चालू घडामोडी 2020 अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न
1. ...................या संस्थेच्या संशोधकांनी संघटनांना कामाची जागा कोविड-10 विषाणूपासून संरक्षित करण्यात मदत करण्यासाठी ‘वर्कप्लेस रेडीनेस इंडिकेटर’ विकसित केले आहे.
उत्तर-भारतीयविज्ञान संस्था (IISc) बेंगळुरू.
2. 2020 साली ‘जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन’ची संकल्पना............. ही होती. - “फूड.फीड.फायबर.
उत्तर– द लिंक्स बिटविन कन्जम्पशन अँड लँड”.
3. UNCTADच्या ‘जागतिक गुंतवणूक अहवाल 2020’नुसार, 2019 साली भारतात झालेली FDI गुंतवणूक किती.
उत्तर– 51 अब्ज डॉलर (20 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ).
4. .............ही संस्था चीन, जपान, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलँड आणि व्हिएतनाम या देशांना जोडणारी उच्च-कार्यक्षम पाण्याखालून इंटरनेट केबल टाकत आहे .
उत्तर- एशिया डायरेक्ट केबल (ADC) कन्सोर्टियम.
5. इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) यांच्या ‘जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2020’च्या अहवालानुसार भारताचा ............. वा क्रमांक लागतो.
उत्तर- 43 वा.
6. ऑगस्ट 2021 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद ................. या देशांकडे असणार आहे.
उत्तर - भारत.
7. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पर्यटन मंत्रालयाच्या आठवडाभराच्या समारंभाची सुरुवात 15 जूनला सोशल मीडियावरील कार्यक्रमांमधून झाली, जे ..............या विषयावर तयार केले गेले आहेत.
उत्तर - “योग @ होम अँड योग विथ फॅमिली”.
8. ऑन-डिमांड म्हणून सादर केलेली.............. ही भारताची पहिली क्लाऊड सर्व्हिस आहे.
उत्तर- डेटा समुद्र, बेंगळुरू (टेलीइंडियाची उपकंपनी).
9. 21 जून रोजी संगीताच्या माध्यमातून ‘स्पिरिट ऑफ योग’ नावाचा योग उत्सव ...........या संस्थेच्या वतीने जगभरातल्या भारतीय मिशनद्वारे सुरू केला जाणार आहे.
उत्तर - भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR).
10. “ए सॉन्ग ऑफ आइस अँड फायर” मालिकेसाठी सायन्स फिक्शन श्रेणीत ‘टेरन प्राइज’ पुरस्कार.............. यांनी जिंकला आहे.
उत्तर- मौरिस ह्याईम्स (मुंबईत जन्मले).
11. बनारसी पान, बनारसी लंगडा (आंबा), बाराबंकी हातमाग यासाठी GI टॅग प्राप्त करणारे भारतातील राज्य कोणते?
उत्तर - उत्तरप्रदेश.
12. BP कंपनीच्या अहवालानुसार, वर्ष 2019 मध्ये जगातल्या प्राथमिक ऊर्जेचा सर्वाधिक वापर करणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक........... वा लागतो.
उत्तर – द्वितीय (प्रथम: चीन).
13. वर्ष 2021-22 या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी आशिया-प्रशांत प्रदेशातून संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) ...........या देशाचा नवनियुक्त तात्पुरता सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
उत्तर - भारत (आठव्यांदा).
14. वर्ष 2021-22 या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) याचे नवनियुक्त तात्पुरते सदस्य.......... हे आहेत.
उत्तर- भारत, आयर्लंड, मेक्सिको आणि नॉर्वे.
15. संयुक्त राष्ट्रसंघ महासभेचे (UNGA) नवनियुक्त अध्यक्ष........... हे आहेत.
उत्तर- वोल्कन बोजकिर (तुर्की मुत्सद्दी).
16. भारताची पहिली फिरती कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा........... ही आहे .
उत्तर- इनफेक्शीयस डिसीज डायग लॅब लॅब (I-LAB).
17. 24 जून 2020 रोजी........... या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विजय दिनाच्या पथ संचलनामध्ये भाग घेण्यासाठी 75 सदस्यांचे भारतीय त्रि-सेवा पथक पाठविण्याला भारताने सहमती दर्शविली होती.
उत्तर - मॉस्को, रशिया.
18. व्यवसायिक ड्रोन ऑपरेटरसाठी भारतातले पहिले विमा संरक्षण प्रदान करणारी........... ही कंपनी आहे.
उत्तर -HDFC एर्गो (ट्रोपोगोच्या भागीदारीत).
19. ...............या ठिकाणी 10 हजार खाटांचे जगातली सर्वात मोठी कोरोनाव्हायरस रुग्णालय सुविधा उभारण्यात आले आहे.
उत्तर - दिल्ली (राधा सोआमी अध्यात्मिक केंद्रात).
20.जर्मन पबलिशर्स अँड बूकसेलर असोसिएशन द्वारे सादर केलेल्या ‘2020 पीस प्राइज ऑफ द जर्मन बूक ट्रेड’ या पुरस्काराचे विजेते ........... हे आहे.
उत्तर - अमर्त्य सेन (नोबेल पुरस्कार विजेते भारतीय अर्थशास्त्रज्ञ).
_________________________________________________

No comments:
Post a Comment