Friday, August 14, 2020

दिनांक 14 ऑगस्ट 2020 अतिशय महत्त्वाची चालू घडामोडी

दिनांक 14 ऑगस्ट 2020 अतिशय महत्त्वाची चालू घडामोडी


उपाध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या सिनेटर कमला देवी हॅरिस यांची निवड.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

👉अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी उपाध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या सिनेटर कमला देवी हॅरिस यांची निवड केली.निवडून आल्यास त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष असतील. शिवाय पहिल्या भारतीय-अमेरिकी तसेच आफ्रिकी उपाध्यक्ष असतील.

👉अमेरिकेत कृष्णवर्णीयांवरील अत्याचाराच्या घटनांनंतर अशांतता माजली असताना हॅरिस यांची उमेदवारी डेमोक्रॅटिक पक्षाला फायदेशीर ठरणार आहे.बायडेन यांनी उपाध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच कृष्णवर्णीय महिलेची निवड करून एक इतिहास घडवला आहे. हॅरिस यांचे वडील हे जमैकातील, तर आई भारतीय आहे.

‼️प्रामाणिक करदात्यांसाठी एक नवं व्यासपीठ केंद्र शासनाने तयार केले.‼️

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

👉टॅक्स वेळेत भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (13 ऑगस्ट) एक ‘गूड न्यूज’ देणार आहेत.
👉प्रामाणिक करदात्यांसाठी एक नवं व्यासपीठ केंद्र शासनाने तयार केलं असून याची पंतप्रधान मोदी उद्या घोषणा करणार आहेत.

👉‘पारदर्शी कर आकारणी : प्रामाणिकतेचा सन्मान’ (Transparent Taxation : Honouring the Honest) असं या व्यासपीठाचं नाव आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) याबाबत माहिती देण्यात आली आहे.

👉फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची पात्रता फेरी लांबणीवर.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

👉करोना साथीच्या पार्श्वभूमीवर ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धा तसेच आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या आशियाई देशांची पात्रता फेरी लांबणीवर टाकण्यात आले.

👉तर भारतीय फुटबॉल संघाला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी क्रीडा चाहत्यांना अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

👉2022 मध्ये कतार येथे फिफा विश्वचषक, तर 2023 मध्ये आशिया चषक रंगणार आहे. या दोन्ही स्पर्धासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आशियातील संघांचे पात्रता सामने खेळवण्यात येणार होते.

👉भारताने गतवर्षी ओमानविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला असून पात्रता फेरीत 8ऑक्टोबर रोजी कतारविरुद्ध, तर अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध नोव्हेंबर महिन्यात भारताचा सामना होणार होता.

👉‘बीसीसीआय’चे ‘अर्थलक्ष्य’.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

👉‘सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ’ असा रुबाब असणारे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आर्थिक अडचणीत नाही, असा दावा अध्यक्ष सौरव गांगुलीने नुकताच केला होता. सध्या करोना साथीच्या कठीण कालखंडातही लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीगद्वारे (आयपीएल) तीनशे कोटी रुपयांहून अधिक ‘अर्थलक्ष्य’प्राप्तीची योजना ‘बीसीसीआय’ने आखली आहे.

👉चिनी मोबाइल कंपनी विवोशी संबंध तोडल्यानंतर येत्या ७२ तासांत ‘बीसीसीआय’चे अर्थभरारी स्पष्ट होऊ शकेल, असा क्रिकेटवर्तुळातील जाणकारांचा अंदाज आहे. ‘बीसीसीआय’ने विवोच्या जागी शीर्षक प्रायोजक ठरवताना तीनशे कोटी रुपयांचे लक्ष्य आखले आहे. शीर्षक प्रायोजकाच्या शर्यतीत अ‍ॅमेझॉन, बायजू, ड्रीम ११, अनअ‍ॅकॅडमी, इंडिया इंक शर्यतीत आहेत.

👉मार्चपासून क्रिकेट स्थगित असल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचे प्रायोजक बायजूचे काही प्रमाणात पैसे वाचले आहेत. परंतु हा आकडा आश्चर्यकारक भरारी घेऊ शकेल, अशी ‘बीसीसीआय’ला अपेक्षा आहे. याचप्रमाणे अधिकृत सहप्रायोजकांचा आकडा तीनवरून पाचपर्यंत वाढवताना प्रत्येकी ४० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे करार डिसेंबपर्यंत चार महिन्यांसाठीच आहेत. मंडळाने आपले पत्ते अद्याप खुले केले नसले तरी आर्थिक अडचणीच्या काळातही भारतीय क्रिकेट जागतिक क्रीडा क्षेत्राचे लक्ष वेधू शकेल.

👉ट्रम्प प्रशासनाकडून भारतीयांना सर्वाधिक फायदा.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

👉अमेरिकेतील सत्ताधारी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसा धारकांना दिलासा दिला आहे.

👉H-1B व्हिसावरील निर्बंध थोडे शिथिल केले आहेत. याआधी ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसा धारकांना अमेरिकेत प्रवेशबंदीचा निर्णय लागू केला होता.

👉लॉकडाउन आधी जे काम करत होते, त्याच नोकरीसाठी H-1B व्हिसा धारकांना अमेरिकेत परतायचे असेल तर, त्यांना परवानगी देण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे.

👉H-1B व्हिसावरील निर्बंध शिथिल करण्याचा भारतीयांना सर्वाधिक फायदा होईल.

