चालू घडामोडी~ सुपरफास्ट~ दिनांक 5 सप्टेंबर 2020
➡️2 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत “राष्ट्रीय नागरी सेवा क्षमता विकास कार्यक्रम” (NPCSCB) राबविण्यासाठी मंजुरी दिली गेली.
➡️हा निर्णय भारत सरकारच्या नव्या “मिशन कर्मयोगी” या अभियानाच्या अंतर्गत घेण्यात आला आहे.
➡️भारताने जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (WIPO) ‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020’मध्ये 48 वा क्रमांक मिळवलेला आहे.
➡️मध्य आणि दक्षिण आशियायी देशात भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
➡️गरीब देशांमध्ये भारत जगातला तिसऱ्या क्रमांकाची नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्था आहे.
➡️स्वित्झर्लंड हा देश GII 2020 याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
➡️ स्वीडन द्वितीय तर अमेरिका हा देश तृतीय क्रमांकावर आहे.
➡️जनता दल-यूनायटेड (JD-U), बिहार हा देशातला पहिला राजकीय पक्ष ज्याने स्वतःचे बहू-कार्ये डिजिटल संकेतस्थळ तयार केले.
➡️भारतीय रेल्वे मंडळाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. के. यादव आहेत.
➡️भारतीय वास्तुविद्या संस्था (IIA) या संस्थेच्यावतीने दिला गेलेला वर्ष 2020 साठी ‘बाबुराव म्हात्रे सुवर्ण पदक’ जिंकणारा व्यक्ती एस. गोपाकुमार आहेत.
➡️केरळस्थित साऊथ इंडियन बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मुरली रामकृष्णन यांची निवड झाली.
➡️आतापर्यंतचा पहिला "इंटरमीडिएट मास" कृष्णविवर, ज्याचे वजन आपल्या सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 142 पट जास्त आहे GW190521.
➡️भारतीय रेल्वे संघाकडून सलग ११ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व केलेले महाराष्ट्रातील अमर पवार (७१ वर्षे) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
➡️रिलायन्स जिओ इन्फ्राटेल कंपनीच्या वायरलेस इन्फ्रास्ट्रक्चरच्या (मोबाइल टॉवर्स) २५,२१५ कोटी रुपयांच्या विक्रीसाठी भारत सरकारनं ब्रुकफिल्ड असेट मॅनेजमेंटला मंजुरी दिल्याचं वृत्त आहे.
➡️रशियाने विकसित केलेली आणि मंजुरी दिलेली ‘स्पुटनिक व्ही’ ही करोनावरील लस प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे समोर आले आहे.
➡️भारतीय नौदल आणि रशियाचे नौदल यांचा 11 वा द्वैवार्षिक संयुक्त सागरी सराव 4 आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आला आहे.
➡️“इंद्रा नेव्ही-20”चा मुख्य उद्देश दोन्ही नौदलामधले आंतर-संचालन अधिक दृढ करणे आणि बहु आयामी सागरी अभियानासाठी आकलन आणि पद्धती विस्तृत करणे हा आहे.
➡️‘बँकिंग नियमन अधिनियम-1949’च्या अंतर्गत 27 जुलै 2020 पासून ही बँकिंग कंपनी बंद झाली - आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक.
➡️कॅनेडियन स्पेस एजन्सीची प्रथम महिला अध्यक्ष - लिसा कॅम्पबेल
➡️भारत आणि हा देश यांच्या भागीदारी अंतर्गत दाऊकंडी-सोनमुरा (त्रिपुरा) अंतर्देशीय जलमार्ग शिष्टाचार मार्ग कार्यरत झाला - बांगलादेश.
➡️आदिवासी कल्याण मंत्रालय आणि भारतीय लोक प्रशासन संस्था (IIPA), नवी दिल्ली या संस्थांमध्ये या शहरात राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्था (NITR) उभारण्यासाठी करार झाला - नवी दिल्ली.
➡️पोलीस ठाण्यात स्वयंचलित ट्रान्सक्रिप्शन सिस्टमद्वारे केस डायरी लिहिण्यास प्रारंभ करणारा भारतातला पहिला राज्य पोलीस विभाग - बिहार.
➡️महाराष्ट्र सरकारने या शहरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील आरे मिल्क कॉलनीतली 600 एकर भूमी राखीव वन म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला - मुंबई.
➡️मुलींचे शिक्षण आणि आरोग्य सुधारण्यासाठी या राज्य सरकारने मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना लागू केली आहे - उत्तरप्रदेश
➡️आसाम सरकारची स्वयंरोजगार योजना - स्वामी विवेकानंद आसाम युवा सशक्तीकरण (स्वयम) योजना.

No comments:
Post a Comment