Saturday, August 15, 2020

दिनांक 15 ऑगस्ट 2020 सविस्तर चालू घडामोडी/current affairs 2020 in Marathi

"पारदर्शक करप्रणाली - प्रामाणिकाचा सन्मान" यासाठीच्या मंचाचे उदघाटन

🔸 नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत "पारदर्शक करपद्धती - प्रामाणिकाचा सन्मान" ('ट्रान्सपॅरेंट टॅक्सेशन – ऑनरिंग द ऑनेस्ट’) यासाठीच्या नव्या मंचाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

🔸या मंचावर, फेसलेस म्हणजेच चेहराविरहित मूल्यांकन, फेसलेस अपील आणि करदात्यांची सनद अशा मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. फेसलेस मूल्यांकन आणि करदात्यांची सनद 12 ऑगस्टपासून लागू करण्यात आली आहे. तर फेसलेस अपीलची सुविधा 25 सप्टेंबर 2020 रोजी संपूर्ण देशभरातल्या नागरिकांना उपलब्ध होणार.

🔸करदात्यांची सनद हे देखील देशाच्या विकासयात्रेतले महत्वाचे पाऊल आहे, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच करदात्यांचे अधिकार आणि त्यांची कर्तव्ये यांचे संहितीकरण करण्यात आले आहे आणि त्यांना मान्यता देण्यात आली आहे. करदात्यांना याप्रकारचा सन्मान आणि सुरक्षा देणाऱ्या जगातल्या अगदी मोजक्या देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे.

पार्श्वभूमी

🔸अलिकडच्या काही वर्षांत केंद्रीय थेट कर आकारणी मंडळाने (CBTD) थेट करांमध्ये अनेक मोठ्या कर सुधारणा केल्या आहेत. गेल्या वर्षी कॉर्पोरेट कराचे दर 30 टक्क्यांवरून 22 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले होते आणि नव्या उत्पादन केंद्रासाठी हे दर 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले. ‘लाभांश वितरण कर' देखील हटविले गेले.

🔸कर सुधारणांच्या अंतर्गत कर दरामध्ये कपात करणे आणि थेट कर कायद्यांचे सुलभीकरण यावर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. आयकर विभागाच्या कामकाजात कार्यक्षमता आणि पारदर्शकता आणण्यासाठी CBDTने कित्येक पुढाकार घेतले आहेत. त्यामध्ये,

🔸नव्याने सुरू केलेल्या कागदपत्र ओळख क्रमांकाद्वारे (DIN) अधिकृत माहितीमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचा समावेश आहे. याच्या अंतर्गत विभागाच्या प्रत्येक संवादामध्ये संगणकाद्वारे उत्पन्न झालेला वेगळा कागदपत्र ओळख क्रमांक असतो.

🔸वैयक्तिक करदात्यांसाठी आयकर विवरण पत्र मान्य होणे अधिक सुलभ होण्यासाठी आयकर विभाग आधीच माहिती भरलेली आयकर विवरण पत्र सादर करीत आहे.

स्टार्टअप्सचे अनुपालन निकषसुद्धा सुलभ केले आहेत.

आयकर विभागाचे उपक्रम

🔸प्रलंबित कर विवादांचा निपटारा करण्याच्या उद्देशाने आयकर विभागाने प्रत्यक्षकर, 'विवाद से विश्वास अधिनियम, 2020' अंतर्गत आणला असून याच्या अंतर्गत सध्या विवादांची प्रकरणे सोडवण्यासाठी माहिती पत्र भरून घेतली जात आहेत.

🔸करदात्यांच्या तक्रारी / खटल्यांमध्ये प्रभावी कपात व्हावी यासाठी विविध अपील न्यायालयात विभागीय अपील दाखल करण्यासाठी प्रारंभिक आर्थिक मर्यादा वाढविण्यात आल्या आहेत.

🔸डिजिटल व्यवहार आणि इलेक्ट्रॉनिक पद्धती किंवा देय देण्याच्या पद्धतींना चालना देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.

🔸कोविड कालावधीत करदात्यांचे अनुपालन सुलभ करण्यासाठीही विभागाने विविध प्रयत्न केले ज्याच्या अंतर्गत रिटर्न अर्ज भरण्यासाठी वैधानिक अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे आणि करदात्यांच्या हाती तरलता किंवा रोखतावाढवण्यासाठी परतावा जलदगतीने देण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींनी मोडला अटल बिहारी वाजपेयींचा विक्रम - मानाच्या ‘या’ यादीत चौथ्या स्थानवर झेप.

🔷पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिवंगत माजी पंतप्रधान अजट बिहारी वाजपेयी यांचा विक्रम मोडला. मोदी हे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे काँग्रेस पक्षाबाहेरील नेता ठरले आहेत. तर सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणाऱ्यांच्या यादीमध्ये मोदींनी चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. यासंदर्भातील माहिती भाजपानेच दिली आहे. भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

🔶२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकामध्ये भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला. त्यानंतर २६ मे २०१४ रोजी मोदींनी देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. २०१४ नंतर २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाने २०१४ पेक्षा मोठा विजय मिळवला आणि मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले.

