Saturday, August 8, 2020

T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच

 ​​T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच 



🔶T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढील दोन वर्षांत होणाऱ्या दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धाच्या आयोजनाविषयीचा निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्यकारी मंडळाची शुक्रवारी बैठक झाली.


🔶व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत २०२१ आणि २०२२च्या टी-२० विश्वचषकाच्या यजमानपदाबद्दल निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २०२१चा टी-२० विश्वचषक भारतातच होणार असून २०२२चा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त टाईम्सनाऊने दिले आहे. याशिवाय २०२१मध्ये न्यूझीलंडमध्ये होणारा महिला वन डे विश्वचषकदेखील पुढे ढकलण्यात आला आहे.


🔶महिलांचा २०२१ एकदिवसीय विश्वचषक तसेच पुरुषांचे पुढील दोन टी-२० विश्वचषक यांच्या आयोजनाविषयी या बैठकीत चर्चा झाली. ऑस्ट्रेलियातील ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२०मध्ये होणारा टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया २०२१च्या यजमानपदासाठी आग्रही होते. त्यामुळे भारताला २०२१ऐवजी २०२२च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळू शकते असे बोलले जात होते. पण अखेर २०२१च्या टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारताकडेच कायम असून २०२२चा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार आहे.

पोलीस भरती 2020 ऑनलाईन टेस्ट -3 विषय - सामान्य ज्ञान (membership only)

पोलीस भरती 2020 ऑनलाईन फ्री टेस्ट - 10

गिरीश चंद्र मुर्मू यांची कॅगपदी (Comptroller and Auditor General of India ) नियुक्ती

  ✍️गिरीस चंद्र मुर्मू यांची कॅगपदी (Comptroller and Auditor General of India ) नियुक्ती✍️


◾️केंद्र सरकारनं ३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरचं विभाजन करून केंद्र शासित प्रदेश केला.

◾️ त्यानंतर गिरीश चंद्र मुर्मू यांचीराष्ट्र जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदी नियुक्ती केली होती.

◾️मुर्मू यांची कॅगपदी (Comptroller and Auditor General of India ) नियुक्ती केली आहे.

◾️गुजरात केडरचे आयएएस अधिकारी असलेल्या जी.सी. मुर्मू यांनी २९ऑक्टोबर २०१९ रोजी उपराज्यपालपदाची सूत्रे हाती घेतली होती.

◾️उपराज्यपाल पदीचा कारभार हाती घेण्यापूर्वी मुर्मू वाणिज्य मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत होते.

◾️नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जी.सी. मुर्मू हे प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते.

◾️कॅगचा कार्यकाळ सहा वर्षांचा आहे. मात्र, या पदासाठी निवृत्तीचं वय ६५ वर्ष असून, मुर्मू हे केवळ पाच वर्षच पदावर राहू शकतात.

◾️ कॅग हे घटनात्मक पद असून, केंद्र आणि राज्य सरकारांच्या खात्यांचं लेखा परिक्षण करण्याची जबाबदारी कॅगवर असते.

◾️पूर्व नयाब राज्यपाल गिरीष चंद्र मूर्मू   जागी आता मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Friday, August 7, 2020

लिलाव प्रक्रियेद्वारे ठरवणार प्रो कबड्डी लीगच्या आगामी हंगामाचे प्रक्षेपण.

लिलाव प्रक्रियेद्वारे ठरवणार प्रो कबड्डी लीगच्या आगामी हंगामाचे प्रक्षेपण.

 देशातील दुसऱ्या क्रमांकाची लोकप्रिय लीग असा दर्जा प्राप्त करणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या आगामी हंगामाचे प्रक्षेपणाचे हक्क लिलाव प्रक्रियेद्वारे ठरण्याची दाट शक्यता आहे.

 सध्याचे प्रक्षेपणकर्ते स्टार इंडिया यांच्या महसूल वाटपाच्या प्रस्तावामुळे संघ आणि संयोजक मशाल स्पोर्ट्स पेचात सापडले आहेत.

 स्टार इंडियाने यापेक्षा उत्तम प्रस्ताव ठेवला नाही, तर प्रक्षेपणाचे हक्क पारदर्शक लिलाव पद्धतीने निश्चित व्हावे, यासाठी सर्व संघमालकांनी एकत्रित येऊन मोर्चेबांधणी केली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

 इंडियन प्रीमियर लीगप्रमाणे प्रो कबड्डी लीगचा लिलाव व्हावा. ते स्टार इंडियाला थेट देऊ नये, अशी मागणी आम्ही मशाल स्पोर्ट्सकडे केली आहे.

 प्रो कबड्डी लीगचे बाजारमूल्य उत्तम आहे. स्टारच्या मशाल स्पोर्ट्समधील भागीदारीत हितसंबंध दडले आहेत.

पोलीस भरती 2020 ऑनलाईन टेस्ट -1 विषय बुद्धिमत्ता चाचणी (membership only)

महाराष्ट्र शासनाचा गूगल सोबत शिक्षणासंबंधित करार


  महाराष्ट्र शासनाचा गूगल सोबत शिक्षणासंबंधित करार 


📌 सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने भागिदारी केली आहे. 


📌 या उपक्रमाची अधिकृत घोषणा आज (7 Aug 2020)  ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. 


📌 या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत.


📌 ‘जी स्वीट फॉर एज्युकेशन’, ‘गूगल क्लासरूम’, ‘गूगल मीट’ यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय यामुळे होणार आहे.


पोलीस भरती ऑनलाईन फ्री टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Maharashtra police bharti 2020 online free test


पोलीस भरती 2020 ऑनलाईन फ्री टेस्ट - 9

पोलीस भरती 2020 ऑनलाईन मेंबरशिप बद्दल माहिती

 पोलीस भरती 2020 ऑनलाइन टेस्ट देताना येणाऱ्या अडचणी बाबत.
     जय हिंद मित्रांनो
पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन टेस्ट देताना काही ही टेस्ट ओपन होते परंतु त्याला पासवर्ड मागितला जातो त्याशिवाय टेस्ट चालू होत नाही मित्रांनो असे जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल त्याचा एक सोलुशन आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मेंबरशिप घेतली आहे त्या विद्यार्थ्याने जवळ या सर्व प्रकारच्या टेस्टच्या पासवर्ड आहेत. आता आपण बघुया मेंबरशिप घेण्याचा फायदा काय आहे.
1. तुम्हाला रोज 25 मार्काची एक टेस्ट पेपर मिळणार.
2. आठवड्यातून एक दिवस 100 मार्काची टेस्ट पेपर मिळणार
3. सर्व प्रकारच्या गणित आणि बुद्धिमत्ता हे प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना सुटत नसेल त्यांच्यासाठी पूर्णपणे प्रश्न सोडून दिले जातील शिवाय तुम्ही व्हाट्सअप वरती चॅटिंग पण करू शकतात.
4. मेंबरशिप घेण्यासाठी फक्त आपल्याला महिन्याला शंभर रुपये ऑनलाईन पे करायचा आहे. मेंबरशिप घेण्यासाठी खालील लिंक वर जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्या फॉर्ममध्ये ऑनलाइन पेमेंट कसं करायचं त्याबद्दल माहिती भरायचे आहे सुरुवातीला तुम्हाला स्वतःची डिटेल भरायचे आहे. नंतर ऑनलाईन पे ऑप्शन येईल.
मेंबरशिप फॉर्म लिंक खालील प्रमाणे.
Online Test Membership Form

                                         जय हिंद.

Thursday, August 6, 2020

पोलीस भरती ऑनलाईन 2020 फ्री टेस्ट - 2 विषय सामान्य ज्ञान

कोविड-19 विषाणूसंबंधित देशातल्या पाच समर्पित बायोरेपॉझिटरी

कोविड-19 विषाणूसंबंधित देशातल्या पाच समर्पित बायोरेपॉझिटरी

🔸केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नेतृत्वात देशतला पहिला ‘1000 SARS-CoV-2 RNA जीनोम सिक्वेंसींग’ कार्यक्रम यशस्वी पार पाडला गेला आहे. जैवतंत्रज्ञान विभागाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

🔸यांच्या अंतर्गत देशभरात आढळलेल्या रुग्णांची आणि केलेल्या तपासणीतून निष्पन्न झालेली संपर्ण माहिती एका ठिकाणी डिजिटल स्वरूपात गोळा करण्यात आली ज्याला ‘बायोरिपॉझटरी’ असे म्हटले जाते. अश्या भारतात पाच समर्पित कोविड-19 बायोरिपॉझटरी स्थापन करण्यात आल्या आहेत.

