Saturday, August 15, 2020

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गृह विभागाने पोलीस शौर्य, गुणवत्तापूर्वक सेवा आणि राष्ट्रपती पदके जाहीर केली. यात महाराष्ट्र पोलीस दलाने ५८ पदके पटकावली

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गृह विभागाने पोलीस शौर्य, गुणवत्तापूर्वक सेवा आणि राष्ट्रपती पदके जाहीर केली. यात महाराष्ट्र पोलीस दलाने ५८ पदके पटकावली.

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रितेश कुमार (वायरलेस विभागाचे संचालक) आणि संजीव सिंघल (आस्थापना) यांना प्रतिष्ठापूर्व सेवेसाठी राष्ट्रपती पदक, तर पोलीस उपमहानिरीक्षक विनायक देशमुख यांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले.
कुमार आणि सिंघल यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक सुषमा चव्हाण, लातूरचे सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश मेहत्रे यांना राष्ट्रपती पदक तर उपनिरीक्षक राजेश खांडवे, शिपाई मनीष गोर्ले, गोवर्धन वढाई, कैलास उसेंडी, कुमारशा किरंगे, शिवाले हिडको, सुरेश कोवासे, रतीराम पोरेटी, प्रदीपकु मार गेडाम, राकेश नरोटे, राकेश हिचामी, वसंत तडवी, सुभाष उसेंडी आणि रमेश कोमिरे यांना शौर्य पदक जाहीर झाले.
गुणवत्तापूर्वक सेवेसाठी उपमहानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) देशमुख यांच्यासह पुण्याचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, मरोळ प्रशिक्षण केंद्राचे अधीक्षक तुषार दोषी, अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, चेंबूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक शालिनी शर्मा, मुंबई गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक केदारी पवार, विनय घोरपडे, चेंबूर पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक विश्वास भोसले आदींसह ३९ जणांना पदक जाहीर झाले.
मोहनचंद शर्मा, नरेश कुमार यांना सातव्यांदा शौर्यपदक
बाटला हाऊस चकमकीत २००८ मध्ये मारले गेलेले दिल्लीचे पोलीस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांना सातव्यांदा मरणोत्तर शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्यपदके जाहीर करण्यात आली आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक कमांडंट नरेश कुमार यांनाही काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद विरोधी मोहिमेत सातव्यांदा शौर्य पदक मिळाले आहे. शौर्य पदकात जम्मू-काश्मीर पोलिसांना एकूण ८१ तर केंद्रीय राखीव पोलीस दलास ५५ पदके जाहीर झाली आहेत. ९२६ पदके जाहीर करण्यात आली. त्यात शौर्य पदके, विशेष सेवा व इतर पदकांचा यात समावेश आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना २३ शौर्य पदके मिळाली असून दिल्ली पोलिसांना १६, झारखंड १२ या प्रमाणे पदके मिळाली आहे. हैदराबादच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीचे संचालक व आयपीएस अधिकारी अतुल कारवाल यांना दुसऱ्यांदा गौरवण्यात आले आहे. ५५ शौर्यपदकांपैकी ४१ जम्मू-काश्मीरला, १४ नक्षलविरोधी कारवायांसाठी छत्तीसगडला मिळाली आहेत. सीमा सुरक्षा दलाचे सहायक कमांडंट विनय प्रसाद यांना मरणोत्तर शौर्यपदक जाहीर झाले आहे. विंग कमांडर विशाक नायर यांनाही शौर्यचक्र जाहीर करण्यात आले आहे.


                                                   लोकसत्ता लाईव्ह न्यूज

MS Dhoni Announces Retirement from International Cricket: भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा


MS Dhoni Retires: ICC च्या तीन मोठ्या ट्रॉफी जिंकणारा एमएस धोनी एकमेव कर्णधार, पाहा त्याच्या करिअरमधील 5 खास क्षण




माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज 39-वर्षीय महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni), ज्याच्या नेतृत्वात भारताने दोन विश्वचषक जिंकले, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने शनिवारी 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला ब्रेक लगावला. धोनीने डिसेंबर 2004 मध्ये बांग्लादेशविरुद्ध एकदिवसीय सामने खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी तो आयपीएल खेळत राहिला. त्यामुळे, त्याचे चाहते अजून तरी त्याला क्रिकेटच्या मैदानावर खेळताना पाहू शकतात. धोनीने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
      धोनीने डिसेंबर 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. या व्यतिरिक्त धोनीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवारी 2019 मध्ये बेंगळुरू येथे खेळला होता, तर वर्ल्ड कप सेमीफायनल (10 जुलै, 2019) त्याचा अखेरचा वनडे सामना होता. धोनीने 16 वर्षाच्या आपल्या करिअरमध्ये अनेक उपलब्धता मिळवली आहे. आयसीसीच्या तीन मुख्य ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार आहे. 
      धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वनडे वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा मान मिळवला. इतकच नाही तर धोनीच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदा कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा स्वाद घेतला. तर आयपीएलमध्ये देखील त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने तीनदा विजयाची चव चाखली. 2004 ते 2007 या काळात धोनीची कारकीर्द चढउतार झाली. 2007 टी-20 विश्वचषकात जेव्हा सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरभ गांगुलीसारख्या खेळाडूंनी स्वत:ला त्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा धोनीला संघाची कमान देण्यात आली होती. आणि त्यानंतर त्याच्या नेतृत्वात असलेल्या एका युवा संघाने पहिला टी-20 विश्वचषक जिंकला. धोनी, एक यशस्वी कर्णधारच नाही तर सर्वोत्तम विकेटकीपर देखील राहिला. त्याने आपल्या चपळतेने स्टॅम्पिंग करत भारतासाठी अनेक सामन्यांचा निकाल बदलला.
      धोनीने भारतासाठी 350 वनडे सामन्यात 50.57 च्या सरासरीने 10773 धावा केल्या आहेत, ज्यात 10० शतके आणि 73 अर्धशतकांचा समावेश आहे.या दरम्यान, त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 183 अशी होती. धोनीने 90 कसोटी सामन्यांमध्ये 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या आहेत, त्यामध्ये 6 शतके आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. यावेळी, त्याची सर्वोत्तम धावसंख्या 224 धावा होती. विशेष म्हणजे, धोनीने वनडे आणि कसोटी शतक दोन्ही एकाच संघाविरुद्ध, पाकिस्तानविरुद्ध ठोकले.

पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट 2020 -17/Police bharti online test paper

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन नरेंद्र मोदींचं भाषण महत्वाचे मुद्दे:-

 स्वातंत्र्यदिन नरेंद्र मोदींचं भाषण 
महत्वाचे मुद्दे:-
------------------------------------------------------------------------

1. कोरोनाच्या तीन लशींचं काम वेगवेगळ्या टप्प्यांत

आजपासून National Digital Health Mission चा आरंभ केला जातोय. भारताच्या आरोग्य क्षेत्रात ही एक मोठी क्रांती असेल. प्रत्येक भारतीयाला हेल्थ ID दिला जाईल, जो प्रत्येक नागरिकाच्या आरोग्य आयडेंडिटीचं काम करेल. यात तुमची संपूर्ण आरोग्यविषयक माहिती, तुम्हाला असलेल्या आजारांची माहिती असेल.आज भारतात तीन लशींचं चाचणीचं काम वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहे. संशोधकांनी हिरवा कंदिल देताच आम्ही ती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याची योजना आखली आहे. संपूर्ण यंत्रणा यासाठी सज्ज आहे.

2. शत्रूला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर

सीमेवर भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न केला गेला. पण LOC असो वा LAC, आमच्या जवानांनी शत्रूला त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर दिलं.शेजारी राष्ट्रांसोबतच्या शेकडो वर्षं जुन्या नातेसंबंधांवर भर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न केलाय.
या क्षेत्रांतील सर्वच नेत्यांची या भागातील विकासाप्रती मोठी जबाबदारी आहे. त्या दिशेने दक्षिण आशियातील सर्व नेत्यांना, प्रशासकांना आणि विचारवंतांना मी आवाहन करतो, की या भागात जर शांतता नांदेल तरच इथला खऱ्या अर्थाने विकास होईल.आज आमचे शेजारी म्हणजे फक्त सीमेने जोडलेली राष्ट्रं नाहीत तर मनानेही जोडलेली राष्ट्रं आहेत. या देशांशी आपले आर्थिक नाते, विशेषतः ऊर्जा क्षेत्रातील भागीदारी महत्त्वाची आहे.

3. 'आत्मनिर्भर भारत' हा नवीन मंत्र

कोरोनाच्या साथीच्या काळात आत्मनिर्भर भारताचा संकल्प आपण केला आहे. हा शब्द नाही, आज हा 130 कोटी देशवासियांसाठी मंत्र बनलेला आहे कुटुंबातल्या 20- 21 वर्षांच्या मुलांकडून आपल्या पायांवर उभं राहण्याची अपेक्षा केली जाते. देश म्हणून आपण पंचाहत्तरीत आहोत. जे कुटुंबासाठी आवश्यक आहे, तेच देशासाठीही गरजेचं आहे
आपण आधी धान्य आयात करायचो. पण आज भारत जगात ज्याला गरज असेल, त्याला अन्न पुरण्याची आपली क्षमता आहे. आपल्या शेतकऱ्यांनी हे करून दाखवलं. आपण एखाद्या क्षेत्रात आत्मनिर्भर झालो, की शेजारच्या देशांचाही त्याचा फायदा होतो.

4. महिला सशक्तीकरणाला प्राधान्य

भारतात स्त्रीशक्तीला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली त्यांनी देशाचं नाव लौकीक केलं आहे. देश बळकट केला आहे.
आज भारतात स्त्रिया भूमिगत कोळसा खाणींमध्ये काम करत आहेत तर दुसरीकडे लढाऊ विमानांनी आकाशालाही गवसणी घातली आहे. देशातल्या 40 कोटी जनधन खात्यांपैकी जवळपास 22 कोटी खाती महिलांची आहेत.
कोरोना काळात एप्रिल-मे-जून या तीन महिन्यांमध्ये महिलांच्या खात्यात जवळपास 30 हजार कोटी रुपये थेट ट्रान्सफर करण्यात आले आहेत.

5. जम्मू-काश्मिरमध्ये विकासाची गंगा

एक वर्ष झालं आपल्याला 370 पासून स्वातंत्र्य मिळून. आज जम्मू-काश्मीर, लेह-लडाखमध्ये विकासाची गंगा वाहू लागली आहे. तिथे आयुष्मान भारत अभियानाचा लाभ जनता घेत आहे. मानव विकासाची मानांकन सुधारण्यासाठी जनप्रतिनिधी अधिक सक्रीय होऊन काम करत आहेत.
लडाखच्या लोकांच्या महत्त्वाकांक्षांना पूर्ण करण्याचं काम आम्ही करतोय. तिथे नवीन केंद्रीय विद्यापीठ उभारलं जातंय, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत,
तिथे मोठं सौर पार्क तयार होतं आहे. लेह खरंतर कार्बन न्युट्रल म्हणून जगाच्या पाठीवर उदयास येऊ शकतं, तेही विकास करताना.

6. Vocal For Local

Vocal For Local ही स्वतंत्र भारताची मानसिकता असायला हवी, हा जीवन मंत्र व्हावा.
भारतातल्या सुधारणांच्या परिणामांकडे जग बारकाईने पाहात आहे. त्याचाच परिणाम म्हणजे गेल्या वर्षी आतापर्यंतचे FDI चे सगळे रेकॉर्ड मोडले.
गेल्यावर्षी FDI मध्ये 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोना काळातही मोठमोठ्या कंपन्या भारतात येत आहेत
Make in India सोबतच Make for World चं उद्दिष्टं घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे.
National Infrastructure Pipeline विविध क्षेत्रात 7000 प्रोजेक्ट्स निवडण्यात आले आहेत.
देशातील पायाभूत सोयीसुविधांना गती मिळेल.
वाजपेयी पंतप्रधान असताना सुवर्ण चौकोन योजना मांडली होती. आता ती आपल्याला पुढे नव्या दिशेने न्यायची आहे. आता सगळ्या पायाभूत सुविधा एकमेकांशी जोडायच्या आहेत.

