Wednesday, August 12, 2020

दिनांक 12 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी

संरक्षण क्षेत्रातल्या सार्वजनिक आधुनिकीकरण प्रकल्प तसेच नवीन पायाभूत सुविधांचे उद्घाटन.


संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते 10 ऑगस्ट 2020 रोजी ‘आत्मनिर्भर भारत’ सप्ताहाच्या अंतर्गत संरक्षण क्षेत्रातले सार्वजनिक उपक्रम तसेच दारुगोळा निर्मिती मंडळ (OFB) यांच्या अंतर्गत येणाऱ्या सुविधांचे आधुनिकीकरण तसेच नवीन पायाभूत सुविधांचे डिजीटल माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.

आधुनिकीकरण उपक्रमाच्या अंतर्गत,

ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथील पिनाक रॉकेट कॉम्प्लेक्स येथे पिनाक आणि इतर अग्निबाणासाठी लागणाऱ्या विस्तारीत गरजांच्या पूर्ततेसाठी अत्याधुनिकीकरण करण्यात आले आहे.

OLF देहरादून याच्या अत्याधुनिकीकरणामुळे टी-90 रणगाड्यांच्या अत्याधुनिक ऑप्टोइलेक्ट्रॉनिक घटकांची निर्मिती होणार.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या कंपनीने उत्पादनासाठी पूर्णपणे स्वदेशी ‘मरीच’ एकात्मिक सुविधा तयार केली आहे, DRDOने विकसित केलेल्या टॉर्पेडो-भेदी संरक्षण प्रणालीचे मरीचसोबत एकत्रीकरण आणि चाचणी केली आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या कंपनीने ‘500 वे AL-31FP ओव्हरहाल्ड इंजिन’ भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केले आहे, जे Su-3

वेंकटरायपूर आणि नोलियासाही (ओडिशा): UNESCO-IOC तर्फे “सुनामी रेडी” दर्जा प्राप्त करणारी गावे

ओडिशाची किनारपट्टीवरील वेंकटरायपूर (गंजम जिल्हा) आणि नोलियासाही (जगतसिंगपूर जिल्हा) या दोन गावांना UNESCOच्या आंतरसरकारी सागरविज्ञान आयोग (IOC) तर्फे “सुनामी रेडी” म्हणजेच "सुनामीसाठी तयार" हा दर्जा दिला गेला आहे. हा दर्जा प्राप्त करणारी ही भारतातली तसेच हिंद महासागर प्रदेशातली प्रथम गावे आहेत.

UNESCO-IOC यांचा “सुनामी रेडी” उपक्रम

ज्या ठिकाणी सुनामी येण्याचा धोका असतो तेथील लोकांना वेळेवर त्याचा अचूक इशारा मिळाला तर त्यांचा जीव वाचविण्यासाठी ते प्रयत्न करू शकतात,नुकसान कमी होते आणि प्रतिसाद वाढवता येतो, असे निदर्शनास आले आहे. त्यासाठी म्हणून संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) यांच्या आंतरसरकारी सागरविज्ञान आयोगाने (IOC) “सुनामी रेडी” हा सुनामीच्या तयारीवर आधारित असलेला कार्यक्रम तयार केला आहे.

किनारपट्टीवरील लोकांना सुनामीच्या धोक्यासाठी तयार करणे, जिवितहानी आणि मालमत्तेची हानी कमी करणे आणि समुदायाची रचनात्मक आणि पध्दतशीरपणे उत्तम सराव संकेत तयार करणे ही या कार्यक्रमाची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत.

‘द इंडियन सुनामी अर्ली वाँर्निंग सेंटर’ (ITEWC) यांची इनकाँईस (INCOIS) ही संस्था भारतातली सुनामी सल्ला देणारी विभागीय संस्था आहे.

हिंद महासागर क्षेत्रात (25 देशांना) सुनामी संबंधीत सेवा देण्याची जबाबदारी इनकाँईस या संस्थेकडे आहे.

UNESCO बाबत

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो.

या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात या संघटनेचे मुख्यालय आहे. भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.

भारतीयांकडून प्रभावी हायड्रोजन उत्क्रांतीसाठी कार्यक्षम व स्वस्त असे उत्प्रेरक विकसित

बंगळुरू येथील सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस (CENS) या केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत असलेल्या स्वायत्त संस्थेच्या संशोधकांनी ‘पॅलाडिअम Pd(II)’ आयन-युक्त नव्या प्रकारचे कॉर्डिनेशन पॉलिमर (COP) संश्लेषित केला आहे, जो H-अ‍ॅडसॉरप्शन आणि बेनेझ टेट्रामाईन (BTA) यांच्या सक्रीय स्थळांचा स्रोत म्हणून कार्य करतो. दोन्ही मिळून द्वीमितीय (2D) Pd(BTA) पत्र्याच्या माध्यमातून H-बंध परस्परसंवाद निर्माण करतात. संशोधकांनी द्वीमितीय 2D Pd(BTA) पत्रा देखील तयार केला आहे.

हायड्रोजन (H2) इव्होल्यूशन रिअॅक्शन (HER) यासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रो उत्प्रेरकाची कार्यक्षमता मुख्यत्वे त्याचा टिकाऊपणा, इलेक्ट्रोकेमिकल अभिक्रियेची क्षमता कमीतकमी करण्यावर आणि संश्लेषण (उत्पादन) याच्या किंमतीवर अवलंबून असते. उद्योगांमध्ये वापरण्यात येणारे प्लॅटीनम (Pt) / कार्बन (C) कार्यक्षम उत्प्रेरक आहेत, परंतु ते किंमतीत महाग आहेत आणि दीर्घकाळ वापरल्यास मेटल आयनवर काम करीत नाहीत. त्यातच पृथ्वीवर प्लॅटीनम धातूचे साठे अल्प आहेत.

या शोधाचे महत्व

हवामानातले बदल यांच्या विरोधात असलेल्या लढ्यासाठी जीवाश्म इंधनांऐवजी पुढील पिढीचे कमी कार्बनयुक्त इंधन म्हणून हायड्रोजन ओळखले जाते. इंधन म्हणून हायड्रोजनच्या वापराचे भवितव्य हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचे इलेक्ट्रोकेमिकल विभाजन सुलभ करण्यासाठी लागणाऱ्या कार्यक्षम इलेक्ट्रोकॅटिलिस्टच्या रचनेमध्ये आहे.

हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचे विभाजन करण्याचे कार्यक्षम साधन विकसित करणे हा या शोधामागचा हेतु आहे.

1)________ यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी लेफ्टनंट केनेडींचा पराभव केला होता. 
:-भिमा नाईक

2)________  याने एका स्त्रीला सतीपासून परावृत्त करण्यासाठी बनारसपर्यंतचा प्रवासखर्च दिला व तिला सती जाण्यापासून परावृत्त केले. 
:- हेन्री डंडास रॉबर्टसन

3)वासुदेव फडके , वामनराव भावे, लक्ष्मण इंदापुरकर यांनी इ.स. 1874 साली ____ ही शाळा सुरू केली. 
:-पुना नेटिव्ह इन्स्टीट्यूट

4)अज्जन एलायजा सॉलोमन हे ज्यूधर्मीय गृहस्थ ___ च्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य होते.
:-सत्यशोधक समाज


No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…