त्या पुढीलप्रमाणे आहेत –

ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (THSTI) फरीदाबाद

इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्स (ILS) भुवनेश्वर

इंस्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीअरी सायन्स (ILBS) नवी दिल्ली

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS) पुणे

इंस्टिट्यूट फॉर स्टेम सेल सायन्स अँड रीजनरेटिव्ह मेडिसिन (InStem) बेंगळुरू.

🔸आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते जैवतंत्रज्ञान विभागाने विक्रमी वेळेत स्थापना केलेल्या या आस्थापनांच्या सर्वात मोठ्या जाळ्याचा शुभारंभ करण्यात आला आणि त्या राष्ट्राला समर्पित केल्या.

🔸देशभरातल्या संशोधकांना संशोधनासाठी हा सिक्वेन्स डेटा जागतिक प्रयत्नांचा भाग म्हणून लवकरच सामायिक केला जाणार आहे. या माहितीच्या आधारे विषाणूचा प्रसार कश्या पद्धतीने होत आहे ते समजण्यास मदत होणार आणि त्यावर संक्रमण साखळी तोडणे, नवीन संक्रमणास प्रतिबंध घालणे आणि अश्या विविध उपायांवर संशोधन करता येणार आहे.


आज जागतिक हिरोशिमा दिवस

📣 आज जागतिक हिरोशिमा दिवस

💁‍♂ इतिहासातील काळा दिवस :

◾️6 ऑगस्ट 1945 हा मानवाच्या इतिहासातील अतिशय दुर्दैवी, काळा दिवस आहे.

◾️ मित्र राष्ट्रांनी जपानमधील एक संपन्न शहर हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकून सार्‍या जगाला स्तब्ध केले.

◾️या बॉम्बचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की, तीन लाख वस्तीचे हे शहर क्षणात नष्‍ट झाले. या दुर्दैवी घटनेला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत.
त्यानिमित्ताने या घटनेची ही आठवण..

💣 *विध्‍वंसाची झलक दाखविणारा ‘लि‍टल बॉय’* :
जवळजवळ 4 हजार किलोग्रॅम वजनाच्या या बॉमची लांबी 3 मीटर आणि व्यास 71 सेंटीमीटर होता.

◾️ हिरोशिमावर टाकलेला बॉम्ब हा युरेनियम गन टाईप अ‍ॅटोमिक बॉम्ब होता.

◾️ त्याचा स्फोट हिरोशिमा शहराच्या 2000 फूट उंचावर झाला. त्यात शहराचा पाच चौ. मैल एवढा भाग नष्ट पावला.

👉 या दोन्ही शहरांत मरण पावलेल्या लोकांतील निम्मे लोक हे बॉम्ब टाकलेल्या दिवशीच मरण पावले.

◾️त्यानंतरच्या महिन्यात अनेक जण भाजलेल्या जखमांमुळे, उत्सर्जित किरणाच्या आजारामुळे, अन्य जखमा, अपुरा आहार व आजार यामुळे मृत्यू पावले.

📍 *जगात अणुवस्त्र चाचण्या सुरूच* :

▪ हिरोशिमा, नागासाकी शहरांवरील हल्ल्यानंतरही जगात 2 हजारांहून अधिक आण्विक शस्त्रांच्या चाचण्या झाल्या.
▪ 1945 ते 1980 या काळात जगातील 500 हून अधिक ठिकाणी वातावरणातील आण्विक शस्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या.
▪ चाचणी घेणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान व उत्तर कोरिया या देशांचा समावेश आहे.

👀 *जगभरातील कोणत्या देशांकडे किती अण्वस्त्र* :
1⃣ *रशिया* : 6800 अण्वस्त्र
2⃣ *अमेरिका* : 6600 अण्वस्त्र
3⃣ *फ्रान्स* : 300 अण्वस्त्र
4⃣ *चीन* : 270 अण्वस्त्र
5⃣ *ब्रिटन* : 215 अण्वस्त्र
6⃣ *पाकिस्तान* : 130-140 अण्वस्त्र
7⃣ *भारत* : 120-130 अण्वस्त्र
8⃣ *इस्रायल* : 80 अण्वस्त्र
9⃣ *उत्तर कोरिया* : 10-20 अण्वस्त्र

संकलन:- सचिन गुळीग

पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट येथे द्या

आंतराष्ट्रीय सौर युती (ISA) उपक्रमाचा विस्तार

आंतराष्ट्रीय सौर युती (ISA) उपक्रमाचा विस्तार

🔸आंतराष्ट्रीय सौर युती (ISA) याचा लाभ संपूर्ण जगाला मिळावा या उद्देशाने जगव्यापी विस्ताराच्या दृष्टीने ‘ISA कार्यचौकटी’मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.

🔸दुरुस्तीच्या प्रस्तावानुसार, उष्णप्रदेशापलीकडील देशांसह संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय गटाचे सर्व 192 सदस्य आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात.

आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA)

🔸पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार आणि फ्रांस सरकार यांच्यावतीने सुरू करण्यात आलेला एक जागतिक उपक्रम आहे. भारतात गुडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-सरकारी संस्था आहे.

🔸पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांस राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली. आतापर्यंत 121 संभाव्य सदस्य देशांपैकी 81 देशांनी ISAच्या कार्यचौकटीच्या संदर्भात करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यापैकी 58 देशांनी त्यास मान्यता दिली आहे.

🔸या उपक्रमाच्या अंतर्गत भारत आणि स्वीडन या देशांनी आपल्या इतर भागीदारांसोबत उद्योग रुपांतरणाची नोंद ठेवण्यासाठी एका नवीन नेतृत्व गटाची स्थापना केली आहे. हा उपक्रम सरकारी आणि खासगी क्षेत्रासोबत एकत्रित काम करून कमी कार्बन उत्सर्जनाचे मार्ग शोधून काढण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे.

पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट फ्री सोडवण्यासाठी खालील लिंक वर जा.

पोलीस भरती 2020 ऑनलाईन फ्री टेस्ट आताच द्या

Monday, August 3, 2020

पोलीस भरती 2020 ऑनलाईन फ्री टेस्ट- 6

Amazon Jobs Recruitment Notification 2020.(कोणतीही फी नाही)



अ‍ॅमेझॉन जॉब भर्ती अधिसूचना २०२०. 

पदाचे नाव:-
अ‍ॅमेझॉन डेटा अभियंता, सिस्टम stनालिस्ट आणि इतर पोस्ट या पदासाठी अर्ज मागवत आहे. इच्छुक व पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख
 31 डिसेंबर 2020 आहे.

पोस्ट आणि रिक्त जागा:

डेटा अभियंता, व्यवसाय बुद्धिमत्ता व्यवस्थापक, ईएचएस सिस्टम विश्लेषक, व्यवसाय इंटेलिजेंस अभियंता आणि इतर

शैक्षणिक पात्रता:

उमेदवारांचे पदवीधर, पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
इतर वार-नंतरच्या शैक्षणिक पात्रतेचा तपशील कृपया अधिकृत अधिसूचनेवर जा.

वय मर्यादा:

Age ॲमेझॉन कंपनीच्या नियमांनुसार उमेदवारांची वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल मर्यादा असावी.
वय मर्यादा - अनुसूचित जाती / जमाती / ओबीसी / पीडब्ल्यूडी / पीएच उमेदवारांना शासन नियमनियमानुसार लागू राहील

शुल्काचा तपशील:

उमेदवार टीप सर्व पदांसाठी अर्ज फी नाही

निवड प्रक्रिया:

गट चर्चा / मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज कसा करावा:
अर्ज करण्याची पद्धत: -ऑनलाईन मार्गे

नोकरीचे स्थानः 
संपूर्ण भारत 

पात्र उमेदवार 1 मे 2020 च्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा खालील अर्जांवर अर्ज करू शकतात.

महत्त्वाच्या तारखा:
अर्ज सादर करण्यासाठी प्रारंभ तारीख: 1 मे 2020.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीखः 31 डिसेंबर 2020
Official notification

Flipkart online job requirement 2020 total post Online - 12870 Posts

Flipkart Jobs,latest private jobs,private jobs
Flipkart Jobs Recruitment Notification 2020.Flipkart inviting applications for the positions of Online.Interested and Eligible candidates can apply for the positions.

Last Date for Submission of Application is on December 31st, 2020.

Post and Vacancies:
Online - 12870 Posts

Educational Qualifications:
Candidates should have passed 12th Class, Graduate, Post Graduation.
Other posts wise education qualification details please go to the official notification.

Age Limit:
Candidates age limit should be Minimum 18 years & Maximum 45 years.
Age Relaxation: – SC/ ST /OBC/PWD/ PH Candidates Relaxation as per Government Rule Regulation.