7. जलजीवन मिशन : वर्षभरात 2 कोटी कुटुंबांपर्यंत पाणी पोहोचवलं

आत्मनिर्भर भारतासाठी समतोल विकास गरजेचा आहे. यासाठी आम्ही मागास असलेल्या 110 जिल्हे निवडले आहेत
विकासात मागे राहिलेल्या या जिल्ह्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
या सगळ्यात शेती आणि शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
जलजीवन मिशनला आज एक वर्षं झालंय. दररोज आम्ही 1 लाखापेक्षा जास्त घरांत पाईपने पाणी पोचवत आहोत
गेल्या वर्षभरात 2 कोटी कुटुंबापर्यंत पाणी पोहोचवण्यात यश आलं. दुर्गम भागात पाणी पोहोचवण्यात आलं.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेची अंमलबजावणी

मुंबई दि.  13 : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेतली जाईल. 

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्या वतीने चर्चा केली आणि कोरोना परिस्थितीमुळे फक्त मुंबई आणि पुणे येथे परीक्षा ठेवल्यास राज्याच्या अन्य भागातील स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांना रेल्वे सेवा बंद असल्याने परीक्षास्थळी पोहोचणे शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती निदर्शनास आणत ही परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्यात यावी अशी सूचना केली.   

अखेर 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी ही परीक्षा मुंबई, पुणे यांसह राज्यातील सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जावी ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे.  यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची अडचण दूर केल्याने राज्याच्या सर्व विभागातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.  अनेक उमेदवारांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष यांचे आभार मानले आहेत.

दिनांक 15 ऑगस्ट 2020 सविस्तर चालू घडामोडी/current affairs 2020 in Marathi

"पारदर्शक करप्रणाली - प्रामाणिकाचा सन्मान" यासाठीच्या मंचाचे उदघाटन

🔸 नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत "पारदर्शक करपद्धती - प्रामाणिकाचा सन्मान" ('ट्रान्सपॅरेंट टॅक्सेशन – ऑनरिंग द ऑनेस्ट’) यासाठीच्या नव्या मंचाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

🔸या मंचावर, फेसलेस म्हणजेच चेहराविरहित मूल्यांकन, फेसलेस अपील आणि करदात्यांची सनद अशा मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. फेसलेस मूल्यांकन आणि करदात्यांची सनद 12 ऑगस्टपासून लागू करण्यात आली आहे. तर फेसलेस अपीलची सुविधा 25 सप्टेंबर 2020 रोजी संपूर्ण देशभरातल्या नागरिकांना उपलब्ध होणार.

🔸करदात्यांची सनद हे देखील देशाच्या विकासयात्रेतले महत्वाचे पाऊल आहे, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच करदात्यांचे अधिकार आणि त्यांची कर्तव्ये यांचे संहितीकरण करण्यात आले आहे आणि त्यांना मान्यता देण्यात आली आहे. करदात्यांना याप्रकारचा सन्मान आणि सुरक्षा देणाऱ्या जगातल्या अगदी मोजक्या देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे.

पार्श्वभूमी

🔸अलिकडच्या काही वर्षांत केंद्रीय थेट कर आकारणी मंडळाने (CBTD) थेट करांमध्ये अनेक मोठ्या कर सुधारणा केल्या आहेत. गेल्या वर्षी कॉर्पोरेट कराचे दर 30 टक्क्यांवरून 22 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले होते आणि नव्या उत्पादन केंद्रासाठी हे दर 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले. ‘लाभांश वितरण कर' देखील हटविले गेले.

🔸कर सुधारणांच्या अंतर्गत कर दरामध्ये कपात करणे आणि थेट कर कायद्यांचे सुलभीकरण यावर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. आयकर विभागाच्या कामकाजात कार्यक्षमता आणि पारदर्शकता आणण्यासाठी CBDTने कित्येक पुढाकार घेतले आहेत. त्यामध्ये,

🔸नव्याने सुरू केलेल्या कागदपत्र ओळख क्रमांकाद्वारे (DIN) अधिकृत माहितीमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचा समावेश आहे. याच्या अंतर्गत विभागाच्या प्रत्येक संवादामध्ये संगणकाद्वारे उत्पन्न झालेला वेगळा कागदपत्र ओळख क्रमांक असतो.

🔸वैयक्तिक करदात्यांसाठी आयकर विवरण पत्र मान्य होणे अधिक सुलभ होण्यासाठी आयकर विभाग आधीच माहिती भरलेली आयकर विवरण पत्र सादर करीत आहे.

स्टार्टअप्सचे अनुपालन निकषसुद्धा सुलभ केले आहेत.

आयकर विभागाचे उपक्रम

🔸प्रलंबित कर विवादांचा निपटारा करण्याच्या उद्देशाने आयकर विभागाने प्रत्यक्षकर, 'विवाद से विश्वास अधिनियम, 2020' अंतर्गत आणला असून याच्या अंतर्गत सध्या विवादांची प्रकरणे सोडवण्यासाठी माहिती पत्र भरून घेतली जात आहेत.

🔸करदात्यांच्या तक्रारी / खटल्यांमध्ये प्रभावी कपात व्हावी यासाठी विविध अपील न्यायालयात विभागीय अपील दाखल करण्यासाठी प्रारंभिक आर्थिक मर्यादा वाढविण्यात आल्या आहेत.

🔸डिजिटल व्यवहार आणि इलेक्ट्रॉनिक पद्धती किंवा देय देण्याच्या पद्धतींना चालना देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.

🔸कोविड कालावधीत करदात्यांचे अनुपालन सुलभ करण्यासाठीही विभागाने विविध प्रयत्न केले ज्याच्या अंतर्गत रिटर्न अर्ज भरण्यासाठी वैधानिक अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे आणि करदात्यांच्या हाती तरलता किंवा रोखतावाढवण्यासाठी परतावा जलदगतीने देण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींनी मोडला अटल बिहारी वाजपेयींचा विक्रम - मानाच्या ‘या’ यादीत चौथ्या स्थानवर झेप.

🔷पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिवंगत माजी पंतप्रधान अजट बिहारी वाजपेयी यांचा विक्रम मोडला. मोदी हे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे काँग्रेस पक्षाबाहेरील नेता ठरले आहेत. तर सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणाऱ्यांच्या यादीमध्ये मोदींनी चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. यासंदर्भातील माहिती भाजपानेच दिली आहे. भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

🔶२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकामध्ये भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला. त्यानंतर २६ मे २०१४ रोजी मोदींनी देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. २०१४ नंतर २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाने २०१४ पेक्षा मोठा विजय मिळवला आणि मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले.

🔷“आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या इतिहासामध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान असणारे चौथे पंतप्रधान ठरले आहेत. तसेच ते सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे काँग्रेस बाहेरील पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या सर्व कार्यकाळामध्ये एकूण दोन हजार २६८ दिवस पंतप्रधानपद भूषवलं होतं. आज पंतप्रधान मोदी या बाबतीत त्यांच्या पुढे निघून गेले,” अशं मालवीय यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

यूएई-इस्राएल राजनैतिक संबंध प्रस्थापित होणार.

🔰पॅलेस्टाइनला रोखण्यासाठी संयुक्त अरब अमिरात (यूएई) आणि इस्राएल प्रथमच एकत्र आले असल्याचे संकेत मिळाले आहेत. यूएई आणि इस्राएलने परिपूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचे मान्य केले आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी जाहीर केले.

🔰ट्रम्प यांनी घोषणा केल्याने इस्राएलशी सक्रिय राजनैतिक संबंध प्रस्थापित करणारे यूएई हे आखातातील पहिले आणि तिसरे अरब राष्ट्र ठरले आहे. अफगाणिस्तानातील युद्ध संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नांना यश मिळालेले नाही.

🔰त्याचप्रमाणे इस्राएल आणि पॅलेस्टाइन यांच्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांतून कोणताही मार्ग निघालेला नसताना ट्रम्प यांनी वरील घोषणा करणे हा त्यांचा नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीचा राजनैतिक विजय असल्याचे मानले जाते.

केंद्राला परीक्षा हव्यात.‼️

🍀अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) भूमिकेला केंद्र सरकारने पाठबळ दिले आहे. सर्व विद्यापीठांना अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास अनुमती देण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने प्रतिज्ञापत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. या प्रकरणावर आज, शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

🍀परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने ६ जुलै रोजी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. परीक्षा ऑनलाइन, ऑफलाइन किंवा संमिश्र पद्धतीने घेण्याची मुभाही आयोगाने दिली. या परीक्षा ३० सप्टेंबपर्यंत पूर्ण कराव्यात, अशा सूचना आयोगाने विद्यापीठांना दिल्या होत्या.

🍀या प्रकरणात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रालाही दिले होते. त्यावर भूमिका मांडताना केंद्रीय गृहमंत्रालयाने आयोगाच्या निर्णयाचे समर्थन करीत परीक्षांना अनुमती देण्यात आल्याचे स्पष्ट केले. याबाबत मनुष्यबळ विकास मंत्रालयाशीही चर्चा करण्यात आली. टाळेबंदी शिथिलीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातही शैक्षणिक संस्था ३१ ऑगस्टपर्यंत बंद असल्या तरी अंतिम वर्षांच्या परीक्षा व मूल्यमापनासाठी त्यांना र्निबधातून सूट देण्यात आल्याचे गृहमंत्रालयाने न्यायालयात सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकारणीसंदर्भातील महत्वाच्या घोषणा केल्या.

🔆पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर आकारणीसंदर्भातील पद्धतीमध्ये बदल करण्यासंदर्भातील महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

🔆प्रामाणिक करदात्यांसाठी कर जमा करण्याची पद्धत अधिक सोयिस्कर करण्याच्या दृष्टीने सरकारने ‘पारदर्शी कर आकारणी’ पद्धतीची घोषणा केली आहे.

🔆मात्र ही घोषणा करतानाच पंतप्रधानांनी या पुढे आयकर कार्यालयाचे स्वरुप पुर्णपणे बदलणार असल्याचे संकेत दिले आहेत.

🔆या नवीन बदलांमुळे करदात्यांना फायदा होणार असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

थायलंडमध्ये संशोधक वटवाघुळ पकडण्यासाठी ट्रेकिंग करत आहेत.

💮थायलंडमध्ये संशोधक वटवाघुळ पकडण्यासाठी खेड्यापाड्यांमधून ट्रेकिंग करत आहेत.

💮संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या करोना व्हायरस या आजाराच मूळ शोधून काढणं हा थायलंडमधल्या संशोधकांचा ट्रेकिंगमागचा मूळ उद्देश आहे.

💮जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या डाटानुसार, आतापर्यंत जगभरात अडीच कोटी लोकांना करोना व्हायरसची बाधा झाली आहे.

💮थायलंडमध्ये हॉर्सशू वटवाघुळाच्या 19 प्रजाती आहेत. पण करोना व्हायरसंबंधी अजून त्यांची चाचणी झालेली नाही असे संशोधकांनी सांगितले

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चष्मांचा ब्रिटनमध्ये लिलाव करण्यात येणार.

♒️राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दोन चष्मांचा ब्रिटनमध्ये लिलाव करण्यात येणार आहे.

♒️शंभर वर्षे जुने असलेले हे चष्मे गांधीजींनी वापरले असल्याने त्याला ऐतिहासिक महत्व असून या चष्म्यांची लिलावातील किंमत ही थक्क करणारी आहे.

♒️या चष्म्यांची किंमत 10,000 ते 15,000 पौंड म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 9 ते 14 लाख रुपये होईल असे सांगण्यात येत आहे.

♒️हे चष्मे सन 1900 मध्ये महात्मा गांधींनी वापरले होते. काही काळ वापरल्यानंतर त्यांनी आपले हे चष्मे आपल्या एका सहकार्याला भेट म्हणून दिले होते.

♒️सध्या ऑनलाइन लिलावात या चष्म्यांना 6000 पौंडांची बोली लागली आहे. ही बोली 10,000 ते 15,000 पौंडांपर्यंत जाऊ शकते.

चालू घडामोडी :- 15 ऑगस्ट 2020/current affairs 2020

चालू घडामोडी :- 15 ऑगस्ट 2020
---------------------------------------------

● चर्चित पुस्तके :-
• "राया: कृष्णदेवराय ऑफ विजयनगर" - श्रीनिवास रेड्डी.

• ...............या देशाचे नौदल हवाईमध्ये ‘रिम ऑफ द पॅसिफिक’ सराव आयोजित करणार आहे – अमेरिका.

