Thursday, August 13, 2020

भारत सरकारच्या काही महत्त्वाच्या योजना

भारत सरकारच्या काही महत्त्वाच्या योजना


1) स्वनिधी योजना
PM - SVANidhi Scheme
(Prime Minister - Street Vendor AtmaNirbhar Nidhi Scheme)

लाभार्थी - ग्रामीण तसेच शहरी भागात रोडवर व्यवसाय करणारे 50 लाख व्यावसायिक

योजना स्वरूप - रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या जवळपास 50 लाख व्यावसायिकांना आजीविका पुन्हा सुरू करण्यासाठी 10000 कर्ज देण्याची योजना

या कर्जाची परतफेड मासिक हप्त्यांत 1 वर्षात करावयाची आहे.

2) "ई-संजीवनी"
- आयुष्यमान भारत(२०१८-सुरुवात) या योजनेअंतर्गत डॉक्टर ते डॉक्टर व पेशन्ट ते डॉक्टर असे दोन स्वरूपात उपलब्ध केलेले सर्वसमावेशक टेलिमेडिसीन प्लॅटफॉर्म!

3)  "मुख्यमंत्री किसान साहाय्य योजना"

- गुजरात सरकारची ही योजना प्रधानमंत्री पीकविमा योजना ऐवजी राबवणार आहे.

 केंद्र सरकारने पॉवरलूम बोर्ड बरखास्त केले(स्थापन- १९८१)
- राष्ट्रीय हातमाग दिनाच्या (७ ऑगस्ट) दिवशीच हातमाग मंडळ बरखास्त केले होते!


4) "माऊंट सिनबुंग"

- सुमात्रा बेटाजवळील इंडोनेशियामधील ४०० वर्ष निद्रिस्त असलेला हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला!


- भारतातील जागृत ज्वालामुखी-

बॅरेन, अंदमान बेटे! तर नारकोंडम(अंदमान), धोसी, तोशाम(हरियाणा), धिंनोधार(गुजरात) यापैकी अंदमानमधील वगळता इतर सर्व extinct मानले जातात!

केंद्रीय खादी व ग्रामोद्योग आयोगाने अरुणाचल प्रदेशमध्ये "रेशीम प्रशिक्षण व उत्पादन केंद्र" स्थापन करण्याचा निर्णय घेतला...

- भारतात रेशीमचा ४ जाती पैकी सर्वाधिक क्षेत्र, 

मलबेरी(७४.५१%), एरी(१६.५%), टसर(८.५%), मुगा(०.५५%) 
- रेशीम उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक
- समग्र रेशीम योजना- २०१७ ते २०२० या कालावधीत राबवली गेली.
- केंद्रीय रेशीम महामंडळ ची स्थापना/ १९४८(मुख्यालय-बेंगळुरू)

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…