👉H-1B हाच व्हिसा घेऊन भारतीय अमेरिकेत जातात तसेच याच व्हिसावर भारतीय मोठया संख्येन तिथे नोकरी करतात.

🔶करोना प्रतिबंधक लशीची खरेदी केंद्रीय स्तरावर केली जाणार.🔶

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

👉करोना प्रतिबंधक लशीची खरेदी केंद्रीय स्तरावर केली जाणार असून राज्यांनी स्वतंत्रपणे लस खरेदी करू नये, अशी सूचना राष्ट्रीय तज्ज्ञ गटाने सर्व राज्यांना केली आहे. त्यामुळे लशीची खरेदी आणि वितरण दोन्हीही केंद्रिभूत केले जाणार आहे.

👉भारत हा जगातील प्रमुख लस उत्पादन केंद्रांपैकी असल्याने करोनाच्या लशीसाठी देशी उत्पादन क्षमतेचा पुरेपूर वापर कसा करता येऊ शकेल तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरही लस उत्पादक देशांशी समन्वय कसा साधता येईल, या दोन प्रमुख मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आल्याचे केंद्र सरकारच्या निवेदनात नमूद केले आहे.
केंद्र सरकारने राज्यांना वितरित केलेल्या कृत्रिम श्वसन यंत्रांच्या वापरासंदर्भातील अचूक माहिती उपलब्ध होणारी यंत्रणा विकसित केली गेली

पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिकेतील स्क्वेअरवर तिरंगा फडकवला जाणार.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

👉भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकणार आहे.
विशेष म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनानिमित्त स्क्वेअरवर तिरंगा फडकवला जाणार आहे.

👉अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि कॉन्टेकट या तीन राज्यांमधील भारतीयांचा समावेश असणाऱ्या एफआयएने जारी केलेल्या पत्रकामध्ये, “आम्ही इतिहास घडवणार आहोत,” असं म्हटलं आहे.15 ऑगस्ट 2020 रोजी टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडवणार आहोत,” असंही या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

केंद्र सरकारनं घेतला वेतनाशी निगडित मोठा निर्णय.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

👉कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं एक निवेदन जारी केलं आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या सुरक्षेशी निगडित हे निवेदन आहे. याअंतर्गत सातव्या वेतन आयोगाच्यानुसार केंद्र सरकारमध्ये थेट भरतीद्वारे स्वतंत्र सेवेत किंवा संवर्गात नवीन पदावर नेमणूक झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्याला आपल्या वेतनाचं संरक्षण मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या FR 22-B(1) अंतर्गत हे संरक्षण देण्यात येणार येणार आहे.

👉सातव्या सीपीसी अहवाल आणि सीसीएस (आरपी) नियम २०१६ लागू झाल्यानंतर राष्ट्रपतींनी FR 22-B(1) अंतर्गत करण्यात आलेल्या तरतुदींनुसार केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना प्रोटेक्शन ऑफ पेची मंजुरी दिल्याचं कार्यालयीन निवेदन नमूद करण्यात आलं आहे. ज्यांना इतर सेवांमध्ये किंवा संवर्गात प्रोबेशनर म्हणून नियुक्त केले गेले आहे, त्यांच्याकडे अधिक जबाबदारी असो किंवा नसो. ही ऑर्डर १जानेवारी २०१६ पासून लागू होईल.

👉FR 22-B(1) च्या ‘प्रोटेक्शन ऑफ पे’ संबंधी मंत्रालय आणि काही विभागांकडून संदर्भ देण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारचे जे कर्मचारी राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारच्या अन्य सेवांमध्ये किंवा कॅडरमध्ये नव्या पदावर नियुक्त होतात, त्यांना सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर वेतन निश्चितीसाठी काही मार्गदर्शक सूचना असणं आवश्यक असल्याचं निदर्शनास आलं, असं त्या निवेदनात नमूद करम्यात आलं आहे. FR 22-B(1) च्या तरतुदींमध्ये हे नियम त्या सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनाशी निगडित आहेत जे दुसरी सेवा आणि कॅडरमध्ये प्रोबशनर म्हणून नियुक्त झाले आहेत आणि त्यानंतर त्यांना सेवांमंध्ये कायम करण्यात आलं आहे.

राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा MPSC चा निर्णय.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

👉एमपीएससीकडून १३ सप्टेंबरला होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला असून आता २० सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे. एमपीएसीकडून पत्रकाद्वारे अधिकृतरित्या हे जाहीर करण्यात आले आहे.

👉करोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तिसऱ्यांदा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक १७ जून रोजी जाहीर करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि  अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार होत्या. मात्र, १३ सप्टेंबर रोजी देशभरात नीट परीक्षा होणार असून त्याच दिवशी राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार होती. त्यामुळे एमपीएससीने पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

👉एमपीएससीने २३ डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीनुसार, राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० रविवार, ५ एप्रिल २०२० रोजी घेण्याचे निश्चित केले होते. मात्र, करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे १७ जून २०२० रोजी एमपीएससीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही परीक्षा १३ सप्टेंबर रोजी घेण्याचे घोषीत केले. आयोगाकडून परीक्षेचा दिनांक निश्चित करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून ३ जुलै २०२० रोजीच्या सूचनेद्वारे राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) १३ सप्टेंबर २०२० रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…