• बौद्धिक संपदा फ्रेमवर्क संदर्भात सुधारणांच्या अभावासाठी .............या देशाने भारताला 'प्रियोरिटी वॉच लिस्ट'मध्ये ठेवले – अमेरिका.

• NASA संस्थेच्या पहिल्या मंगळ हेलिकॉप्टरला अधिकृतपणे “इंजेन्यूटी” नाव देण्यात आले आहे जे ..............या 17 वर्षीय भारतीय मुलगीने सुचविले - वनिझा रुपाणी.

• ओपन बजेट सर्वे 2019’ याच्यानुसार, अर्थसंकल्पीय पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या बाबतीत भारताचे स्थान............. वे आहे. - 53 वा.

• ‘ओपन बजेट सर्वे 2019’ याच्यानुसार, अर्थसंकल्पीय पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या बाबतीत पहिले स्थान - न्यूझीलंड.

• 2020 साली आंतरराष्ट्रीय पत्र स्वातंत्र्य दिनाची (3 मे) संकल्पना - “जर्नलिजम विदाउट फियर ऑर फेवर”.

• 18 ते 20 ऑक्टोबर या काळात .................या ठिकाणी जागतिक पत्र स्वातंत्र्य परिषद 2020 आयोजित केली जाणार आहे – द हेग, नेदरलँड.

• ..................हा देश एव्हरेस्ट पर्वताची उंची मोजण्यासाठी नवीन सर्वेक्षण करीत आहे - चीन.

• फिलिपीन्समधील आशियाई विकास बँक (ADB) येथे प्रधान कार्यकारी समन्वय विशेषज्ञ म्हणून नियुक्त केले गेलेले भारतीय - निलय मिताश.

• फोर्ब्स मासिकाच्या अब्जाधीश राजकारणींच्या वर्ष 2020च्या यादीत समावेश असलेली एकमेव भारतीय  महिला - सावित्री जिंदाल (क्रमांक: 349; संपत्ती: सुमारे 4.6 अब्ज डॉलर).

• जर्मनीच्या ड्यूश वेले या संस्थेचा ‘फ्रीडम ऑफ स्पीच’ पुरस्कार प्राप्त करणारे भारतीय - सिद्धार्थ वरदराजन (द वायर या संस्थेचे संपादक).

• शहरी भागात राहणाऱ्यांना किमान 120 दिवसांच्या रोजगाराची हमी देणारी मुख्यमंत्री शहरी रोजगार गॅरंटी योजना............ या राज्य सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतला - हिमाचल प्रदेश.

• भारतीय विमा नियंत्रण व विकास प्राधिकरणाने (IRDAI) सर्व विमाधारकांद्वारे दिले जाऊ शकणारे विमा मध्यस्थांसाठी मानक व्यवसायिक नुकसानभरपाई धोरणाचा आराखड़ा तयार करण्यासाठी................ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली - यज्ञप्रिया भारत.

• 4 एप्रिल 2020 रोजी कोविड19 विषयक नॉन अलाइन्ड मुव्हमेंट (NAM) यांची आभासी परिषद.............. यांच्या  अध्यक्षतेखाली आयोजित केली गेली - अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हम अलीयेव.

• 4 एप्रिल 2020 रोजी आभासी ‘कोरोनाव्हायरस ग्लोबल रिस्पॉन्स इंटरनॅशनल प्लेजिंग कॉन्फरन्स’ आयोजित करणारे देश – ब्रिटन आणि इतर आठ देश.

• केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते .............या व्यासपीठावर “द सरस कलेक्शन” उपक्रम आरंभ करण्यात आला - गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM).

• महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत राज्यातली जवळपास 100 टक्के लोकसंख्या विमा संरक्षणाखाली आणणारे पहिले राज्य........... हे होय  - महाराष्ट्र.

                   जय हिंद

Friday, August 14, 2020

पोलीस भरती 2020 ऑनलाईन फ्री टेस्ट -5 विषय सामान्य ज्ञान 25 गुण/Police bharti 2020 online free test 22 subject general knowledge

महापोलीस भरती अभ्यासक्रम व पुस्तकांची यादी/ Police bharti syllabus & book list

पोलीस भरती 2020 लेखी परीक्षा संबंधित कोणत्या पुस्तकांचा वापर करावा त्यासंबंधी संपूर्ण माहिती.

      जय हिंद मित्रांनो
                जर आपण महाराष्ट्र पोलीस भरती ची तयारी करत आहात तर त्या संबंधित लेखी परीक्षांचा कोणत्या पद्धतीने तयारी करावी जेणेकरून मला जास्त जास्त गुण कसे मिळतील? हा प्रश्न भरपूर मित्रांच्या मनात असतोच परंतु अभ्यास कसा करावा याबद्दल माहिती नसल्यामुळे आपला पाहिजे तेवढा पेपर मध्ये स्कोर होत नाही आज मी तुम्हाला कशा पद्धतीने पोलीस भरतीचा अभ्यास करावा जेणेकरून पेपर मध्ये तुम्हाला 90+गुण मिळतील याबद्दल माहिती देणार आहे.

              सर्वात प्रथम परीक्षा ही 100 गुणांची होणार आहे.
गणित              - 25 गुण
सामान्य ज्ञान     - 25 गुण
बुद्धिमत्ता          - 25 गुण
मराठी व्याकरण - 25 गुण

      या पद्धतीने पोलीस भरती चा अभ्यासक्रम आहे. तर आता आपण जाणून घेऊया कोण कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करावा.

सामान्य ज्ञानासाठी - विद्याभारती किंवा के सागर यांचा पोलीस भरतीचा पुस्तकांचा अभ्यास करावा या पुस्तकामध्ये तुम्हाला बेसिक माहिती मिळेल.

सामान्य ज्ञान - एकनाथ पाटील ठोकळा (PSI STI ASO)

गणित - सतीश वसे सर यांचा fast track किंवा- magic tricks या पुस्तकांचा आपण वापर करू शकता

मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे किंवा फास्टट्रॅक मराठी व्याकरण या पुस्तकांचा वापर करू शकता.

बुद्धिमत्ता चाचणी - अनिल अंकलीनी किंवा युनिक ॲकॅडमी चा बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचा वापर करू शकता

       याच्या व्यतिरिक्त चालू घडामोडी साठी दत्ता सांगोलकर यांचा पुस्तकांचा वापर करू शकता.


   या सगळ्यांनी व्यतिरिक्त मित्रांनो तुमच्याजवळ 2014 पासून ते आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरती च्या प्रश्नपत्रिका जवळ असणे गरजेचा आहे.

कारण पोलीस भरती मध्ये 60  ते 70 टक्के प्रश्न हे रिपीट होतात.
                   

अजून जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील पोलीस भरती बद्दल ते मला कमेंट करू शकतात किंवा 9967566868 या नंबर वर संपर्क साधू शकता.

पोलीस भरतीची ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.



१२ हजार ५३८ पदांची भरती प्रक्रिया 'या' महिन्यापर्यंत पूर्ण करणार- गृहमंत्री अनिल देशमुख


१२ हजार ५३८ पदांची भरती प्रक्रिया 'या' महिन्यापर्यंत पूर्ण करणार- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई | राज्यातील पोलिस दलामध्ये विविध पदांवर जवळपास १२ हजार ५३८ पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
या संदर्भातील एक बैठक नुकतीच मंत्रालयात संपन्न झाली. या बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल, प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता उपस्थित होते.
सध्याच्या काळामध्ये पोलीस विभागाने अत्यंत महत्त्वाचे कार्य केलेले आहे.
राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई वर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे या संवर्गातील १००% टक्के रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. पोलीस शिपाई गट-क संवर्गातील २०१९ या भरती वर्षात रिक्त असलेली ५२९७ पदे व २०२० या भरती वर्षात सेवानिवृत्ती, पदोन्नती, राजीनामा मुळे रिक्त होणारी पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण सहा ६७२६ पदे त्याचप्रमाणे मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील ५०० हून अधिक अशी एकूण १२५३८ पदे भरण्यात येणार आहेत,अशी माहिती देशमुख यांनी दिली.

२०१९ मध्ये अर्ज केलेल्यांना दिलासा-

२०१९ मध्ये होणाऱ्या पोलीस भरती साठी ज्यांनी महा आय.टी. पोर्टल मार्फत अर्ज केलेले आहेत. त्या अर्जाबाबतही योग्य ती कार्यवाही केली जाईल. पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी, अशा विविध टप्प्यावर पार पडत असल्याने ही प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहते. त्यामुळे एकाच भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त पदे भरण्याबाबत विभाग विचार करत आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.

पोलीस भरती 2020 नवीन जीआर नुसार मैदानी व लेखी चाचणी संपूर्ण माहिती तसेच शैक्षणिक पात्रता , आवश्यक कागदपत्रे संपूर्ण माहिती

पोलीस भरती 2020 नवीन जीआर नुसार मैदानी व लेखी चाचणी संपूर्ण माहिती


मैदानी चाचणी एकूण 50 गुण
पुरुष उमेदवार :-

1. गोळा फेक एकूण गुण -10

अ.क्र.    अंतर (मीटर मध्ये)                                      गुण
1.          8.50  पेक्षा जास्त.                                      10
2.          7.90 पेक्षा जास्त परंतु  8.50 पेक्षा कमी.        9
3.          7.30 पेक्षा जास्त परंतु  7.90 पेक्षा कमी.        8
4.          6.70 पेक्षा जास्त परंतु  7.90 पेक्षा कमी.        7
5.          6.10 पेक्षा जास्त परंतु  6.70 पेक्षा कमी.        6
6.          5.50 पेक्षा जास्त परंतु  6.10 पेक्षा कमी.        5
7.          4.90 पेक्षा जास्त परंतु  5.50 पेक्षा कमी.        4
8.          4.30 पेक्षा जास्त परंतु  4.90 पेक्षा कमी.        3
9.          3.70 पेक्षा जास्त परंतु  4.30 पेक्षा कमी.        2
10.        3.10 पेक्षा जास्त परंतु  3.70 पेक्षा कमी.        1
11.        3.10 पेक्षा कमी.                                          0

2.          100 मीटर धावणे - 10 गुण

अ.क्र.    वेळ (सेकंद मध्ये)                                        गुण 
1.         11.50 किंवा त्यापेक्षा कमी.                          10
2.         11.50 पेक्षा जास्त किंवा 12.50 पेक्षा कमी.     9
3.         12.50 पेक्षा जास्त किंवा 13.50 पेक्षा कमी.     8
4.         13.50 पेक्षा जास्त किंवा 14.50 पेक्षा कमी.     7
5.         14.50 पेक्षा जास्त किंवा 15.50 पेक्षा कमी.     5
6.         15.50 पेक्षा जास्त किंवा 16.50 पेक्षा कमी.     3
7.         16.50 पेक्षा जास्त किंवा 17.50 पेक्षा कमी.     1
8.         17.50 पेक्षा जास्त.                                        0

3.         800 मीटर धावणे -  30 गुण

अ.क्र.   वेळ (मिनिट व सेकंद मध्ये)                            गुण
1.         5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी.          30
2.         5 मी. पेक्षा जास्त परंतु 5 मी. 30 से. कमी.       27  
3.         5 मी. 30 से. पेक्षा जास्त परंतु 5. मी.50 से.  
            पेक्षा कमी                                                      24  
4.        5 मी. 50 से. पेक्षा जास्त परंतु 6 मी. 10 से.
           पेक्षा कमी.                                                      21
5.        6 मी. 10 से. पेक्षा जास्त परंतु 6. मी. 30. से.
            पेक्षा कमी                                                      18
6.        6 मी. 30 से. पेक्षा जास्त परंतु 6 मी. 50 से. 
           पेक्षा कमी                                                       15
7.        6 मी. 50 से. पेक्षा जास्त परंतु 7 मी.10 से.
            पेक्षा कमी.                                                     10
8.        7 मी. 10 से. पेक्षा जास्त परंतु 7 मी. 30 से. 
            पेक्षा कमी.                                                       5
9.        7 मी. 30 सेकंद पेक्षा जास्त.                               0


महिला उमेदवार:-

मैदानी चाचणी एकूण 50 गुण
 गोळाफेक 10 गुण.                                            
        
