुढीलपैकी कोणते शहर पर्जन्यछायेच्या प्रदेशात मोडते ते ओळखा?
A. चीपळून
B. माथेरान
C. बारामती
D. महाबळेश्वर
13. कॅनडाची राजधानी कोणती?
A. हॅमिल्टन
B. ओटावा
C. होरारे
D. कराकस
14. पिरपंजाल खिंड......... राज्यात आहे.
A. जम्मू काश्मीर
B. सिक्किम
C. उत्तराखंड
D. मणिपूर
15. बाजरी उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते?
A. उत्तर प्रदेश
B. महाराष्ट्र
C. गुजरात
D. राजस्थान
16. लिओनार्दो द विंची हा चित्रकार कोणत्या देशाचा होता?
A. इटली
B. अमेरिका
C. ग्रेस
D. जर्मनी
17. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते?
A. मदन मोहन मालवीय
B. बेकेम चंद्र चटर्जी
C. अरविंद घोष
D. शिशिरकुमार घोष
18. सार्वजनिक बांधकाम खाते सर्वप्रथम कोणी सुरू केले?
A. लॉर्ड कॅनिंग
B. लॉर्ड डलहौसी
C. लॉर्ड आयर्विन
D. लॉर्ड माऊंटबॅटन
19. अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली?
A. पंडिता रमाबाई
B. महर्षी कर्वे
C. महात्मा फुले
D. गो ग आगरकर
20. सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कोणत्या कलमात दिलेले आहे?
A. कलम 25 ते 27
B. कलम 28 ते 30
C. कलम 29 ते 30
D. कलम 31
21. सुवर्ण सिंग समितीच्या शिफारशीनुसार राज्यघटनेत कशाची तरतूद करण्यात आली?
A. मूलभूत कर्तव्य
B. पंचायत राज
C. धर्मनिरपेक्षता तत्व
D. पक्षांतर बंदी
22. जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य कोण असतात?
A. खासदार
B. आमदार
C. पंचायत समिती सभापती
D. यापैकी नाही
23. महानगरपालिकेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असते?
A. 217
B. 221
C. 229
D. 245
24. तालुकास्तरावर कायदा व सुव्यवस्थेचे कार्य कोण करतो?
A. उपविभागीय अधिकारी
B. पोलीस अधीक्षक
C. तहसीलदार
D. जिल्हाधिकारी
25. पोलीस पाटलास पुढीलपैकी कोणता रजा मंजूर करते?
A. तलाठी
B. तहसीलदार
C. ग्रामपंचायत
D. उपविभागीय अधिकारी
विभाग दुसरा गणित
1. दसादशे किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे 1,500 रुपयावर तीन वर्षात 540 रुपये व्याज मिळेल?
A. 10 ₹
B. 20 ₹
C. 15 ₹
D. 12 ₹
2. दहा रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 87256 पासून 87280 पर्यंत क्रमांक आहे, तर एकूण रक्कम किती?
A. 240
B. 250
C. 300
D. 245
3. - 5 - ( - 3 ) + 4 = ?
A. -2
B. - 4
C. + 4
D. 2
4. एका दुकानदाराने एक घड्याळ 630 रुपयाला विकली असतात त्याला 5 % नफा मिळाला असेल तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती?
A. 580
B. 600
C. 610
D. यापैकी नाही
5. 8201 × 9999 × 35525 × 0 +1 =?
A. 93,528
B. 3,33,333
C. 49,999
D. यापैकी नाही
6. 468. 325 या संख्यामध्ये 5 या अंकाची स्थानिक किंमत किती?
A. 5
B. 50
C. 0.005
D. 500
7. 4 × 14 +12 -21 ÷ 7 = 47 वरील कुठल्या दोन चिन्हात आपापसात बदल केले म्हणजे वरील सूत्र बरोबर ठरेल?
A. + ,-
B. × ,+
C. - , ÷
D. × , ÷
8. एक रक्कम सरळ व्याजाने पाच वर्षात दुप्पट होते तर तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यासाठी किती वर्षे लागतील?
A. 20 वर्षे
B. 15 वर्षे
C. 10 वर्षे
D. 25 वर्षे
9. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 13 सेमी व कर्ण 85 सेमी आहे तर दुसरी बाजू किती?
A. 60 सेमी
B. 45 सेमी
C. 84 सेमी
D. यापैकी नाही
10. लक्ष्मणला 6 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 45 मिनिटे लागतात तर त्याचा तासी वेग किती आहे?
A. 5 किमी प्रति तास
B. 8 किमी प्रति तास
C. 10 किमी प्रति तास
D. 9 किमी प्रति तास
11. 1/2 चे 3/4 टक्के म्हणजे किती?
