चालू घडामोडी सुपरफास्ट दिनांक 1 सप्टेंबर 2020
जय हिंद मित्रांनो
दररोज या वेबसाईटवर चालू घडामोडी तारखेप्रमाणे टाकल्या जातात. त्यामुळे हे लिंक आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करा. सराव दररोज पोलीस भरतीची सराव प्रश्नपत्रिका याच वेबसाईटवर सोडवायला भेटतील.
चला आजची चालू घडामोडी बघूया
✒️रशियामध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या बहुपक्षीय लष्करी कवायतींमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
✒️माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे.
✒️तर सेंद्रिय शेतीच्या क्षेत्राचा विचार केला तर भारत नवव्या क्रमांकावर आहे.
✒️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे मोदी यांनी संपूर्ण सप्टेंबर महिना हा देशभरात पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल, असं सांगितलं.
✒️‘मेक इन इंडिया’ उपक्रमांपैकी एक असलेल्या या प्रकल्पासाठी संरक्षण मंत्रालयाने एल अँड टी समूह व माझगाव डॉक्स लि.
✒️ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत पहिल्यांदा विजेता ठरला आहे.
✒️ ८४ वर्षीय प्रणव मुखर्जी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आर्मी रुग्णालयात उपचार सुरु होते.
✒️सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे.
✒️सिक्कीम या संपूर्ण राज्यामध्ये केवळ सेंद्रिय शेती केली जाते.
✒️ पूर्णतः सेंद्रिय शेती करणारे हे जगातले पहिले राज्य ठरले आहे.
✒️भारतीय नौदलासाठी 6 पारंपरिक पाणबुडय़ा बांधण्याच्या 55 हजार कोटी रुपयांच्या महाप्रकल्पासाठी पुढील महिन्यापर्यंत निविदा प्रक्रिया सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
✒️या 2 भारतीय शिपयार्ड व 5 विदेशी संरक्षण साहित्य कंपन्या यांची नावे विचारात घेतली आहेत.
✒️‘FIDE ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2020’ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रशिया आणि भारत संघ संयुक्त विजेता ठरले.
✒️आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (FIDE) प्रथमच ऑनलाईन स्वरूपात ऑलिम्पियाडचे आयोजन केले होते.
✒️भारतीय संघात कर्णधार विदित गुजराती, विश्वनाथन आनंद, कोनेरू हम्पी, डी हरिका, आर प्रज्ञानानंद, पी हरीकृष्ण, निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांनी रशियाविरुद्ध भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.
✒️आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ चे मुख्यालय अथेन्स (ग्रीस) येथे आहे.
जय हिंद
जय हिंद

No comments:
Post a Comment