अ.क्र.  अंतर (मीटरमध्ये).                                         गुण
1.        6 मीटर पेक्षा जास्त.                                       10
2.        5.50 मी. पेक्षा जास्त परंतु 6 मी. पेक्षा कमी.      8
3.        5 मी. पेक्षा जास्त परंतु 5.50 मी. पेक्षा कमी.      6
4.        4.50 मी. पेक्षा जास्त परंतु 5 मी. पेक्षा कमी.      4
5.        4 मी. पेक्षा जास्त परंतु 4.50 मी. पेक्षा कमी.      2
6.        4 मीटर पेक्षा कमी.                                          0

100 मिटर धावणे - 10 गुण 

अ.क्र.   वेळ ( सेकंद मध्ये )                                       गुण
1.        14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी.                       10
2.        14 से. पेक्षा जास्त किंवा 15 से. पेक्षा कमी.       9
3.        15 से. पेक्षा जास्त किंवा 16 से. पेक्षा कमी.       8 
4.        16 से. पेक्षा जास्त किंवा 17 से. पेक्षा कमी.       7
5.        17 से. पेक्षा जास्त किंवा 18 से. पेक्षा कमी.       5
6.        18 से. पेक्षा जास्त किंवा 19 से. पेक्षा कमी.       3
7.        19 से. पेक्षा जास्त किंवा 20 से. पेक्षा कमी.       1
8.        20 से. पेक्षा जास्त.                                          0

800 मीटर धावणे - 30 गुण

अ.क्र.   वेळ (मिनिट सेकंद मध्ये)                               गुण

1.       2 मि. 50 से. किंवा त्यापेक्षा कमी                     30
2.       2 मि. 50 से. पेक्षा जास्त परंतु 3.00 मि.
          पेक्षा कमी.                                                     27
3.       3.00 मि. पेक्षा जास्त परंतु 3 मि. 10 से. 
          पेक्षा कमी.                                                     24
4.      3 मि. 10 से. पेक्षा जास्त परंतु 3 मि. 20 से. 
         पेक्षा कमी.                                                      21
5.      3. मि. 20 से. पेक्षा जास्त परंतु 3 मि. 30 से. 
         पेक्षा कमी.                                                      18
6.      3 मि. 30 से. पेक्षा जास्त परंतु 3 मि. 40 से.      
         पेक्षा कमी.                                                      15
7.     3 मि. 40 से. पेक्षा जास्त परंतु 3 मि. 50 से. 
         पेक्षा कमी                                                       10
8.     3 मि. 50 से. पेक्षा जास्त परंतु 4 मि. पेक्षा कमी     5
9.     4 मिनिट पेक्षा जास्त                                           0

अशाप्रकारे पुरुष व महिला उमेदवारांसाठी 50 गुणाची मैदानी चाचणी होते.

पोलीस भरती 2020 साठी लेखी परीक्षा 100 गुणांची होते.

विषय                                    गुण
सामान्य ज्ञान                           25
गणित                                    25
बुद्धिमत्ता                                25
मराठी व्याकरण                       25

पोलीस भरती लेखी परीक्षा ही फक्त मराठी मधूनच घेतली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा शासनाने नमूद केलेल्या इयत्ता बारावी पास पाहिजे

उमेदवारांचे वय
ओपन- 28 वर्ष
ओबीसी -30 वर्ष
एसी, एसटी,
इतर सामाजिक आरक्षण 33 वर्ष

उमेदवाराची उंची
पुरुष उमेदवार - 165 सेंटीमीटर पेक्षा जास्त
महिला उमेदवार - 155 सेंटीमीटर पेक्षा जास्त

पुरुष उमेदवार छाती
सर्वसाधारण 79 सेंटीमीटर पाहिजे आणि छाती 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे

आवश्यक कागदपत्रे (सर्वसाधारण उमेदवारासाठी)
1. दहावी +बारावी पास सर्टिफिकेट /बोर्ड सर्टिफिकेट
2. महाराष्ट्राचा अधिवास दाखला (domicile)
3. शाळा सोडल्याचा दाखला 

आरक्षित उमेदवारांसाठी
4. जातीचा दाखला (caste certificate)
5. Non creamy layer( एसी एसटी लागू नाही)
6. महिला उमेदवारांसाठी महिला आरक्षणाचा दाखला



अधिक माहितीसाठी कृपया नवीन जीआर नुसार जाहिरात बघावी.
      

पोलीस भरती 2020 ऑनलाईन फ्री टेस्ट -16

दिनांक 14 ऑगस्ट 2020 अतिशय महत्त्वाची चालू घडामोडी

दिनांक 14 ऑगस्ट 2020 अतिशय महत्त्वाची चालू घडामोडी


उपाध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या सिनेटर कमला देवी हॅरिस यांची निवड.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

👉अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी उपाध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या सिनेटर कमला देवी हॅरिस यांची निवड केली.निवडून आल्यास त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष असतील. शिवाय पहिल्या भारतीय-अमेरिकी तसेच आफ्रिकी उपाध्यक्ष असतील.

👉अमेरिकेत कृष्णवर्णीयांवरील अत्याचाराच्या घटनांनंतर अशांतता माजली असताना हॅरिस यांची उमेदवारी डेमोक्रॅटिक पक्षाला फायदेशीर ठरणार आहे.बायडेन यांनी उपाध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच कृष्णवर्णीय महिलेची निवड करून एक इतिहास घडवला आहे. हॅरिस यांचे वडील हे जमैकातील, तर आई भारतीय आहे.

‼️प्रामाणिक करदात्यांसाठी एक नवं व्यासपीठ केंद्र शासनाने तयार केले.‼️

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

👉टॅक्स वेळेत भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (13 ऑगस्ट) एक ‘गूड न्यूज’ देणार आहेत.
👉प्रामाणिक करदात्यांसाठी एक नवं व्यासपीठ केंद्र शासनाने तयार केलं असून याची पंतप्रधान मोदी उद्या घोषणा करणार आहेत.

👉‘पारदर्शी कर आकारणी : प्रामाणिकतेचा सन्मान’ (Transparent Taxation : Honouring the Honest) असं या व्यासपीठाचं नाव आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) याबाबत माहिती देण्यात आली आहे.

👉फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची पात्रता फेरी लांबणीवर.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

👉करोना साथीच्या पार्श्वभूमीवर ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धा तसेच आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या आशियाई देशांची पात्रता फेरी लांबणीवर टाकण्यात आले.

👉तर भारतीय फुटबॉल संघाला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी क्रीडा चाहत्यांना अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

👉2022 मध्ये कतार येथे फिफा विश्वचषक, तर 2023 मध्ये आशिया चषक रंगणार आहे. या दोन्ही स्पर्धासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आशियातील संघांचे पात्रता सामने खेळवण्यात येणार होते.

👉भारताने गतवर्षी ओमानविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला असून पात्रता फेरीत 8ऑक्टोबर रोजी कतारविरुद्ध, तर अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध नोव्हेंबर महिन्यात भारताचा सामना होणार होता.

👉‘बीसीसीआय’चे ‘अर्थलक्ष्य’.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

👉‘सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ’ असा रुबाब असणारे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आर्थिक अडचणीत नाही, असा दावा अध्यक्ष सौरव गांगुलीने नुकताच केला होता. सध्या करोना साथीच्या कठीण कालखंडातही लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीगद्वारे (आयपीएल) तीनशे कोटी रुपयांहून अधिक ‘अर्थलक्ष्य’प्राप्तीची योजना ‘बीसीसीआय’ने आखली आहे.

👉चिनी मोबाइल कंपनी विवोशी संबंध तोडल्यानंतर येत्या ७२ तासांत ‘बीसीसीआय’चे अर्थभरारी स्पष्ट होऊ शकेल, असा क्रिकेटवर्तुळातील जाणकारांचा अंदाज आहे. ‘बीसीसीआय’ने विवोच्या जागी शीर्षक प्रायोजक ठरवताना तीनशे कोटी रुपयांचे लक्ष्य आखले आहे. शीर्षक प्रायोजकाच्या शर्यतीत अ‍ॅमेझॉन, बायजू, ड्रीम ११, अनअ‍ॅकॅडमी, इंडिया इंक शर्यतीत आहेत.

👉मार्चपासून क्रिकेट स्थगित असल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचे प्रायोजक बायजूचे काही प्रमाणात पैसे वाचले आहेत. परंतु हा आकडा आश्चर्यकारक भरारी घेऊ शकेल, अशी ‘बीसीसीआय’ला अपेक्षा आहे. याचप्रमाणे अधिकृत सहप्रायोजकांचा आकडा तीनवरून पाचपर्यंत वाढवताना प्रत्येकी ४० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे करार डिसेंबपर्यंत चार महिन्यांसाठीच आहेत. मंडळाने आपले पत्ते अद्याप खुले केले नसले तरी आर्थिक अडचणीच्या काळातही भारतीय क्रिकेट जागतिक क्रीडा क्षेत्राचे लक्ष वेधू शकेल.

👉ट्रम्प प्रशासनाकडून भारतीयांना सर्वाधिक फायदा.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

👉अमेरिकेतील सत्ताधारी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसा धारकांना दिलासा दिला आहे.

👉H-1B व्हिसावरील निर्बंध थोडे शिथिल केले आहेत. याआधी ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसा धारकांना अमेरिकेत प्रवेशबंदीचा निर्णय लागू केला होता.

👉लॉकडाउन आधी जे काम करत होते, त्याच नोकरीसाठी H-1B व्हिसा धारकांना अमेरिकेत परतायचे असेल तर, त्यांना परवानगी देण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे.

👉H-1B व्हिसावरील निर्बंध शिथिल करण्याचा भारतीयांना सर्वाधिक फायदा होईल.

👉H-1B हाच व्हिसा घेऊन भारतीय अमेरिकेत जातात तसेच याच व्हिसावर भारतीय मोठया संख्येन तिथे नोकरी करतात.

🔶करोना प्रतिबंधक लशीची खरेदी केंद्रीय स्तरावर केली जाणार.🔶

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

👉करोना प्रतिबंधक लशीची खरेदी केंद्रीय स्तरावर केली जाणार असून राज्यांनी स्वतंत्रपणे लस खरेदी करू नये, अशी सूचना राष्ट्रीय तज्ज्ञ गटाने सर्व राज्यांना केली आहे. त्यामुळे लशीची खरेदी आणि वितरण दोन्हीही केंद्रिभूत केले जाणार आहे.

👉भारत हा जगातील प्रमुख लस उत्पादन केंद्रांपैकी असल्याने करोनाच्या लशीसाठी देशी उत्पादन क्षमतेचा पुरेपूर वापर कसा करता येऊ शकेल तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरही लस उत्पादक देशांशी समन्वय कसा साधता येईल, या दोन प्रमुख मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आल्याचे केंद्र सरकारच्या निवेदनात नमूद केले आहे.
केंद्र सरकारने राज्यांना वितरित केलेल्या कृत्रिम श्वसन यंत्रांच्या वापरासंदर्भातील अचूक माहिती उपलब्ध होणारी यंत्रणा विकसित केली गेली

पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिकेतील स्क्वेअरवर तिरंगा फडकवला जाणार.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

👉भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकणार आहे.
विशेष म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनानिमित्त स्क्वेअरवर तिरंगा फडकवला जाणार आहे.

👉अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि कॉन्टेकट या तीन राज्यांमधील भारतीयांचा समावेश असणाऱ्या एफआयएने जारी केलेल्या पत्रकामध्ये, “आम्ही इतिहास घडवणार आहोत,” असं म्हटलं आहे.15 ऑगस्ट 2020 रोजी टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडवणार आहोत,” असंही या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

केंद्र सरकारनं घेतला वेतनाशी निगडित मोठा निर्णय.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

👉कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं एक निवेदन जारी केलं आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या सुरक्षेशी निगडित हे निवेदन आहे. याअंतर्गत सातव्या वेतन आयोगाच्यानुसार केंद्र सरकारमध्ये थेट भरतीद्वारे स्वतंत्र सेवेत किंवा संवर्गात नवीन पदावर नेमणूक झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्याला आपल्या वेतनाचं संरक्षण मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या FR 22-B(1) अंतर्गत हे संरक्षण देण्यात येणार येणार आहे.

👉सातव्या सीपीसी अहवाल आणि सीसीएस (आरपी) नियम २०१६ लागू झाल्यानंतर राष्ट्रपतींनी FR 22-B(1) अंतर्गत करण्यात आलेल्या तरतुदींनुसार केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना प्रोटेक्शन ऑफ पेची मंजुरी दिल्याचं कार्यालयीन निवेदन नमूद करण्यात आलं आहे. ज्यांना इतर सेवांमध्ये किंवा संवर्गात प्रोबेशनर म्हणून नियुक्त केले गेले आहे, त्यांच्याकडे अधिक जबाबदारी असो किंवा नसो. ही ऑर्डर १जानेवारी २०१६ पासून लागू होईल.

👉FR 22-B(1) च्या ‘प्रोटेक्शन ऑफ पे’ संबंधी मंत्रालय आणि काही विभागांकडून संदर्भ देण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारचे जे कर्मचारी राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारच्या अन्य सेवांमध्ये किंवा कॅडरमध्ये नव्या पदावर नियुक्त होतात, त्यांना सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर वेतन निश्चितीसाठी काही मार्गदर्शक सूचना असणं आवश्यक असल्याचं निदर्शनास आलं, असं त्या निवेदनात नमूद करम्यात आलं आहे. FR 22-B(1) च्या तरतुदींमध्ये हे नियम त्या सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनाशी निगडित आहेत जे दुसरी सेवा आणि कॅडरमध्ये प्रोबशनर म्हणून नियुक्त झाले आहेत आणि त्यानंतर त्यांना सेवांमंध्ये कायम करण्यात आलं आहे.

राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा MPSC चा निर्णय.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

👉एमपीएससीकडून १३ सप्टेंबरला होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला असून आता २० सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे. एमपीएसीकडून पत्रकाद्वारे अधिकृतरित्या हे जाहीर करण्यात आले आहे.

👉करोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तिसऱ्यांदा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक १७ जून रोजी जाहीर करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि  अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार होत्या. मात्र, १३ सप्टेंबर रोजी देशभरात नीट परीक्षा होणार असून त्याच दिवशी राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार होती. त्यामुळे एमपीएससीने पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

👉एमपीएससीने २३ डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीनुसार, राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० रविवार, ५ एप्रिल २०२० रोजी घेण्याचे निश्चित केले होते. मात्र, करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे १७ जून २०२० रोजी एमपीएससीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही परीक्षा १३ सप्टेंबर रोजी घेण्याचे घोषीत केले. आयोगाकडून परीक्षेचा दिनांक निश्चित करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून ३ जुलै २०२० रोजीच्या सूचनेद्वारे राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) १३ सप्टेंबर २०२० रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले.

Thursday, August 13, 2020

पोलीस भरती 2020 ऑनलाईन टेस्ट - 1 विषय मराठी

महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे.

महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे.

1. police bharti maharashtra obc caste age limit
Answer
OBC 30 year old
OPN 28
Other caste 33

MPSC-PSI-STI-ASO-ONLINE FREE TEST -4

पोलीस भरती 2020 ऑनलाइन टेस्ट - 15

दिनांक 13 ऑगस्ट 2020 अत्यंत महत्वाची चालू घडामोडी

दिनांक - 13 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी

अंदमान व निकोबारमधील सागराखाली फायबर प्रकल्प सुरू

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🧬अंदमान व निकोबारमधील सागराखाली उभारण्यात आलेल्या ‘ऑप्टिकल फायबर प्रोजेक्ट’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. यामुळे अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील ब्रॉडबँड सेवेचा वेग वाढणार आहे.

🧬30 डिसेंबर 2018 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी 2312 कि.मी. अंतराच्या सागरांतर्गत ऑप्टिकल फायबर प्रोजेक्टची पायाभरणी केली होती. त्यामुळे चेन्नई, अंदमान व निकोबर बेटे एकमेकांशी इंटरनेटने जोडली जाणार आहेत.

🧬224 कोटींचा हा प्रकल्प असून पोर्ट ब्लेअरशिवाय स्वराज द्वीप (हॅवलॉक) लाँग आयलंड,रंगाट, लिटल अंदमान,कमोरटा, कार निकोबार व ग्रेटर निकोबार ही ठिकाणे जोडली जाणार आहेत.

🧬ग्रेट निकोबार येथे 10 हजार कोटींचे ट्रान्सशीपमेंट बंदर उभारण्याचा प्रस्ताव असून स्वराज द्वीप, शहीद द्वीप व लाँग आयलंड यासह काही ठिकाणी एरोड्रोम सुविधा देण्यात येणार असून कोची शिपयार्ड बेटांवरील वाहतूक वाढवण्यासाठी चार जहाजे देणार आहे.

प्रोजेक्ट चीता ला पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्यात आले.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🚦सैन्य दलांकडून हेरॉन ड्रोनला लेझर गाइडेड बॉम्ब, रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र अशा घातक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करण्याची मागणी होत आहे.

🚦बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या ‘प्रोजेक्ट चीता’ला पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्यात आले आहे.

🚦या प्रोजेक्ट अंतर्गत सरकारला 3500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ‘प्रोजेक्ट चीता’ अंतर्गत तिन्ही सैन्य दलांच्या 90 हेरॉन ड्रोन्सना अपग्रेड करण्याची योजना आहे.

🚦यामध्ये हेरॉन ड्रोनला लेझर गाइडेड बॉम्ब, हवेतून जमिनीवरील लक्ष्यावर अचूक प्रहार करणारे मिसाइल आणि रणगाडाविरोधी मिसाइल्सनी सुसज्ज करण्याची योजना आहे”

🚦शत्रूच्या ठिकाणांवर, हालचालींवर लक्ष ठेवण्याबरोबरच हेरॉन ड्रोन्स गरज पडल्यास हल्ला करण्यासही सक्षम असले पाहिजे असे सशस्त्र दलांनी प्रस्तावामध्ये सुचवले आहे.

RIS ने सुचवले चांगले पर्याय- 327 वस्तुंसाठी चीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🖱चीनकडून भारत आयात करत असलेल्या वस्तूंमधील तीन चतु्र्थांश किंवा 327वस्तू यांची पर्यायी आयात शक्य आहे.

🖱या 327 वस्तुंमध्ये मोबाइल फोन्स, टेलिकॉम उपकरणे, कॅमरा, सौर पॅनल, एसी, पेनिसिलन औषधांचा समावेश होतो.

🖱चीनकडून होत असललेल्या एकूण आयातीमध्ये या 327 वस्तुंचा तीन चतुर्थांश वाटा आहे. आरआयएसनुसार या 327 वस्तुंची चीन व्यतिरिक्त अन्य देशांकडून पर्यायी आयात शक्य आहे तसेच भारतातही याचे उत्पादन केले जाऊ शकते.

🖱भारतात चीनमधून एकूण 4044 उत्पादने आयात केली जातात. यात 3326 अशी उत्पादने आहेत, ज्यात फार स्पर्धा नाहीय. पण 327सेंसिटिव उत्पादने आहेत.

🖱एकूण आयातीमध्ये सेंसिटिव उत्पादने फक्त 10 टक्के आहेत. 76 टक्के सेंसिटिव प्रोडक्टमध्ये मशीन किंवा केमिकलचा समावेश होतो.

अमेरिकेचे ११ राजकारणी आणि संस्थाप्रमुखांवर चीनकडून निर्बंध.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

⏺अमेरिकेचे ११ राजकारणी व संस्थाप्रमुखांवर चीनने निर्बंध जारी केले आहेत. हाँगकाँगमधील लढय़ात लोकशाहीवाद्यांना पाठिंबा दिल्याने चीनने ही कारवाई केली असून सिनेटर मार्को रुबियो व टेड क्रूझ यांच्यावर आधीच निर्बंध जारी करण्यात आले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सोमवारी सांगितले की, ‘हाँगकाँग प्रश्नावर ११ जणांनी  कटुता निर्माण करून चीनविरोधी भूमिका घेतली आहे.’

⏺चीनने हाँगकाँगमध्ये लोकशाहीवाद्यांचे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या महिन्यात चीनच्या दक्षिणेकडील हाँगकाँगमध्ये नवीन सुरक्षा कायदा लागू करण्यात आला होता. ज्या अमेरिकी नेते आणि संस्थाप्रमुखांवर चीनने निर्बंध घातले आहेत, त्यांची संख्या हाँगकाँग व चीनमधील जितक्या अधिकाऱ्यांवर अमेरिकेने निर्बंध घातले आहेत तितकीच आहे.

⏺चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने निर्बंध लादलेल्या इतर अमेरिकी व्यक्तींमध्ये सिनेटर जोश हॉले, टॉम कॉटन व ख्रिस स्मिथ यांचा समावेश आहे. ‘नॅशनल एंडोमेंट फॉर डेमोक्र सी अँड फ्रीडम हाऊस’ या संघटनेच्या प्रमुखांवरही निर्बंध लादले आहेत.

⏺बीजिंगने रुबियो व क्रूझ तसेच स्मिथ यांच्यावर गेल्या महिन्यात निर्बंध लागू केले होते त्यानंतर अमेरिकेने अशीच कारवाई चीनच्या काही अधिकाऱ्यांवर केली होती व उगुर मुस्लिमांवर अत्याचार केल्याचा आरोप केला होता. शिनजियांग प्रांतात उगुर मुस्लिमांचे मानवी हक्क पायदळी तुडवल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.

सरकार ग्रॅच्युईटीचे नियम बदलणार - पाच वर्षांपेक्षा कमी नोकरी झालेल्यांना मिळणार फायदा.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🌱एकाच नोकरीत पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ काम केल्यासच सध्या ग्रॅच्युईटीचा फायदा कर्मचाऱ्यांना मिळतो. मात्र, सरकारने आता या नियमांत बदल करण्याच्या विचारात आहे. या नव्या नियमानुसार पाच वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी झाल्यासही ग्रॅच्युईटी मिळू शकणार आहे.

🌱सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नोकऱ्यांमध्ये असुरक्षितता आणि अन्य कारणांमुळे लोक कायम नोकऱ्या बदलत राहतात. त्यामुळे ग्रॅच्युईटीसाठी पाच वर्षांचा नियम व्यवहारिक म्हणता येणार नाही. मिंट या वेब पोर्टलच्या वृत्तानुसार, अनेक वर्षांपासून ग्रॅच्युईटीचा नियम बदलण्याची मागणी होत आहे. यावर सरकारने आता विचार सुरु केला आहे.

🌱जनसत्ताच्या वृत्तानुसार, संसदेच्या स्थायी समितीने देखील ग्रॅच्युईटीची मर्यादा कमी करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. नव्यानं तयार होत असलेल्या सामाजिक सुरक्षा कायद्यामध्ये याचा समावेश केला जाऊ शकतो. लेबर मार्केटच्या तज्ज्ञांनुसार, ग्रॅच्युईटीसाठी पाच वर्षांची मर्यादा खूपच अधिक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचं हित पूर्ण केलं जाऊ शकत नाही.

🌱दीर्घकाळ कामाच्या पद्धतीला प्रोत्साहन दिलं जावं याकरीता ग्रॅच्युईटीसाठी ५ वर्षांची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता विविध नोकऱ्यांचे पर्याय खुले झाले आहेत, त्याचबरोबर नोकऱ्यांमधील असुरक्षितता देखील वाढत आहे. त्यामुळे कर्मचारी आपली प्रगती आणि भविष्य पाहता पाच वर्षे एकाच संस्थेत नोकरी करत नाहीत. त्यामुळे ग्रॅच्युईटीसाठीची पाच वर्षांची मर्यादा त्यांच्यासाठी फायद्याची नाही.

भारतीयांकडून प्रभावी हायड्रोजन उत्क्रांतीसाठी कार्यक्षम व स्वस्त असे उत्प्रेरक विकसित.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

❄️बंगळुरू येथील सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस (CENS) या केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत असलेल्या स्वायत्त संस्थेच्या संशोधकांनी ‘पॅलाडिअम Pd(II)’ आयन-युक्त नव्या प्रकारचे कॉर्डिनेशन पॉलिमर (COP) संश्लेषित केला आहे, जो H-अ‍ॅडसॉरप्शन आणि बेनेझ टेट्रामाईन (BTA) यांच्या सक्रीय स्थळांचा स्रोत म्हणून कार्य करतो.

