चालू घडामोडी
~ सुपरफास्ट ~
दिनांक 4 सप्टेंबर 2020
✒️भारताचा टेनिसपटू सुमित नागल याने US OPEN टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत विजय मिळवला.
✒️लिआँने वोल्फ्सबर्गने युरोपियन फुटबॉलवरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करताना महिलांच्या चॅम्पियन्स लीग फुटबॉलचे सलग पाचव्यांदा विजेतेपद मिळवले.
✒️लॉकडाउन शिथिलीकरणाच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पास सक्ती रद्द करण्यात आल्यानंतर आता मध्य रेल्वेनेही राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु करण्याला परवानगी दिली आहे.
✒️राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग उद्यापासून (२ सप्टेंबर २०२० पासून) सुरू होत असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केलं आहे. यासंदर्भातील एक पत्रक मध्य रेल्वेने जारी केलं आहे.
✒️बहुप्रतिक्षित IPL 2020ची अधिकृत घोषणा BCCIने ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच केली.
✒️युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे.तर स्पर्धेचा अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे हेदेखील स्पष्ट करण्यात आले.
✒️ड्रीम 11ला यंदाचे टायटल स्पॉन्सर्स जाहीर करण्यात आले.
✒️2 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत “राष्ट्रीय नागरी सेवा क्षमता विकास कार्यक्रम” (NPCSCB) राबविण्यासाठी मंजुरी दिली गेली.
✒️पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक मनुष्यबळ परिषद
क्षमता विकास आयोग
✒️डिजिटल मालमत्ता मालकी आणि परिचालन तसेच ऑनलाइन
✒️प्रशिक्षणासाठी तंत्रज्ञान मंचासाठी विशेष प्रयोजन कंपनी (SPV).
✒️कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली समन्वय मंडळ
✒️कार्यक्रमाची मुख्य मार्गदर्शक तत्वे.
✒️पंतप्रधान केअर 2019 -2020 च्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालात पंतप्रधान मोदींनी 2.25 लाखांचा निधी दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
✒️ तसेच पीएम केअर्स निधीला स्थापनेपासून केवळ पाच दिवसांमध्ये 3076.62 कोटी रुपये ऐच्छिक देणगीच्या रुपात जमा झाल्याचा उल्लेख यात करण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment