Saturday, September 26, 2020

Current Affairs Suparfast 26 September 2020 In Marathi




Current Affairs Suparfast 26 September 2020

✍️QS ग्लोबल MBA रँकिंग 2021’ याच्या यादीत जागतिक स्तरावर 50 व्या क्रमांकावर आणि भारतात पहिल्या क्रमांकावर असलेली संस्था
➡️ भारतीय व्यवस्थापन संस्था अहमदाबाद

✍️‘फ्रॉस्ट अँड सुलिवान आणि द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट (TERI) सस्टेनेबिलीटी 4.0 पुरस्कार 2020’ समारंभात मेगा लार्ज बिझिनेस प्रोसेस श्रेणीत लीडर पुरस्कार जिंकणारे
➡️ गेल इंडिया

✍️ या केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने मेंढ्या आणि बकरींच्या एककांची स्थापना करण्यासाठी 2020-21 सालासाठी एकात्मिक मेंढी विकास योजना लागू केली
➡️ जम्मू व काश्मीर

✍️ महाराष्ट्र राज्याचे अधिकृत राज्य कांदळवन वृक्ष
➡️'सफेद चिप्पी' (शास्त्रीय नाव: सोनेरेटीया अल्बा किंवा मॅनग्रोव्ह अॅपल)

✍️ अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री म्हणून पदभार स्वीकारणारी व्यक्ती
➡️ नरेंद्र सिंह तोमर (केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री, ग्रामीण विकास मंत्री आणि पंचायतराज मंत्री)

✍️ वर्ष 2019 साठी 55 व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित होणारी व्यक्ती
➡️ अक्किथम अच्युथन नामबोथीरी (मल्याळम कवी)

✍️ आफ्रिका आणि आशिया प्रदेशातल्या कोळसा प्रकल्पांना होणारा वित्तपुरवठा कमी करण्याच्या उद्देशाने या संस्थेनी व्यापारी बँकांमध्ये होणाऱ्या गुंतवणूकीसाठी हवामान बदलांविषयीच्या नवीन अटी सूचित केल्या आहेत
➡️ आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ (IFC)

✍️ या देशाचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी 23 सप्टेंबर रोजी आपल्या सहाव्या कार्यकाळासाठी पदाची शपथ घेतली
➡️ बेलारूस

✍️ जगातला सर्वात दीर्घ आणि सर्वोच्च उंचीवर बांधला जाणारा ‘शिंकुन ला बोगदा’ (13.5 कि.मी. लांबी) या देशात तयार करण्याची योजना आखली जात आहे
➡️ भारत (लडाख आणि हिमाचल प्रदेश जोडण्यासाठी)

✍️12 डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघ आणि हा देश जागतिक हवामान शिखर परिषद आयोजित करणार आहे
➡️ ब्रिटन

✍️ या संस्थेनी नवीन ‘ग्रीन सिटीज इनिशिएटिव्ह अँड अॅक्शन प्लॅन’चे अनावरण केले आहे ज्याचा हेतू पुढील तीन वर्षांत जगभरात किमान 100 शहरांमधल्या शहरी लोकांचे जीवनमान सुधारणे हा आहे
➡️ खाद्यान्न व कृषी संघटना (FAO)

✍️ ही बँक ‘सेफपे’ नामक संपर्क-रहीत डेबिट कार्डमार्फत देयकाची सुविधा सादर करीत आहे
➡️ IDFC फर्स्ट बँक

✍️ स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने (एसएफसी) आणि भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) डिझाइन केलेले कमी पल्ल्याच्या.........या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
➡️  'पृथ्वी'  (पृथ्वी शॉर्ट-रेंज बॅलेस्टिक क्षेपणास्त्र)



No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…