❄️दोन्ही मिळून द्वीमितीय (2D) Pd(BTA) पत्र्याच्या माध्यमातून H-बंध परस्परसंवाद निर्माण करतात. संशोधकांनी द्वीमितीय 2D Pd(BTA) पत्रा देखील तयार केला आहे.

❄️हायड्रोजन (H2) इव्होल्यूशन रिअॅक्शन (HER) यासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रो उत्प्रेरकाची कार्यक्षमता मुख्यत्वे त्याचा टिकाऊपणा, इलेक्ट्रोकेमिकल अभिक्रियेची क्षमता कमीतकमी करण्यावर आणि संश्लेषण (उत्पादन) याच्या किंमतीवर अवलंबून असते.

❄️उद्योगांमध्ये वापरण्यात येणारे प्लॅटीनम (Pt) / कार्बन (C) कार्यक्षम उत्प्रेरक आहेत, परंतु ते किंमतीत महाग आहेत आणि दीर्घकाळ वापरल्यास मेटल आयनवर काम करीत नाहीत. त्यातच पृथ्वीवर प्लॅटीनम धातूचे साठे अल्प आहेत.

💥या शोधाचे महत्व...

❄️हवामानातले बदल यांच्या विरोधात असलेल्या लढ्यासाठी जीवाश्म इंधनांऐवजी पुढील पिढीचे कमी कार्बनयुक्त इंधन म्हणून हायड्रोजन ओळखले जाते. इंधन म्हणून हायड्रोजनच्या वापराचे भवितव्य हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचे इलेक्ट्रोकेमिकल विभाजन सुलभ करण्यासाठी लागणाऱ्या कार्यक्षम इलेक्ट्रोकॅटिलिस्टच्या रचनेमध्ये आहे.

❄️हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचे विभाजन करण्याचे कार्यक्षम साधन विकसित करणे हा या शोधामागचा हेतु आहे.

अंदमान आणि निकोबारमध्ये ऑप्टिकल फायबर प्रकल्प सुरू.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🔥अंदमान व निकोबारमधील सागराखाली उभारण्यात आलेल्या ‘ऑप्टिकल फायबर प्रोजेक्ट’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. यामुळे अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील ब्रॉडबँड सेवेचा वेग वाढणार आहे.

🔥३० डिसेंबर २०१८ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी २३१२ कि.मी. अंतराच्या सागरांतर्गत ऑप्टिकल फायबर प्रोजेक्टची पायाभरणी केली होती. त्यामुळे चेन्नई, अंदमान व निकोबर बेटे एकमेकांशी इंटरनेटने जोडली जाणार आहेत. चेन्नई ते पोर्ट ब्लेअर, पोर्ट ब्लेअर ते लिट्ल अंदमान, पोर्ट ब्लेअर ते स्वराज द्वीप या प्रमाणे इंटरनेट सेवा जोडली जाणार असून अंदमान निकोबार भागात आजपासून इंटरनेट सेवा मोठय़ा प्रमाणात सुरू झाली आहे.

🔥१२२४ कोटींचा हा प्रकल्प असून पोर्ट ब्लेअरशिवाय स्वराज द्वीप (हॅवलॉक) लाँग आयलंड,रंगाट, लिटल अंदमान,कमोरटा, कार निकोबार व ग्रेटर निकोबार ही ठिकाणे जोडली जाणार आहेत.

🔥पंतप्रधानांनी सांगितले, आधुनिक दूरसंचार जोडणीचा फायदा अंदमान व निकोबार बेटांना होईल. देशातील सर्व दूरसंचार पुरवठादार कंपन्या तेथे सेवा देऊ शकतील. ऑप्टिकल फायबरने अंदमान निकोबारला इतर देशांशी इंटरनेटने जोडण्याची सोय मिळणार आहे. पोर्ट ब्लेअरला इंटरनेटचा वेग सेकंदाला ४०० गिगॅबाइट असून इतर बेटांवर इंटरनेटचा वेग सेकंदाला २०० जीबी आहे.

पाच वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी झाल्यासही ग्रॅच्युईटी मिळू शकणार आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🛡एकाच नोकरीत पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ काम केल्यासच सध्या ग्रॅच्युईटीचा फायदा कर्मचाऱ्यांना मिळतो. मात्र, सरकारने आता या नियमांत बदल करण्याच्या विचारात आहे.

🛡या नव्या नियमानुसार पाच वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी झाल्यासही ग्रॅच्युईटी मिळू शकणार आहे.

🛡सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नोकऱ्यांमध्ये असुरक्षितता आणि अन्य कारणांमुळे लोक कायम नोकऱ्या बदलत राहतात. त्यामुळे ग्रॅच्युईटीसाठी पाच वर्षांचा नियम व्यवहारिक म्हणता येणार नाही.

🛡मिंट या वेब पोर्टलच्या वृत्तानुसार, अनेक वर्षांपासून ग्रॅच्युईटीचा नियम बदलण्याची मागणी होत आहे. यावर सरकारने आता विचार सुरु केला आहे.ग्रॅच्युईटीनुसार, कर्मचारी जितकी वर्ष एकाच संस्थेत काम करतो तितक्या वर्षांसाठी प्रत्येक महिन्यातील 15 दिवसांचा पगार त्यांला ग्रॅच्युईटी म्हणून दिला जातो.

अनंतपद्मनाभन यांचा आयसीसी’च्या पंच समितीतसमावेश.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🎯केरळचे माजी फिरकीपटू आणि पंच के. एन. अनंतपद्मनाभन यांचा ‘आयसीसी’च्या आंतरराष्ट्रीय पंचांच्या समितीत समावेश करण्यात आला आहे.

🎯‘आयसीसी’च्या पंचांच्या समितीत स्थान मिळवणारे अनंतपद्मनाभन हे चौथे भारतीय पंच ठरले आहेत.

🎯सी. शामशुद्दीन, अनिल चौधरी आणि विरेंदर शर्मा यांचा यापूर्वी पंचांच्या समितीत समावेश करण्यात आला होता.

🎯50 वर्षीय अनंतपद्मनाभन यांनी ‘आयपीएल’ तसेच अनेक स्थानिक स्पर्धामध्ये पंच म्हणून भूमिका बजावली आहे.

परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्यांना नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🌷अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही. पदवी देण्याचा अधिकार फक्त विद्यापीठ अनुदान आयोगाला असताना राज्ये परीक्षा रद्द कशी करू शकतात, असा सवाल महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केला.

🌷कुठलीही पदवी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दिली जात असेल आणि आयोगाने परीक्षा घेण्याचा आदेश दिला असेल तर, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आयोगाच्या आदेशाविरोधात जाणारा ठरतो. परीक्षा झाली नाही तर पदवीही मिळणार नाही, असा कायदाच आहे, असा युक्तिवाद मेहता यांनी केला. त्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाचा आदेश रद्दबातल करता येतो का, याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश न्या. अशोक भूषण, न्या. आर. सुभाष रेड्डी आणि न्या. एम. आर. शहा यांच्या पीठाने मेहता यांना दिले.

🌷महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात निवेदन सादर केले असून करोनामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे. याआधीच्या सुनावणीत महाराष्ट्राने राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विविध कुलगुरूंशी चर्चा केल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदन दिले होते.

🌷११ जुलै रोजी ऑनलाइन व ऑफलाइन लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारी विद्यापीठांना कळवण्यात आला असल्याचे दिल्ली सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. दोन्ही राज्य सरकारांच्या निवेदनावर उत्तर देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळ मागून घेतला आहे. पुढील सुनावणी १४ ऑगस्ट रोजी होणार आहे.

आयसीसी’च्या पंच समितीत अनंतपद्मनाभन यांचा समावेश.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🎆केरळचे माजी फिरकीपटू आणि पंच के. एन. अनंतपद्मनाभन यांचा ‘आयसीसी’च्या आंतरराष्ट्रीय पंचांच्या समितीत समावेश करण्यात आला आहे.

🎆‘आयसीसी’च्या पंचांच्या समितीत स्थान मिळवणारे अनंतपद्मनाभन हे चौथे भारतीय पंच ठरले आहेत. सी. शामशुद्दीन, अनिल चौधरी आणि विरेंदर शर्मा यांचा यापूर्वी पंचांच्या समितीत समावेश करण्यात आला होता. ५० वर्षीय अनंतपद्मनाभन यांनी ‘आयपीएल’ तसेच अनेक स्थानिक स्पर्धामध्ये पंच म्हणून भूमिका बजावली आहे.

🎆‘‘या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होतो. भारताकडून खेळण्याची संधी मला लाभली नाही. परंतु आता पंच म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी उत्सुक आहे. आज माझे स्वप्न पूर्ण झाले,’’ असे अनंतपद्मनाभन म्हणाले.

वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींना समानाधिकार.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
✍हिंदू वारसा ‘सुधारणा’ कायदा २००५ अमलात येण्याच्या आधी वडिलांचा मृत्यू झाला असेल तरी अविभक्त  हिंदू कुटुंबातील वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींना मुलांइतकाच समानाधिकार (समदायित्व) राहील, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला आहे.

✍सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने मंगळवारी सांगितले की, ९ सप्टेंबर २००५ पूर्वी जन्मलेल्या मुलींनाही वडिलोपार्जित संपत्तीवर समान हक्क आहे. कारण वडिलोपार्जित संपत्तीवर अधिकार हा जन्मापासून मिळत असतो. सुधारित कायद्यातील कलम ६ अन्वये मुलींना वडिलोपार्जित संपत्तीतील समान हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही. त्यांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने हे हक्क लागू आहेत. त्यामुळे याबाबतची प्रलंबित प्रकरणे सहा महिन्यात निकाली काढावीत.

✍हिंदू वारसा हक्क कायदा पहिल्यांदा १९५६ मध्ये अमलात आला होता. त्यात वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींना समान अधिकार देणारी सुधारणा २००५ मध्ये करण्यात आली होती. ती पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होते असे स्पष्ट करण्यात आले.

✍प्रकाश विरुद्ध फुलवती (२०१५) व दानम्मा अ‍ॅट सुमन सुरपूर विरुद्ध अमर (२०१८) या प्रकरणात न्यायालयांनी विरोधाभासी निकाल दिले होते. प्रकाश विरुद्ध फुलवती (२०१५) प्रकरणात न्या. अनिल दवे व न्या. ए.के.गोयल यांचा समावेश असलेल्या न्यायापीठाने सांगितले की, सुधारित कायद्यातील वारसा हक्क हे जिवंत वारसा हक्क कर्त्यांच्या जिवंत असलेल्या मुलींना त्या केव्हा जन्मल्या याचा विचार न करता ९ सप्टेंबर २००५ पासून लागू होतात.

✍पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होत नाहीत. दानम्मा अ‍ॅट सुमन सुरपूर विरुद्ध अमर (२०१८) या खटल्यात न्या. ए.के.सिक्री व न्या. अशोक भूषण यांनी म्हटले होते की, २००१ मध्ये वडील वारलेल्या दोन मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत सारखाच हक्क आहे. तो हक्क पूर्वलक्ष्यी लागू होतो. हे परस्पर विरोधी निकाल होते.

‘या’ दहा राज्यांनी करोना नियंत्रणात आणला तर देश ही लढाई जिंकेल - पंतप्रधान मोदी.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

⬛️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आज देशातील सर्वाधिक करोनाबाधित आढळलेल्या १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करोनावर मात करण्यासाठी काही मार्गदर्शनही केली. “जर या दहा राज्यांनी करोनावर नियंत्रण मिळवलं तर देश ही लढाई जिंकेल.

⬛️करोनाच्या केसेसचे ७२ तासांमध्ये अहवाल, जास्तीजास्त चाचण्या यामुळे आपण या महामारीवर मात करू शकतो,” असंही ते म्हणाले. या बैठकीत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगण आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा सहभाग होता.

⬛️“देशात सध्या सहा लाखांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. त्यापैकी सर्वाधिक या दहा राज्यांमध्ये आहेत. यासाठी आम्ही आज समिक्षा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आजच्या या चर्चेतील एकमेकांच्या अनुभवातून खुप काही शिकण्यास मिळालं. तसंच एक बाबही लक्षात आली. जर या दहा राज्यांना करोनावर मात करण्यास यश मिळालं तर आपला देशही ही लढाई जिंकू शकेल,” असं मोदी यावेळी म्हणाले.

