Monday, August 31, 2020

current affairs 2020 -चालू घडामोडी सुपरफास्ट दिनांक 31 ऑक्टोबर 2020



 चालू घडामोडी सुपरफास्ट दिनांक 31 ऑगस्ट 2020





✒️कोनेरू हम्पी हिने शानदार कामगिरी करत महत्त्वाच्या क्षणी विजय मिळवल्यामुळे भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पोलंडचा पराभव करून फिडे ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या अंतिम फे रीत धडक मारली आहे.

✒️शुक्रवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी अमेरिकेला इशारा दिला जर वी-चॅटवर अमेरिकेनं बंदी घातली तर चीनचे नागरिक अॅपल कंपनीवर बहिष्कार टाकतील, असं ते म्हणाले.
✒️दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिवंगत सुशांतचा सन्मान केला जाणार आहे. 

✒️दादासाहेब फाळके पुरस्कारची सुरवात 1969 साली झाली. 

✒️ पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्या तर्फे दिला जातो व पुरस्कारात सुवर्ण कमळ आणि 10 लाख रुपये यांचा समावेश असतो.

✒भारताचे माजी क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी यांचा शनिवार, 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते खेळ प्रोत्साहन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

️✒ASEAN समूह आणि भारत या देशांच्या अर्थ मंत्र्यांची 17 वी सल्ला-मसलत बैठक आभासी पद्धतीने 29 ऑगस्ट 2020 रोजी घेण्यात आली.

️✒️बैठकीला ASEAN समूहाच्या सर्व 10 देशांचे प्रतिनिधी आणि भारताच्यावतीने केंद्रीय वाणिज्य व उद्योग तसेच रेल्वे मंत्री पीयूष गोयल उपस्थित होते.

✒️पीयूष गोयल आणि व्हिएतनामचे उद्योग मंत्री त्रान तुआन अन्ह यांनी बैठकीचे अध्यक्षपद संयुक्तपणे भूषवले.

✒️आग्नेय आशियाई राष्ट्र संघ (Association of Southeast Asian Nations -ASEAN) ही आग्नेय आशियामधली एक राजकीय व आर्थिक संघटना आहे.

✒️त्याची स्थापना इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर व थायलँड या देशांनी 8 ऑगस्ट 1967 रोजी केली.

✒️जकार्ता (इंडोनेशिया) शहरात त्याचे मुख्यालय आहे.

✒️आज समूहात ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलँड आणि व्हिएतनाम या 10 देशांचा समावेश आहे.

✒️भारतात दरवर्षी 29 ऑगस्ट या दिवशी ‘तेलुगू भाषा दिन’ साजरा केला जातो प्रसिद्ध तेलुगू लेखक गिडीगु वेंकट राममूर्ती यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो

✒️चक्रवर्ती समिती (Chakravarty Committee) भारतीय मौद्रिक प्रणालीच्या कामकाजासंबंधीचा अभ्यास करण्याकरिता स्थापन करण्यात आलेली समिती.

✒️“राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान” (National Digital Health Mission) या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…