🔷“आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या इतिहासामध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान असणारे चौथे पंतप्रधान ठरले आहेत. तसेच ते सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे काँग्रेस बाहेरील पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या सर्व कार्यकाळामध्ये एकूण दोन हजार २६८ दिवस पंतप्रधानपद भूषवलं होतं. आज पंतप्रधान मोदी या बाबतीत त्यांच्या पुढे निघून गेले,” अशं मालवीय यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

यूएई-इस्राएल राजनैतिक संबंध प्रस्थापित होणार.

🔰पॅलेस्टाइनला रोखण्यासाठी संयुक्त अरब अमिरात (यूएई) आणि इस्राएल प्रथमच एकत्र आले असल्याचे संकेत मिळाले आहेत. यूएई आणि इस्राएलने परिपूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचे मान्य केले आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी जाहीर केले.

🔰ट्रम्प यांनी घोषणा केल्याने इस्राएलशी सक्रिय राजनैतिक संबंध प्रस्थापित करणारे यूएई हे आखातातील पहिले आणि तिसरे अरब राष्ट्र ठरले आहे. अफगाणिस्तानातील युद्ध संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नांना यश मिळालेले नाही.

🔰त्याचप्रमाणे इस्राएल आणि पॅलेस्टाइन यांच्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांतून कोणताही मार्ग निघालेला नसताना ट्रम्प यांनी वरील घोषणा करणे हा त्यांचा नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीचा राजनैतिक विजय असल्याचे मानले जाते.

केंद्राला परीक्षा हव्यात.‼️

🍀अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) भूमिकेला केंद्र सरकारने पाठबळ दिले आहे. सर्व विद्यापीठांना अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास अनुमती देण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने प्रतिज्ञापत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. या प्रकरणावर आज, शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

🍀परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने ६ जुलै रोजी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. परीक्षा ऑनलाइन, ऑफलाइन किंवा संमिश्र पद्धतीने घेण्याची मुभाही आयोगाने दिली. या परीक्षा ३० सप्टेंबपर्यंत पूर्ण कराव्यात, अशा सूचना आयोगाने विद्यापीठांना दिल्या होत्या.

🍀या प्रकरणात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रालाही दिले होते. त्यावर भूमिका मांडताना केंद्रीय गृहमंत्रालयाने आयोगाच्या निर्णयाचे समर्थन करीत परीक्षांना अनुमती देण्यात आल्याचे स्पष्ट केले. याबाबत मनुष्यबळ विकास मंत्रालयाशीही चर्चा करण्यात आली. टाळेबंदी शिथिलीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातही शैक्षणिक संस्था ३१ ऑगस्टपर्यंत बंद असल्या तरी अंतिम वर्षांच्या परीक्षा व मूल्यमापनासाठी त्यांना र्निबधातून सूट देण्यात आल्याचे गृहमंत्रालयाने न्यायालयात सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकारणीसंदर्भातील महत्वाच्या घोषणा केल्या.

🔆पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर आकारणीसंदर्भातील पद्धतीमध्ये बदल करण्यासंदर्भातील महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

🔆प्रामाणिक करदात्यांसाठी कर जमा करण्याची पद्धत अधिक सोयिस्कर करण्याच्या दृष्टीने सरकारने ‘पारदर्शी कर आकारणी’ पद्धतीची घोषणा केली आहे.

🔆मात्र ही घोषणा करतानाच पंतप्रधानांनी या पुढे आयकर कार्यालयाचे स्वरुप पुर्णपणे बदलणार असल्याचे संकेत दिले आहेत.

🔆या नवीन बदलांमुळे करदात्यांना फायदा होणार असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

थायलंडमध्ये संशोधक वटवाघुळ पकडण्यासाठी ट्रेकिंग करत आहेत.

💮थायलंडमध्ये संशोधक वटवाघुळ पकडण्यासाठी खेड्यापाड्यांमधून ट्रेकिंग करत आहेत.

💮संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या करोना व्हायरस या आजाराच मूळ शोधून काढणं हा थायलंडमधल्या संशोधकांचा ट्रेकिंगमागचा मूळ उद्देश आहे.

💮जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या डाटानुसार, आतापर्यंत जगभरात अडीच कोटी लोकांना करोना व्हायरसची बाधा झाली आहे.

💮थायलंडमध्ये हॉर्सशू वटवाघुळाच्या 19 प्रजाती आहेत. पण करोना व्हायरसंबंधी अजून त्यांची चाचणी झालेली नाही असे संशोधकांनी सांगितले

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चष्मांचा ब्रिटनमध्ये लिलाव करण्यात येणार.

♒️राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दोन चष्मांचा ब्रिटनमध्ये लिलाव करण्यात येणार आहे.

♒️शंभर वर्षे जुने असलेले हे चष्मे गांधीजींनी वापरले असल्याने त्याला ऐतिहासिक महत्व असून या चष्म्यांची लिलावातील किंमत ही थक्क करणारी आहे.

♒️या चष्म्यांची किंमत 10,000 ते 15,000 पौंड म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 9 ते 14 लाख रुपये होईल असे सांगण्यात येत आहे.

♒️हे चष्मे सन 1900 मध्ये महात्मा गांधींनी वापरले होते. काही काळ वापरल्यानंतर त्यांनी आपले हे चष्मे आपल्या एका सहकार्याला भेट म्हणून दिले होते.

♒️सध्या ऑनलाइन लिलावात या चष्म्यांना 6000 पौंडांची बोली लागली आहे. ही बोली 10,000 ते 15,000 पौंडांपर्यंत जाऊ शकते.

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…