करोनावरील जगातील पहिल्या लशीची नोंद रशियात करण्यात आली.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

💠गेल्या नऊ महिन्यांपासून संपूर्ण जगाला त्रस्त करणाऱ्या करोनावरील पहिली लस विकसित केल्याचा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी केला.
‘करोनावरील जगातील पहिल्या लशीची नोंद रशियात करण्यात आली आहे. या लशीच्या सर्व चाचण्या झाल्या आहेत. ही लस प्रभावी असून, त्यातून करोना विषाणूविरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होते’, असे पुतिन यांनी जाहीर केले.
‘स्पुटनिक व्ही’ असे या लशीचे नाव आहे. ही लस आता प्रथम वैद्यकीय कर्मचारी आणि शिक्षकांना दिली जाईल.

💠लसीकरणाची सक्ती केली जाणार नाही. लसीकरण ऐच्छिक असेल.सप्टेंबरमध्ये या लशीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात सुरू केले जाईल. नंतर ऑक्टोबरमध्ये लसीकरणास सुरुवात होईल, असे रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी सांगितले.

प्रख्यात गझलकार राहत इंदौरी यांचे निधन.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🍀प्रख्यात गझलकार आणि गीतकार राहत इंदौरी यांचं निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते.

🍀मध्य प्रदेशातील इंदौरमधल्या रुग्णालयात त्यांना रविवारी दाखल करण्यात आलं होतं.

🍀त्यांना करोनाची लागण झाली होती. “त्यांना आज दोनदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली”, अशी माहिती अरविंदो रुग्णालयाचे डॉक्टर विनोद भंडारी यांनी दिली.

डिसेंबर महिन्यात करोनावरील लस लाँच करणार- सिरम इन्स्टिट्यूट.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✴️या वर्षाच्या अखेरिस भारतला आपली करोनाची लस मिळणार असल्याचा दावा सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केला आहे.

✴️डिसेंबर महिन्याच्या सुरूवातील आपली कंपनी करोनावरील लस लाँच करणार असल्याचं अदर पूनावाला म्हणाले.

✴️सीएनबीसी टीव्ही 18 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. “पुढील दोन आठवड्यांमध्ये करोनाच्या लसीची चाचणी सुरू करण्यात येणार आहे.

✴️ही चाचणी आयसीएमआरसोबत करण्यात येईल. ऑगस्ट महिन्याच्या अखेरिस आम्ही लसीचं उत्पादन सुरू करणार आहोत,” असंही पूनावाला म्हणाले.

50 नेटमधील गोलंदाजांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये जाण्याची संधी.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🅾इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) स्थलांतर झाल्यामुळे किमान 50 नेटमधील गोलंदाजांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे.

🅾चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघांनी प्रत्येकी 10 उदयोन्मुख नेट गोलंदाजांचा विशेष ताफा सोबत घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघानेही सहा नेट गोलंदाजांची नियुक्ती केली आहे.

🅾नेट गोलंदाजांमध्ये प्रथमश्रेणी तसेच 19 आणि 23 वर्षांखालील वयोगटांच्या क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या युवकांचा समावेश आहे.

🅾या गोलंदाजांना महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि ऋषभ पंत यांच्यासारख्या मातबर फलंदाजांचा सामना करण्याची संधी या निमित्ताने मिळेल.

जम्मू-काश्मीरमध्ये 4जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात यावी असे समितीने ठरविले.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🔥जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या विशेष समितीने 15 ऑगस्टनंतर या केंद्रशासित प्रदेशातील मर्यादित भागांमध्ये चाचणी तत्त्वावर 4जी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंगळवारी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.

🔥जम्मू-काश्मीर विभागातील प्रत्येकी एका जिल्ह्य़ात अतिवेगवान इंटरनेटची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे केंद्र सरकारच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी न्या. एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर सांगितले.

🔥जम्मू-काश्मीरमध्ये 4जी इंटरनेट सेवा विशिष्ट पद्धतीने सुरू करण्यात यावी आणि दोन महिन्यांनंतर चाचणीच्या निष्कर्षांचा आढावा घेण्यात यावा असे समितीने ठरविले आहे.

🔥केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर प्रशासन या प्रकरणातील प्रतिवादी असून त्यांनी चांगली भूमिका घेतली असल्याचे पीठाने नमूद केले.

कोरोना चाचण्यात अमेरिका पहिला तर भारत दुसऱ्या क्रमांकावर.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🔶अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना चाचण्यांच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असल्याचं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक असून दुसरा कोणताही देश जवळपासही फिरकत नाही असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

🔶अमेरिकेने आतापर्यंत साडे सहा कोटींपेक्षा जास्त चाचण्या केल्या असून भारताने एक कोटी 10 लाख चाचण्यात केल्या आहेत.

🔶अमेरिकेने आतापर्यंत साडे सहा कोटींपेक्षा जास्त चाचण्या केल्या असून भारताने एक कोटी 10 लाख चाचण्यात केल्या आहेत.

🔶एक कोटी 10 लाख चाचण्यांसोबत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताची लोकसंख्याही 130 कोटी आहे.

भारत सरकारच्या काही महत्त्वाच्या योजना

भारत सरकारच्या काही महत्त्वाच्या योजना


1) स्वनिधी योजना
PM - SVANidhi Scheme
(Prime Minister - Street Vendor AtmaNirbhar Nidhi Scheme)

लाभार्थी - ग्रामीण तसेच शहरी भागात रोडवर व्यवसाय करणारे 50 लाख व्यावसायिक

योजना स्वरूप - रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या जवळपास 50 लाख व्यावसायिकांना आजीविका पुन्हा सुरू करण्यासाठी 10000 कर्ज देण्याची योजना

या कर्जाची परतफेड मासिक हप्त्यांत 1 वर्षात करावयाची आहे.

2) "ई-संजीवनी"
- आयुष्यमान भारत(२०१८-सुरुवात) या योजनेअंतर्गत डॉक्टर ते डॉक्टर व पेशन्ट ते डॉक्टर असे दोन स्वरूपात उपलब्ध केलेले सर्वसमावेशक टेलिमेडिसीन प्लॅटफॉर्म!

3)  "मुख्यमंत्री किसान साहाय्य योजना"

- गुजरात सरकारची ही योजना प्रधानमंत्री पीकविमा योजना ऐवजी राबवणार आहे.

 केंद्र सरकारने पॉवरलूम बोर्ड बरखास्त केले(स्थापन- १९८१)
- राष्ट्रीय हातमाग दिनाच्या (७ ऑगस्ट) दिवशीच हातमाग मंडळ बरखास्त केले होते!


4) "माऊंट सिनबुंग"

- सुमात्रा बेटाजवळील इंडोनेशियामधील ४०० वर्ष निद्रिस्त असलेला हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला!


- भारतातील जागृत ज्वालामुखी-

बॅरेन, अंदमान बेटे! तर नारकोंडम(अंदमान), धोसी, तोशाम(हरियाणा), धिंनोधार(गुजरात) यापैकी अंदमानमधील वगळता इतर सर्व extinct मानले जातात!

केंद्रीय खादी व ग्रामोद्योग आयोगाने अरुणाचल प्रदेशमध्ये "रेशीम प्रशिक्षण व उत्पादन केंद्र" स्थापन करण्याचा निर्णय घेतला...

- भारतात रेशीमचा ४ जाती पैकी सर्वाधिक क्षेत्र, 

मलबेरी(७४.५१%), एरी(१६.५%), टसर(८.५%), मुगा(०.५५%) 
- रेशीम उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक
- समग्र रेशीम योजना- २०१७ ते २०२० या कालावधीत राबवली गेली.
- केंद्रीय रेशीम महामंडळ ची स्थापना/ १९४८(मुख्यालय-बेंगळुरू)

Wednesday, August 12, 2020

चालू घडमोडी (मे २०२०) अतिशय महत्त्वाचे

चालू घडमोडी (मे २०२०) अतिशय महत्त्वाचे

▪️ चर्चित पुस्तक :-
▫️ "हॉप ऑनः माय अॅडव्हेंचर्स ऑन बोट्स, ट्रेन्स अँड प्लेन्स" - रस्किन बाँड.
▪️ "द रूम ऑन द रूफ" - रस्किन बाँड.
▫️ "चेकमेटः हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र" - सुधीर सूर्यवंशी.

1. भारतीय कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या नावावरून ..............या देशाने राजधानीतल्या रस्त्याला नाव दिले 
इस्त्रायल.

. 👉 ....................या देशाच्या अध्यक्षतेत ‘कोविड-19 महामारी विषयक शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आभासी परिषद’ पार पडली 
-रशिया.

👉 आदिवासी तरुणांना डिजिटल माध्यमातून मार्गदर्शनासाठी तयार केलेला नवीन कार्यक्रम - 
“गोल (गोइंग ऑनलाईन अॅज लीडर्स)”.

👉 भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाचे नवे महासंचालक - व्ही. विद्यावती.

👉 पश्चिम बंगाल सरकारने 6 जिल्ह्यात 50,000 एकर नापीक जमीन वापरात आणण्यासाठी तयार केलेली योजना - ‘मतीर स्मृस्ती’ 

👉...............या राज्य सरकारने शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत मोफत शिक्षण मिळविण्यासाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाख रुपयांवरून अडीच लाखांपर्यंत वाढविली आहे. – राजस्थान.

👉 ...............हे राज्य सरकार महत्वाकांक्षी राजीव गांधी किसान न्याय योजना 21 मे पासून राज्यात लागू करणार आहे - छत्तीसगड.

 /👉डिजिटल ऑनलाइन शिक्षणापर्यंत बहू-पद्धतीने प्रवेश मिळविण्यासाठी भारत सरकारचा............... हां नवा कार्यक्रम आहे. – पीएम ई-विद्या (PM eVIDYA).

👉 2025 सालापर्यंत प्रत्येक मुलाने इयत्ता 5 वीच्या शिक्षणाची पातळी गाठली पाहिजे याची खात्री करुन घेण्यासाठी राष्ट्रीय मूलभूत साक्षरता व संख्याशास्त्र अभियान...............पर्यंत सुरू केले जाणार आहे. - डिसेंबर 2020.

👉2020 साली जागतिक उच्च रक्तदाब दिनाची (17 मे) ............. ही होती. - "मेजर युवर ब्लड प्रेशर, कंट्रोल इट, लिव लॉन्गर".

👉 उपग्रहांच्या संरक्षणासाठी ‘स्पेस ऑपरेशन्स स्क्वॉड्रॉन’ नावाने नवीन अंतराळ संरक्षण दल तयार करणारा.......... हा देश आहे.– जापान.

👉..............या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने 18 मे 2020 रोजी पहिल्या आभासी आणि 73 व्या जागतिक आरोग्य सभेचे उद्घाटन झाले - इस्रायल देशाचे पंतप्रधान ज्यांनी 17 मे रोजी पाचव्या वेळी शपथ घेतली - बेंजामिन नेतन्याहू

👉2020 साली जागतिक मधमाशी दिन (20 मे) याची संकल्पना - “बी एनगेज्ड”
👉...............देशाने भारतीय राज्यांतल्या लिम्पीयाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी या विवादित प्रदेशांचा समावेश करीत नवीन राजकीय नकाशाला मान्यता दिली - नेपाळ.

👉 .................हा देश 2020-21 या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्षपद भूषविणार आहे. - भारत (जपानच्या जागी).

👉 कोविड-19 महामारीपासून मुक्त होणारा युरोपमधला पहिला देश............. हा होय - स्लोव्हेनिया.

👉 भारतीय जलशास्त्र (hydrography) आणि संपूर्ण हिंद महासागराच्या क्षेत्रात त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी ब्रिटनच्या अलेक्झांडर डॅलरिम्पल पुरस्काराने सन्मानित झालेल्या भारतीय – वाइस अॅडमिरल विनय बढवार (भारत सरकारचे राष्ट्रीय जलशास्त्रज्ञ).
👉
...............या संस्थेनी कोविड-19 तपासणीसाठी कमी किंमतीची RT-PCR ची नवीन चाचणी विकसित केली आहे जी केवळ एक तास आणि 45 मिनिटांत परिणाम देते - AIIMS, रायपूर.

