Wednesday, September 2, 2020

Chalu ghadamodi 2 September 2020 - चालू घडामोडी सुपरफास्ट दिनांक 2 सप्टेंबर 2020



  चालू घडामोडी सुपरफास्ट दिनांक 2 सप्टेंबर 2020




महत्वाची चालू घडामोडी



✒️श्रीगरमधील दहशतवाद्यी कारवायांच्या बिमोड करण्यासाठी आता सीआरपीएफने प्रथमच एका महिला अधिकाऱ्याकडे दहशतवाद विरोधी अभियानाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.

✒️सन १९९६ च्या बॅचमधील तेलंगण केडरच्या आयपीएस अधिकारी चारू सिन्हा आता श्रीनगर सेक्टरमध्ये सीआरपीएफच्या महानिरीक्षक (आयजी) म्हणून काम पाहणार आहेत.

✒️भारताचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांनी 1 सप्टेंबर 2020 रोजी पदभार स्वीकारला.

✒️मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या हस्ते 30 ऑगस्ट 2020 रोजी पहिल्या "रोल ऑन रोल ऑफ' (रो-रो) रेल्वे सेवेचे आभासी पद्धतीने उद्‌घाटन करण्यात आले. 

पोलीस भरती फ्री सराव पेपर


✒️ही सेवा बंगळुरू (नेलमंगला) आणि सोलापूर (बाळे, महाराष्ट्र) या शहरांच्या दरम्यान आहे.

✒️अत्यावश्‍यक वस्तूंची जलद वाहतूक करण्यासाठी रेल्वे मंडळाने एप्रिलमध्ये बंगळुरू (नेलमंगला) ते सोलापूर (बाळे, महाराष्ट्र) पर्यंत पहिल्या "रोल ऑन रोल ऑफ' (रो-रो) सेवेला मान्यता दिली होती.

✒️पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात पुन्हा घुसखोरी करून ‘जैसे थे’ परिस्थिती बदलण्याचा चिनी लष्कराचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला, अशी माहिती लष्कराने सोमवारी दिली.

✒️पूर्व लडाखमधील पँगाँग टीएसओ क्षेत्रातील दक्षिण किनाऱ्याजवळ २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. 

✒️भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीत एप्रिल ते जून २०२० या तिमाहीत तब्बल २३.९ टक्क्यांनी घट झाली आहे. 

✒️हाफीजने टी२० क्रिकेटमधील २००० धावांचा टप्पा गाठला. २००० धावा आणि ५० बळी अशी दुहेरी कामगिरी करणारा हाफीज पहिलाच पुरूष क्रिकेटपटू ठरला.


पोलीस भरती सराव पेपर सामान्य ज्ञान


✒️चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोव्हा आणि जर्मनीची अँजेलिक कर्बर यांनी सोमवारी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत विजयी सलामी नोंदवली.

✒️मुंबईतील आतंरराष्ट्रीय विमानतळ विकसित करणाऱ्या जीव्हीके समूहाच्या मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ लि (एमआयएएल) या कंपनीचा ७४ टक्के वाटा अधिग्रहित करण्याचे समीकरण अदानी समूहाने जुळवले असून त्यामुळे मुंबई विमानतळाबरोबरच नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पही अदानी समूहाच्या ताब्यात गेला आहे. 

✒️न्यायालय अवमान प्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना सुप्रीम कोर्टाने एक रुपयाचा दंड ठोठावला आहे. 

✒️ 9 एप्रिल 2020 रोजी जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्था (WADA) यांच्यावतीने ‘प्ले सेफ ऑन प्ले ट्रू डे 2020’ कार्यक्रम आयोजित केला गेला होता.

✒️अहमदपूर येथील वीर मठ संस्थांचे मठाधिपती डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज (वय १०३) यांचे मंगळवारी (१ सप्टेंबर) नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना सायंकाळी चार वाजता निधन झाले. 

✒️डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जन्म १९१७मध्ये झाला होता.

✒️भारताच्या पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिवरामकृष्ण अय्यर पद्मावती यांचं शनिवारी (दि.२९) निधन झालं, त्या १०३ वर्षांच्या होत्या.

पोलीस भरती सराव पेपर 100 गुण

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…