Fees Details:
No fee for General/OBC/SC/ST candidates.
Other fee details go to official notification.

Pay Scale:
For candidates pay scale Rs 20000–58200/-
Other pay scale details go to official notification.

Selection Process:
Candidates will be selected based on Interview.

How To Apply:
Mode of Apply:- Through Online.
Eligible candidates can apply through from official website 29 December 2019 or at Click on the below How to Apply links.

Important Dates:
Starting Date for Submission of Application: 29 December 2019.
Last Date for Submission of Application: 31 December 2020.

Official notification

(कृपया व्यवहार करताना पूर्णपणे खात्री करूनच व्यवहार करावे या व्यवहारासाठी ही वेबसाईट कोणत्याही प्रकारे जिम्मेदारी घेत नाही)



तलाठ्यांची रिक्त पदे भरा, अन्यथा आंदोलन ः ज्ञानदेव डुबल


तलाठ्यांची रिक्त पदे भरा, अन्यथा आंदोलन ः ज्ञानदेव डुबल


30 टक्के पदे रिक्त आहेत. त्यासाठी महसुल खात्याने 2019 मध्ये भरती केली. त्यातुन परिक्षा घेऊन निकाल जाहीर झाला. मात्र, पात्र उमेदवारांना अद्यापही नोकरीत सामावुन घेतलेले नाही. त्यामुळे कार्यरत असणाऱ्या तलाठ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासनाने केले आहे. ही पदे तातडीने भरली नाहीत तर तलाठी संघ राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी दिला आहे.

श्री. डुबल म्हणाले," राज्यात तलाठ्यांच्या 30 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या तलाठ्यांवर संबंधित तलाठ्यांच्या कामाचा बोजा येत आहे. त्यामुळे अनेक तलाठ्यांना शारिरीक व्याधी सुरु झाल्या आहेत.काहींचा त्यातच मृत्युही झाला आहे. त्याची माहिती वारंवार आम्ही शासनाला दिली आहे.

शासनाने मागील वर्षी 2019 मध्ये तलाठी भरती प्रक्रिया राबवली. त्यात राज्यातील 1618 जागांसाठी लाखो तरुणांनी अर्ज केले होते. त्याच्या निकालाची यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यानंतर काही जिल्हाधिकारी कार्यालयांनी भरती प्रक्रीया पुर्ण करुन उमेदवारांना नियुक्ती दिली, तर काही जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन ही कार्यवाही अंतिम टप्प्यात होती.

त्याच दरम्यान वित्त विभागाने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची भरती करु नये, असे निर्देश दिले.'' भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असलेल्या औरंगाबाद आणि नांदेड कार्यालयांनी तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश द्यावे किंवा कसे याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते.

त्यावर शासनाने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्र पाठवुन अंतिम निवड यादी प्रसिध्द केली. निवड यादीनुसार उमेदवारांना नियुक्ती देणे किंवा पद भरती करणे योग्य नाही. चार मे 2020 च्या शासन निर्णयानुसार पद भरती करु नये. पद भरतीवरील निर्बंध उठल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात यावा.

तसेच निवड यादी पुढील एक वर्षापर्यंत वापरण्याबाबत विभागाने सामान्य प्रशासन विभागाची मान्यता घ्यावी, असे शासनाने यामध्ये कळविले आहे. कोरोनासारख्या महाभयंकर संकटास शासनाचा तळागाळातील प्रतिनिधी तथा शासनाच्या गाडीचा कणा म्हणून स्वतःच्या जिवाची व कुटुंबाची परवा न करता काम करणाऱ्या तलाठी व मंडलाधिकारी यांना महसूल दिनी शासनाने ही भेटच दिली आहे. त्याचा आम्ही निषेध करत आहोत, असे त्यांनी सांगितले.




भारतीय सैन्य दलात सैनिक (महिला सैन्य पोलीस) पदांच्या एकूण ९९ जागा

पदे - भारतीय सैन्य दलात सैनिक (महिला सैन्य पोलीस) 

एकूण पदे - 99                


भारतीय सैन्य दल यांच्या आस्थापनेवरील महिला सैनिक (सामान्य सैन्य पोलीस) पदांच्या एकूण ९९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

शैक्षणिक पात्रता

उमेदवार मेट्रिक/ दहावी/ एसएसएलसी किंवा एकूण ४५% गुणांसह समकक्ष परीक्षा उतीर्ण असावा.