A. 0.00075
B. 0.00375
C. 0.00475
D. 0.00275
12. एका प्लॉटची लांबी 40 फूट व रुंदी 50 फूट आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती?
A. 208 चौरस फूट
B. 2,000 चौरस फूट
C. 200 चौरस फूट
D. 20,000 चौरस फूट
13. एका गावात 15000 लोकसंख्या पैकी 1/5 स्त्रिया ,3/5 पुरुष असून उर्वरित बालके आहेत तर बालकांची संख्या किती?
A. 4000
B. 3000
C. 5000
D. 2000
14. एक इंच म्हणजे किती मिलि मीटर ?
A. 28 मिमि
B. 25.4 मिमि
C. 26.4 मिमि
D. 30.48 मिमि
15. 5,55,56,666 + 8,88,82,222 - 13 ,00,00,000 + 600 = ?
A. 1,44,39,488
B. 1,55,39,488
C. 1,43,39,488
D. 1,45,39,488
16. ( 500 - 33 ) ( 500+ 33 ) = ?
A. 247911
B. 248911
C. 246911
D. 248811
17. कामगारांचा पगार अगोदर 10 % नि कमी केला व नंतर मंदीच्या तीवर तीव्रतेमुळे तो पुन्हा 10 % नि कमी केला तर मोर्चा पगारात किती घट % झाली?
A. 19
B. 20
C. 35
D. 21
18. 2,646 चे 5/27% =?
A. 1.9
B. 2.9
C. 3.9
D. 4.9
19. दोन संख्याचे गुणोत्तर 3 : 4 आहे प्रत्येक संख्येत 8 मिळवल्यानंतर त्या संख्यांचे गुणोत्तर 5 : 8 होते तर त्या संख्या शोधा?
A. 9 , 12
B. 12 , 16
C. 15 , 20
B. 18 , 24
20. तीन संख्याचे गुणोत्तर 3 : 4 : 5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या?
A. 6 , 8 , 10
B. 12 , 16 20
C. 21 , 28 , 35
D. 9 , 12 , 15
21. 50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड विकले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
A. 10
B.9
C. 11
D. 12
22. 5 व 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहान व मोठ्या संख्येतील फरक किती?
A. 53
B. 35
C. 48
D. 18
.
23. कविताने एका बँकेकडून 2,250 रुपये कर्ज घेतले व ते सर्व खर्च 5 हप्त्यात भरले परत एक हप्ता हा मागील हपत्या पेक्षा 50 रुपये ने जास्त आहे तर पहिला हप्ता किती?
A. 53
B. 35
C. 48
D. 18
24. 136 रुपये दर्शनी किंमतीच्या भागावर 8 रुपये लाभांश मिळतो ,68,000 रु. भागावर किती लाभांश मिळेल?
A. 2,000
B. 8,000
C. 1,000
D. 4,400
25. जर × म्हणजे ÷ , ÷ म्हणजे, - म्हणजे × , + म्हणजे ÷ तर
9 × 5 - 7 + 7 ÷ 8 = ?
A. 6
B.22
C. 9
D. 7
विभाग तिसरा मराठी
1. माझी घर कोकणात आहे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
A. धातुसाधित विशेषण
B. संख्या विशेषण
C. सार्वनामिक विशेषण
D. गुण विशेषण
2. खालीलपैकी शुद्ध धातुसाधित ओळखा.
A. येवून
B. जावून
C. ठेवून
D. गावून
3. भेटला आणि चटकन निघून गेला. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
A. समुच्चयबोधक
B. न्यूनत्वबोधक
C. विकल्पबोधक
D. परिणामबोधक
4. शब्बास ! असंच यश पुढेही मिळव या वाक्यातील केवलप्रयोगी अवयवाचा प्रकार ओळखा.
A. दर्शक
B. हर्ष दर्शक
C. संमतीदर्शक
D. प्रशंसा दर्शक
5. तिला मी ताई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा.
A. तिला
B. ताई
C. मी
D. तिला ताई म्हणतो
6. नाजुका गाणे गात होती या वाक्याचा काळ ओळखा.
A. अपूर्ण भूतकाळ
B. पूर्ण भूतकाळ
C. अपूर्ण भविष्यकाळ
D. अपूर्ण वर्तमानकाळ
7. मुले मैदानावर खेळतात या वाक्यातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा.
A. तृतीया
B. द्वितीया
C. सप्तमी
D. प्रथमा
8. लोकांनी त्याला डोक्यावर घेतले या वाक्यातील प्रयोग ओळखा.
A. सकर्मक कर्तरी
B. कर्मणी
C. सकर्मक भावे
D. अकर्मक भावे
9. विटीदांडू या सामाजिक शब्दाचा समास ओळखा.
A. समाहार द्वंद्व
B. इतरेतर द्वंद्व
C. मध्यमलोपी
D. वैकल्पिक द्वंद्व
10. आई-वडील आणि गुरूजन यांचा आदर करावा या वाक्याचा प्रकार ओळखा.
