Thursday, September 3, 2020

Super fast current events 3 September 2020 - सुपरफास्ट चालू घडामोडी दिनांक 3 सप्टेंबर 2020

MPSC | PSI STI ASO | पोलीस भरती | जिल्हा परिषद |  तलाठी| ग्रामसेवक | रेल्वे | स्टाफ सिलेक्शन कमिशन | बँक |सर्व स्पर्धा परीक्षा


सुपरफास्ट  चालू घडामोडी  दिनांक 3 सप्टेंबर 2020


महत्त्वाचे चालू घडामोडी


✒️ भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी विश्वातल्या आतापर्यंतच्या सर्वात दूरवरच्या आकाशगंगेचा शोध लावून या अंतराळ शोध क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. (शास्त्रज्ञांनी त्याला ‘AUDFs01’ असे नाव दिले आहे.)

✒️इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स म्हणजेच आयुका या पुण्याच्या संस्थेच्या एका शास्त्रज्ञांच्या पथकाने डॉ कनक साहा यांच्या नेतृत्वाखाली या आकाशगंगेचा शोध लावला आहे.

✒️अॅस्ट्रोसॅट (ASTROSAT) ही 1513 किलो वजनी भारताची पहिली समर्पित बहू-तरंगी अंतराळ वेधशाळा आहे.

सुपरफास्ट चालू घडामोडी 2 सप्टेंबर 2020


✒️ पुन्हा एकदा सरकारनं ११८ अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्वांमध्ये क्रेझ असलेल्या पबजी या गेमचाही समावेश आहे.

✒️रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचं नाव जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामिल करण्यात आलं आहे.

✒️आता त्यांची मुलगी ईशा अंबानी आणि मुलगा आकाश अंबानी यांना फॉर्च्युनच्या '४० अंडर ४०' या यादीत स्थान देण्यात आलं आहे.

✒️दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने वापरलेल्या ‘एनिग्मा मशीन’चे रहस्य उलगडून युद्धाचा निकाल हिटलरविरोधात लागण्यात सिंहाचा वाटा असलेल्या अॅलन टय़ुरिंग यांची ओळख ‘संगणकशास्त्राचे जनक’ अशी आहे.

✒️चीनकडे जगातील सर्वात मोठे नौदल, युद्धनौकांमध्ये अमेरिकेला टाकलं मागे.

सुपरफास्ट चालू घडामोडी 1 सप्टेंबर 2020


✒️राज्याच्या गृहविभागाकडून २५ अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

✒️रजनीश सेठ यांनी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

✒️भारतीय रिझर्व्ह बँकेनी योजनेवर स्पष्टीकरण नसल्यामुळे ही योजना 6 सप्टेंबर 2020 रोजी 1 सप्टेंबर 2020 पासून संपुष्टात आणली – ऋण अधिस्थगन योजना.

✒️आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) याचे पहिले मुख्य अर्थशास्त्रज्ञ - एरिक बर्गलोफ (स्वीडिश).

✒️भारत, जापान आणि या देशाने हिंद-प्रशांत क्षेत्रात एक लवचिक पुरवठा साखळी तयार करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे - ऑस्ट्रेलिया.

✒️मर्कम कॅपिटल संस्थेनी तयार केलेल्या जागतिक सौर कंपन्यांच्या ताज्या क्रमवारीनुसार, कार्यकारी सौर प्रकल्पांच्या बाबतीत प्रथम क्रमांकाचे जागतिक सौर ऊर्जा निर्मिती संपदा मालक - अदानी ग्रुप (इंडिया).

✒️भारताचे पहिले डेटा सेंटर आणि इंटरकनेक्शन प्रदाता जे ओपन क्लाउड एक्सचेंज सेवा प्रदान करतात - GPX.

✒️भारत सरकारने या संस्थेत एक “AVGC (अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक सेक्टर) सेंटर फॉर एक्सलन्स” आणि औद्योगिक संरचना केंद्र विकसित करण्याची योजना आखली आहे – भारतीय तंत्रज्ञान संस्था,

✒️भारतातली पहिली महिला रुग्णवाहिका चालक – एम. वीरलक्ष्मी (तामिळनाडूमध्ये).

✒️भारत सरकारच्या ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2020’चे विजेता - हवाई दल क्रिडा नियंत्रण मंडळ.
_________________________________________________

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…