अर्ज करण्याची शेवटची तारीख

दिनांक 31 ऑगस्ट  2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येती


टिप -  अधिकमाहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.





     

बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर लिपिक व लिपिक पदाच्या 28 जागा

बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर लिपिक व लिपिक पदाच्या 28 जागा

बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध खेळाडू उमेदवारांसाठी विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २८ जागा
अधिकारी आणि लिपीक पदांच्या जागा

फीस – 
खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी २०० /- रुपये आहे 
 प्रवर्गातील उमेदवारासाठी  ५०/- रुपये आहे.

वयोमर्यादा – 
उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष व कमाल वय २५ वर्ष दरम्यान असावे.
 (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख
 दिनांक १६ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघावी.




Sunday, August 2, 2020

पोलीस भरती 2020 ऑनलाइन टेस्ट - 5

भारताचा “ग्रीन-ॲग” प्रकल्प/ सेहवाग, सरदार राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीत

सेहवाग, सरदार राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीत

माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आणि हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या १२ जणांच्या निवड समितीत स्थान देण्यात आले आहे. या वर्षीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचे मानकरी ठरवण्याची जबाबदारी या १२ जणांवर असणार आहे, असे क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले.
अपंग क्रीडापटू दीपा मलिकचाही या १२ जणांमध्ये समावेश आहे. एकच निवड समिती क्रीडा पुरस्कार निवडीसाठी ठेवण्याचे गेल्या वर्षीपासून सुरू केले आहे. यंदाही तीच पद्धत अवलंबवण्यात येणार आहे. खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद हे पुरस्कार या एकाच समितीमार्फत ठरवण्यात येणार आहेत.

✍️भारताचा “ग्रीन-ॲग” प्रकल्प✍️

कृषी क्षेत्रात होणाऱ्या कार्बनच्या उत्सर्जनाच्या प्रमाणात घट करण्यासाठी आणि शाश्वत शेतीपध्दती सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने नवा “ग्रीन-अॅग” (Green-Ag) प्रकल्प चालवत आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प मिझोरम राज्यात राबवला जात आहे. हा मिश्र भूमीपयोगी प्रणालींसह पाच प्रकारच्या भूमीवर कमीतकमी 1.8 दशलक्ष हेक्टर क्षेत्रात बहुविध जागतिक पर्यावरणविषयक लाभ मिळविण्यासाठी तयार केलेला प्रकल्प आहे.

हा प्रकल्प प्रारंभी मध्यप्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, मिझोरम आणि राजस्थान या पाच राज्यांमध्ये राबवला जाणार आहे. पुढे संपूर्ण भारतात यांची अंमलबजावणी होणार.

टपाल तिकीटावर दिसणार राम मंदिर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार प्रकाशित.

टपाल तिकीटावर दिसणार राम मंदिर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार प्रकाशित.

👉 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा भूमिपूजनाचा सोहळा पार पडल्यानंतर त्याच दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराची प्रातिनिधिक चित्र असणारे आणि रामायणावर आधारित पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले जाण्याची शक्यता आहे.

👉 राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची जोरदार तयारी अयोध्येत सुरु झाली आहे. असं असतानाच या सोहळ्याचे आयोजक असणाऱ्या राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टने राम भक्तांना पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत येऊन गर्दी करु नये असं आवाहन केलं आहे. सर्व राम भक्तांना ‘राम जन्मभूमी मंदिर निर्माण यज्ञा’मध्ये सहभागी होण्याची संधी योग्यवेळी दिली जाईल असंही ट्रस्टने स्पष्ट केलं आहे. अयोध्या रिचर्स इन्स्टीट्यूटचे निर्देशक व्हाय. पी. सिंग यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार पोस्टाचे विशेष तिकीट प्रकाशित केलं जाणार आहे.

👉“सर्व काही ठरवल्याप्रमाणे झालं तर पाच ऑगस्ट रोजीच पोस्टाचे तिकीट प्रकाशित केलं जाईल. यापैकी एक तिकीट हे राम मंदिराची प्रातिनिधिक प्रतिकृती असणारं असेल तर दुसऱ्यावर इतर देशांमध्ये रामाचे महत्व सांगणाऱ्या गोष्टी असतील,” असं सिंग यांनी सांगितलं आहे. अयोध्या रिसर्च इन्स्टीट्यूटच्या माध्यमातून रामलीलेसंदर्भातील काही विशेष पोस्टर आणि कटआऊट्स बनवले जात आहेत.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा लांबणीवर

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा लांबणीवर.