A. मिश्र वाक्य
B. संयुक्त वाक्य
C. केवल वाक्य
D. यापैकी नाही
11. वीज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A. चंचला
B. यामिनी
C. लता
D. वसुधा
12. किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
A. कमालीचा
B. कमाल
C. कमी
D. जास्त
13. प्रतिष्ठा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A. अब्रू
B. दर्जा
C. मानमरातब
D. स्थान
14. उष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
A. नरम
B. थंड
C. सोम्य
D. शांत
15. जसा भाजीपाला, कामधंदा , तसे रहाट.......
A. आड
B. मोट
C. गाडगे
D. विहीर
16. तडीस नेणे या वाक्यप्रचाराचा अर्थाचा पर्याय निवडा.
A. फुशारक्या मारणे
B. फत्ते करणे
C. खूनगाठ करणे
D. गगन ठेंगणे
17. हुलकावणी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा.
A. बातमी गुप्त ठेवणे
B. चकवणे
C. फसवणूक होणे
D. चकित होणे
18. शुद्ध लेखण्याच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता.
A. आयुष्य
B. अयूष्य
C. आयूष्य
D. अयुष्य
19. दोन शब्द जोडताना अपूर्ण विरामचिन्ह वापरतात. हे विधान....... आहे.
A. खोटे
B. खरे
C. संदिग्ध
D. यापैकी नाही
20. संस्कृत मधून मराठीत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेल्या शब्दांना..... म्हणतात.
A. तद् भव
B. देशी
C. परकीय
D. तत्सम
21. वेणीफणी या सामाजिक शब्दाचा समास कोणता?
A. इतरेतर द्वंद्व
B. समहार द्वंद्व
C. वैकल्पिक द्वंद्व
D. अव्ययीभाव
22. जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात ते पास होतात. वाक्याचा प्रकार ओळखा.
A. मिश्र वाक्य
B. शुद्ध वाक्य
C. गौण वाक्य
D. संयुक्त वाक्य
23. निमंत्रण आले, तर मी येईल, या वाक्यातील अर्थ.......
A. आज्ञार्थी
B. संकेताअर्थ
C. विद्यर्थी
D. स्वार्थ
24. मांजराने उंदीर पकडला प्रयोग ओळखा.
A. कर्तरी
B. कर्मणी
C. भावे
D. कर्म कर्तरी
25. अविकारी शब्द म्हणजे काय.
A. अवयवांनाच अविकारी शब्द म्हणतात.
B. नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद असलेले शब्द
C. वाक्यात शब्दाचे रूप बदलते असे शब्द
D. विकृती असलेले शब्द
विभाग चौथा विषय बुद्धिमत्ता चाचणी
1. एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे , 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल चेंडू,19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. पिशवी जर चार रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत?
A. 26
B. 72
C. 24
D. 82
2. आई व मुलगा यांच्या वयाची बेरीज 45 आहे. आईच्या वयाच्या दुपटी तून मुलाचे वय वजा केले तर वजाबाकी 54 येते तर त्या दोघींची वय काढा?
A. आई 33 , मुलगा 12 वर्ष
B. आई 30 , मुलगा 15 वर्ष
C. आई 66 , मुलगा 12 वर्ष
D. आई 40 , मुलगा 5 वर्ष
3. एका सांकेतिक भाषेत SURPRISE हा शब्द HFIKIRHV असा लिहितात तर PATTERN हा शब्द कसा लिहावा?
A. KZGGVIM
B. TAPEERN
C. KEFIOH
D. ESRIPRUS
4. 5 , 9 , 17 , 33 , 65 , ?
A. 127
B. 129
C. 131
D. 130
5. एका परीक्षा कक्षात प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे के 2 शिक्षकांची नेमणूक झाले आहे अशा एकूण 16 शिक्षकांची नेमणूक झाली असल्यास जास्तीत जास्त किती विद्यार्थी परीक्षेत बसले आहे?
A. 260
B. 270
C. 440
D. 280
6. 25 ही संख्या रोमन लिपी कशी लिहाल?
A. XXV
B. XV
C. XXX
D. XIV
7. ? च्या जागी कोणता अंक येईल?
A. 25
B. 225
C. 64
D. 49
8. अमित, मिलिंद , महेश व रवी हे चौघेजण कॅरम खेळत बसले आहेत. महेश व मिलिंद पार्टनर आहेत . महेश चे तोंड उत्तरेस आहे व रवी हा महेश च्या बाजूस बसला नाही अमित चे तोंड कोणत्या दिशेस आहे?
A. पूर्व
B. पश्चिम
C. दक्षिण
D. उत्तर
9. खालील मालिका पहा. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
134 , 166 , 200 , 236 , ?
A. 238
B. 274
C. 276
D. 275
10. 13 वाजून 45 मिनिटाला काट्याची अदलाबदल केली असता किती वाजतील?
A. 09 वाजून 10 मिनिटे
B. 09 वाजून 15 मिनिटे
C. 09 वाजून 5 मिनिटे
D. 09 वाजून 1 मिनिटे
11. गुळाची प्रत्येक ढेप एक किलोग्राम ची अशा सहा ढेपा आहेत. एका कुटुंबात महिन्याला दीड किलो गूळ लागत असेल, तर या ठेपा किती कुटुंबाला पुरतील?
A. 3
B. 4
C. 1
D. 8
12. सुरेश हा ब्रीज चा सासरा आहे. महेश हा सुरेश च्या मुलीचा भाऊ आहे. तरी ब्रिजच्या पत्नीचे व महेश चे नाते कोणते असेल?
A. बहिण भाऊ
B. मुलगी वडील
C. काका काकू
D. यापैकी नाही
13. 40 हेक्टो ग्रॅम = किती किलोग्राम?
A. 400 किलोग्रॅम
B. 40 किलोग्रॅम
C. 4 किलोग्रॅम
D. 4000 किलोग्राम
14. पुढील प्रश्न कृतीचे पाण्यातील प्रतिबिंब असणारी आकृती पर्यायातून निवडा.
A. 1
B. 2
C. 3
D. 4
15. पुढील प्रश्न आकृतीचे आरशातील प्रतिमा असणारे आकृती पर्यायातून निवडा?
A. 1
B. 2
C. 3
D. 4
16. A या ठिकाणच्या पूर्वेला 5 किमी दूर अंतरावर B हे ठिकाण आहे B च्या उत्तरेला 5 किमी अंतरावर C हे ठिकाण आहे व C च्या पूर्वेला 7 किमी अंतरावर D हे ठिकाण आहे. तर A आणि D मधील सरळ अंतर किती?
A. 17 किमी
B. 13 किमी
C. 12 किमी
D. यापैकी नाही
17. JACK = 25 , JILL = 43 तर CROWN = ?
A. 73
B. 72
C. 71
D. 70
18. एका बागेत 5 झाडे आहेत. नारळाच्या शेजारी लिंबाचे झाड आहे. पेरूचे झाड सर्व झाडाच्या मधोमध आहे. नारळाच्या डावीकडे कोणतेही झाड नाही. चिकू चे झाड पेरू व आंबा यांच्यामध्ये आहे. मात्र लिंबाचे झाड चिकूच्या झाडा जवळ नाही. यावरून .......कोणत्या झाडा शेजारी एकच झाड आहे.
A. आंबा
B. चिकू
C. पेरू
D. लिंबू
19. माझ्या घड्याळात आता 9 वाजले आहेत, तास काटा पश्चिम दिशा दाखवत आहे , तर मिनिट काटा ची विरुद्ध दिशा कोणती?
A. वायव्य
B. उत्तर
C. दक्षिण
D. पूर्व
20. एका सांकेतिक लिपीत DOG हा शब्द GRJ असा लिहितात तर त्याच पद्धतीने MAN हा शब्द कसा लिहाल?
A. ODQ
B. PCQ
C. OCQ
D. PDQ
21. सोमवार = जानेवारी तर शनिवार = ?
A. मार्च
B. जून
C. सप्टेंबर
D. डिसेंबर
22.गणेश दक्षिणेकडे तोंड करून उभा राहिला व त्याने उजवीकडे चालवण्यास सुरुवात केली. त्या दिशेने काही अंतर चालल्यावर तो पुन्हा उजवीकडे वळाला अर्धा किलोमीटर अंतर त्याने पळत कापले. त्यानंतर तो पाठ फिरवून उभा राहिला. त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल?
A. पूर्व
B. पश्चिम
C. दक्षिण
D. उत्तर
23. एका चौदा मजली इमारतीच्या 10 व्या मजल्यावर चढण्यासाठी अर्धा तास वेळ लागतो. तर 10 व्या आणखी पाच मजले चढून जाण्यास किती वेळ लागेल?
A. 15 मिनिटे
B. 30 मिनिटे
C. 45 मिनिटे
D. यापैकी नाही
24. अ आणि बी ही दोन्ही क ची अपत्ये आहेत. ब हा क चा मुलगा आहे. परंतु हा कच्चा मुलगा नाही, तर अ व ब चे नाते काय?
A. मुलगी व वडील
B. पती व पत्नी
C. बहीण व भाऊ
D. भाऊ व भाऊ
25. पुढील संख्या श्रेणीतील चुकीची संख्या शोधा.
13 , 18 , 26 , 37 , 52 , 68 , 88 , 111
A. 52
B. 26
C. 68
D. 111