पोलीस भरती 2020 ऑनलाइन टेस्ट - 2 विषय- बुद्धिमत्ता चाचणी


पोलीस भरती 2020 ऑनलाईन फ्री टेस्ट - 3 (100 गुण)

पोलीस भरती 2019 ऑनलाईन फ्री टेस्ट - 14

दिनांक 12 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी

संरक्षण क्षेत्रातल्या सार्वजनिक आधुनिकीकरण प्रकल्प तसेच नवीन पायाभूत सुविधांचे उद्घाटन.


संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते 10 ऑगस्ट 2020 रोजी ‘आत्मनिर्भर भारत’ सप्ताहाच्या अंतर्गत संरक्षण क्षेत्रातले सार्वजनिक उपक्रम तसेच दारुगोळा निर्मिती मंडळ (OFB) यांच्या अंतर्गत येणाऱ्या सुविधांचे आधुनिकीकरण तसेच नवीन पायाभूत सुविधांचे डिजीटल माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.

आधुनिकीकरण उपक्रमाच्या अंतर्गत,

ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथील पिनाक रॉकेट कॉम्प्लेक्स येथे पिनाक आणि इतर अग्निबाणासाठी लागणाऱ्या विस्तारीत गरजांच्या पूर्ततेसाठी अत्याधुनिकीकरण करण्यात आले आहे.

OLF देहरादून याच्या अत्याधुनिकीकरणामुळे टी-90 रणगाड्यांच्या अत्याधुनिक ऑप्टोइलेक्ट्रॉनिक घटकांची निर्मिती होणार.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या कंपनीने उत्पादनासाठी पूर्णपणे स्वदेशी ‘मरीच’ एकात्मिक सुविधा तयार केली आहे, DRDOने विकसित केलेल्या टॉर्पेडो-भेदी संरक्षण प्रणालीचे मरीचसोबत एकत्रीकरण आणि चाचणी केली आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या कंपनीने ‘500 वे AL-31FP ओव्हरहाल्ड इंजिन’ भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केले आहे, जे Su-3

वेंकटरायपूर आणि नोलियासाही (ओडिशा): UNESCO-IOC तर्फे “सुनामी रेडी” दर्जा प्राप्त करणारी गावे

ओडिशाची किनारपट्टीवरील वेंकटरायपूर (गंजम जिल्हा) आणि नोलियासाही (जगतसिंगपूर जिल्हा) या दोन गावांना UNESCOच्या आंतरसरकारी सागरविज्ञान आयोग (IOC) तर्फे “सुनामी रेडी” म्हणजेच "सुनामीसाठी तयार" हा दर्जा दिला गेला आहे. हा दर्जा प्राप्त करणारी ही भारतातली तसेच हिंद महासागर प्रदेशातली प्रथम गावे आहेत.

UNESCO-IOC यांचा “सुनामी रेडी” उपक्रम

ज्या ठिकाणी सुनामी येण्याचा धोका असतो तेथील लोकांना वेळेवर त्याचा अचूक इशारा मिळाला तर त्यांचा जीव वाचविण्यासाठी ते प्रयत्न करू शकतात,नुकसान कमी होते आणि प्रतिसाद वाढवता येतो, असे निदर्शनास आले आहे. त्यासाठी म्हणून संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) यांच्या आंतरसरकारी सागरविज्ञान आयोगाने (IOC) “सुनामी रेडी” हा सुनामीच्या तयारीवर आधारित असलेला कार्यक्रम तयार केला आहे.

किनारपट्टीवरील लोकांना सुनामीच्या धोक्यासाठी तयार करणे, जिवितहानी आणि मालमत्तेची हानी कमी करणे आणि समुदायाची रचनात्मक आणि पध्दतशीरपणे उत्तम सराव संकेत तयार करणे ही या कार्यक्रमाची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत.

‘द इंडियन सुनामी अर्ली वाँर्निंग सेंटर’ (ITEWC) यांची इनकाँईस (INCOIS) ही संस्था भारतातली सुनामी सल्ला देणारी विभागीय संस्था आहे.

हिंद महासागर क्षेत्रात (25 देशांना) सुनामी संबंधीत सेवा देण्याची जबाबदारी इनकाँईस या संस्थेकडे आहे.

UNESCO बाबत

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो.

या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात या संघटनेचे मुख्यालय आहे. भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.

भारतीयांकडून प्रभावी हायड्रोजन उत्क्रांतीसाठी कार्यक्षम व स्वस्त असे उत्प्रेरक विकसित

बंगळुरू येथील सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस (CENS) या केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत असलेल्या स्वायत्त संस्थेच्या संशोधकांनी ‘पॅलाडिअम Pd(II)’ आयन-युक्त नव्या प्रकारचे कॉर्डिनेशन पॉलिमर (COP) संश्लेषित केला आहे, जो H-अ‍ॅडसॉरप्शन आणि बेनेझ टेट्रामाईन (BTA) यांच्या सक्रीय स्थळांचा स्रोत म्हणून कार्य करतो. दोन्ही मिळून द्वीमितीय (2D) Pd(BTA) पत्र्याच्या माध्यमातून H-बंध परस्परसंवाद निर्माण करतात. संशोधकांनी द्वीमितीय 2D Pd(BTA) पत्रा देखील तयार केला आहे.

हायड्रोजन (H2) इव्होल्यूशन रिअॅक्शन (HER) यासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रो उत्प्रेरकाची कार्यक्षमता मुख्यत्वे त्याचा टिकाऊपणा, इलेक्ट्रोकेमिकल अभिक्रियेची क्षमता कमीतकमी करण्यावर आणि संश्लेषण (उत्पादन) याच्या किंमतीवर अवलंबून असते. उद्योगांमध्ये वापरण्यात येणारे प्लॅटीनम (Pt) / कार्बन (C) कार्यक्षम उत्प्रेरक आहेत, परंतु ते किंमतीत महाग आहेत आणि दीर्घकाळ वापरल्यास मेटल आयनवर काम करीत नाहीत. त्यातच पृथ्वीवर प्लॅटीनम धातूचे साठे अल्प आहेत.

या शोधाचे महत्व

हवामानातले बदल यांच्या विरोधात असलेल्या लढ्यासाठी जीवाश्म इंधनांऐवजी पुढील पिढीचे कमी कार्बनयुक्त इंधन म्हणून हायड्रोजन ओळखले जाते. इंधन म्हणून हायड्रोजनच्या वापराचे भवितव्य हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचे इलेक्ट्रोकेमिकल विभाजन सुलभ करण्यासाठी लागणाऱ्या कार्यक्षम इलेक्ट्रोकॅटिलिस्टच्या रचनेमध्ये आहे.

हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचे विभाजन करण्याचे कार्यक्षम साधन विकसित करणे हा या शोधामागचा हेतु आहे.

1)________ यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी लेफ्टनंट केनेडींचा पराभव केला होता. 
:-भिमा नाईक

2)________  याने एका स्त्रीला सतीपासून परावृत्त करण्यासाठी बनारसपर्यंतचा प्रवासखर्च दिला व तिला सती जाण्यापासून परावृत्त केले. 
:- हेन्री डंडास रॉबर्टसन

3)वासुदेव फडके , वामनराव भावे, लक्ष्मण इंदापुरकर यांनी इ.स. 1874 साली ____ ही शाळा सुरू केली. 
:-पुना नेटिव्ह इन्स्टीट्यूट

4)अज्जन एलायजा सॉलोमन हे ज्यूधर्मीय गृहस्थ ___ च्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य होते.
:-सत्यशोधक समाज


Tuesday, August 11, 2020

पोलीस भरती 2020 ऑनलाइन टेस्ट - 2 विषय गणित एकूण 25 प्रश्न

भारत सरकारच्या सशस्त्र सीमा दलात विविध कॉन्स्टेबल पदांच्या १५२२ जागा

  भारत सरकारच्या सशस्त्र सीमा दलात विविध कॉन्स्टेबल पदांच्या १५२२ जागा


भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या सशस्त्र सीमा दलातील कॉन्स्टेबल पदांच्या एकूण १५२२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

कॉन्स्टेबल पदांच्या एकूण १५२२ जागा

चालक पदांच्या ५७४ जागा.
प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या २१ जागा.
पशुवैद्यकीय पदांच्या १६१ जागा.
आय्या (महिला) ५ पदांच्या जागा.
मोची पदांच्या २० जागा.
गार्डनर पदांच्या ९ जागा
कुक (पुरुष) पदांच्या २३२ जागा.
कुक (महिला) पदांच्या २६ जागा.
वॉशरमन (पुरुष) पदांच्या ९२ जागा.
वॉशरमन (महिला) पदांच्या २८ जागा.
नाव्ही (पुरुष) पदांच्या ७५ जागा.
नाव्ही (महिला) पदांच्या १२ जागा.
सफाईवाला (पुरुष) पदांच्या ८९ जागा.
सफाईवाला (महिला) पदांच्या २८ जागा.
जल वाहक (पुरुष) पदांच्या १०१ जागा.
जल वाहक (महिला) पदांच्या १२ जागा.
आणि वेटर (पुरुष) पदांच्या १ जागा.

शैक्षणिक पात्रता –
 पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – 
खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी १००/- रुपये आहे, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी कुठल्याही प्रकारची फीस नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  
दिनांक २६ ऑगस्ट  २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

(कृपया मूळ जाहिरात वाचूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे)

जाहिरात

ऑनलाइन अर्ज

अधिकृत वेबसाईट


अखेर कोविड -19 आली लस. ‌ दिनांक 11 ऑगस्ट 2020 आजची चालू घडामोडी बघितली का

                🎇 अखेर कोविड -19 आली लस🎇


🔰 रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मोठी घोषणा केली आहे. रशियाने कोरोना लस लाँच केली, असे पुतीन यांनी म्हटले आहे. 

🔰 रशियाने आज कोरोना व्हायरसवरील लसीची नोंदणी केली आहे. असं करणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे. 

🔰 माझ्या एका मुलीलाही ही कोरोना लस देण्यात आली आहे, असे पुतीन यांनी स्पष्ट केले आहे.


🟠 या खासगी बँकेनी लोकांमध्ये आशा जागवण्यासाठी ‘कुछ नया सोचो’ मोहीमेचा प्रारंभ केला - येस बँक.

🟣 भारतीय रोखे व विनिमय मंडळाने (SEBI) पोर्टफोलिओ व्यवस्थापकांच्या नोंदणीशी संबंधित कामांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून अर्जदारांना आता SEBIच्या या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सर्व संप्रेषणे दाखल करावी लागणार - पूर्व (कोलकाता), उत्तर (दिल्ली), दक्षिण (चेन्नई) आणि पश्चिम (अहमदाबाद).


🟤 मे 2021 या काळात सेंट पीटर्सबर्ग येथे होणाऱ्या IAA विश्व परिषदेत दिल्या जाणाऱ्या ‘2020 IAA कंपास चॅप्टर एक्सलन्स अवॉर्ड’चा विजेता – IAA इंडिया चॅप्टर.

🟡 ‘फ्यूचरब्रँड इंडेक्स 2020’मध्ये या भारतीय कंपनीला अॅपल कंपनीनंतर दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा ब्रँड म्हणून स्थान मिळाले - रिलायन्स इंडस्ट्रीज.


🔵 ही संस्था आणि आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण संशोधन व क्षमता बांधणी संस्था (IIHEd) यांनी संयुक्तपणे 6 आणि 7 ऑगस्ट 2020 रोजी 'कोविड-19 नंतर विद्यापीठाचे पुनर्गठण आणि रूपांतरण’ या विषयावर एक जागतिक परिषद आयोजित करणार आहे – ओ.पी. जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी.


🔴 चार वर्षांच्या कालावधीसाठी पंतप्रधान कार्यालयात नवीन उपसचिव - नवल किशोर राम.

🔶महाराष्ट्रातील मुख्य संस्था 🔶

1. सत्यशोधक समाज
- स्थापना: 24 सप्टेंबर 1873, पुणे
- संस्थापक: महात्मा फुले 
- ब्रीद वाक्य: सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी

2. प्रार्थना समाज
- स्थापना: 31 मार्च 1867, मुंबई 
- संस्थापक अध्यक्ष: डाॅ. आत्माराम पांडुरंग 
- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले.

3. सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना असोसिएशन)
- स्थापना: 2 एप्रिल 1870, पुणे 
- संस्थापक: न्या. रानडे & गणेश वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी

4. आर्य समाज
- स्थापना: 10 एप्रिल 1875, मुंबई 
- संस्थापक: स्वामी दयानंद सरस्वती

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…