👉करोनाच्या साथीमुळे यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा एक किंवा दोन महिने लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रपती भवनाकडून निर्देश मिळाल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

👉महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन २९ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त दरवर्षी राष्ट्रपती भवनात राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद असे प्रतिष्ठेचे पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात. परंतु या वर्षी करोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे पुरस्कारांच्या वितरणास विलंब होणार आहे. मात्र अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही.

👉‘‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आम्ही निर्देशांच्या प्रतीक्षेत आहोत. परंतु राष्ट्रपती भवनाकडून आम्हाला अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे सध्या तरी याबाबत कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही. करोनाच्या साथीमुळे सध्या देशात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणे कठीण आहे,’’ असे क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

गलवान खोऱ्यातील २० शहिदांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर.

गलवान खोऱ्यातील २० शहिदांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर.

👉 पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जूनला चिनी फौजांशी शौर्याने लढताना शहीद झालेल्या २० भारतीय जवानांची नावे राजधानीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरली जाणार आहेत. यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.

👉 भारत व चीन यांच्या फौजांमध्ये १५ जूनच्या रात्री गेल्या पाच दशकांतील सर्वात भीषण संघर्ष झाला होता. चीनतर्फे गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉइंट १४च्या परिसरात टेहळणी चौकीच्या उभारणीला भारतीय सैनिकांनी विरोध केल्यानंतर, चिनी सैनिकांनी खिळे लावलेल्या काठय़ा, लोखंडी कांबी वापरून त्यांच्यावर भीषण हल्ले केले होते. यात शहीद झालेल्या लष्करी जवानांमध्ये १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी कर्नल बी. संतोष बाबू यांचा समावेश होता.

👉 या घटनेमुळे पूर्व लडाखच्या सीमेवरील तणाव मोठय़ा प्रमाणात वाढला. भारताने याचे वर्णन ‘चीनची पूर्वनियोजित कृती’ असे केले होते.

👉 संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी १७ जुलैला पूर्व लडाखमधील लुकुंग सीमा चौकीला दिलेल्या भेटीत, बिहार रेजिमेंटच्या सैनिकांनी चिनी फौजांशी लढताना दाखवलेल्या अतुलनीय धैर्याचे कौतुक केले होते

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या ५८४६ जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या ५८४६ जागा


स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत दिल्ली पोलिस दलात पुरुष व महिला कॉन्स्टेबल (कार्यकारी) पदांच्या एकूण ५८४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कॉन्स्टेबल (कार्यकारी) पदांच्या ५८४६ जाग

1. कॉन्स्टेबल (पुरुष) पदांच्या ३४३३ जागा
 
2. कॉन्स्टेबल (महिला) पदांच्या १९४४ जागा 

3. कॉन्स्टेबल (माजी सैनिक) पदाच्या ४६९ जागा 

शैक्षणिक पात्रता –

उमेदवार १०+२ (वरिष्ठ माध्यमिक) मान्यताप्राप्त मंडळामधून उत्तीर्ण झालेला असावा. (पीई अँड एमटीच्या तारखेनुसार पुरुष उमेदवारांकडे एलएमव्ही (मोटर सायकल किंवा कार) चा वैध ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे. मात्र शिकाऊ परवाना स्वीकारला जाणार नाही.

वयोमर्यादा –

उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष असावे व कमाल वय २५ वर्ष दरम्यान असावे.

फीस – 
1.पुरुष - उमेदवारांकरिता १००/- रुपये आहे
2.महिला -  उमेदवारांकरिता कुठलीही फीस नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

दिनांक ७ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघावे.



अधिक माहितीसाठी 9967566868 या नंबर वर संपर्क साधा


औरंगाबाद महात्मा गांधी मिशन विद्यापीठात वैद्यकीय पदांच्या भरपूर जागा


औरंगाबाद महात्मा गांधी मिशन विद्यापीठात वैद्यकीय पदांच्या भरपूर जागा

महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध वैद्यकीय पदांच्या जागा
1.संचालक
2.प्राध्यापक
3. सहयोगी प्राध्यापक
4.सहाय्यक प्राध्यापक
5. इतर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – 
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –
careers@mgmu.ac.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख -

दिनांक १० ऑगस्ट  २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…