Monday, September 28, 2020

Current Affairs Suparfast 28 September 2020 most important





✍️ 2020 साली ‘जागतिक पर्यटन दिन’ (27 सप्टेंबर) याची संकल्पना
➡️ “पर्यटन आणि ग्रामीण विकास”.

✍️ 26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत उत्तर अरबी समुद्रात आयोजित करण्यात आलेली भारत आणि जपान या देशांच्या नौदलांदरम्यानची द्विपक्षीय सागरी कवायती
➡️ ‘JIMEX 20’.

✍️ कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, भारताने या शेजारी देशांमध्ये लसीच्या वैद्यकीय चाचणी संशोधनाची क्षमता बळकट करण्यासाठी एका कार्यक्रमाचा आरंभ करून "विज्ञान क्षेत्रातला मुत्सद्देगिरी" उपक्रमाचा आरंभ केला आहे.
➡️ नेपाळ, मालदीव, बांगलादेश, मॉरिशस, श्रीलंका,
 भुटान आणि अफगाणिस्तान

✍️ या देशातला धोरणात्मक दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला ‘हानिमधू आंतरराष्ट्रीय विमानतळ’ भारत विकसित करणार आहे
➡️  मालदीव

✍️ विपणनासाठी प्रतिष्ठित “PATA ग्रँड अ‍ॅवॉर्ड 2020’ याचा विजेता
➡️ केरळ टूरिझमची ‘ह्युमन बाय नेचर’ मोहीम.

✍️ 26 सप्टेंबर रोजी भारताने या देशासोबत बौद्धिक संपदा सहकार्याच्या क्षेत्रात सामंजस्य करार केला
➡️ डेन्मार्क

✍️आसाममधल्या नव्या भारतीय कृषी संशोधन संस्थेचे ठिकाण
➡️ गोगामुख

✍️ अकरा राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या संस्थेच्या ‘वन अर्थ वन होम’ उपक्रमाचा आरंभ केला आहे
➡️ WWF-इंडिया

✍️या विषयाखाली 27 सप्टेंबर रोजी चार दिवस चालणाऱ्या “डेस्टिनेशन नॉर्थ-ईस्ट-2020” या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले
➡️ “उदयोन्मुख रमणीय गंतव्य” (The Emerging Delightful Destinations)

✍️“किचेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड” या पुस्तकाचे लेखक
➡️ विकास खन्ना

✍️ FIRST कन्स्ट्रक्शन कौन्सिल या संस्थेच्यवतीने दिलेले, प्रतिष्ठित “कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इयर 2020’ या पुरस्काराचे प्राप्तकर्ता
➡️ डॉ. ब्रिजेश दिक्षित (महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक)

✍️ फ्रान्स प्रेस एजन्सी आणि रिपोर्टर विथ बॉर्डर्स या संस्थांच्या भागीदारीने ग्लोबल मीडिया फोरम या संस्थेच्यवतीने दिलेले, धैर्यवान आणि नैतिक पत्रकारितेसाठी “पीटर मॅक्लेर पारितोषिक 2020” याचे विजेता
➡️ मसरत झाहरा (काश्मिरी छायाचित्र पत्रकार)

✍️ खादी व ग्रामोद्योग आयोगाचे नवनियुक्त सल्लागार
➡️ सुनील सेठी (भारतीय फॅशन डिझाईन परिषदेचे अध्यक्ष)

✍️ इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन (ICRIER) या संस्थेचे 15 वर्ष अध्यक्ष राहिलेले पद्मभूषण पुरस्कारप्राप्त अर्थशास्त्रज्ञ, ज्यांचे 26 सप्टेंबर रोजी निधन झाले
➡️ इशर जज अहलुवालिया

✍️ “सेऊल पीस प्राइज 2020’ याचे विजेता
➡️ थॉमस बाख (आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे विद्यमान अध्यक्ष)

✍️ “2019-20 AIFF फुटबॉलर ऑफ द ईयर” पुरस्काराचे विजेते
➡️ गुरप्रीत सिंग संधू (पुरूष) आणि संजू यादव (महिला)

✍️ आशियाई विकास बँकेनी (ADB) या राज्यातल्या किमान 14 दुय्यम शहरांमध्ये पाणीपुरवठा व स्वच्छताविषयक पायाभूत सुविधा व सेवांच्या निर्मितीसाठी 300 दशलक्ष डॉलर (सुमारे 2200 कोटी रुपये) एवढ्या रकमेच्या कर्जाला मान्यता दिली
➡️ राजस्थान

✍️ या राज्य सरकारने 26 सप्टेंबर रोजी ‘मुख्यमंत्री किसान कल्याण योजना’चा आरंभ केला
➡️ मध्यप्रदेश

✍️ केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी या केंद्रशासित प्रदेशातल्या भादरवाह येथे “पोस्ट-हार्वेस्ट मॅनेजमेंट सेंटर फॉर मेडिसीनल प्लांटस’चे भूमिपूजन केले
➡️ जम्मू व काश्मीर


No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…