Friday, August 14, 2020

महापोलीस भरती अभ्यासक्रम व पुस्तकांची यादी/ Police bharti syllabus & book list

पोलीस भरती 2020 लेखी परीक्षा संबंधित कोणत्या पुस्तकांचा वापर करावा त्यासंबंधी संपूर्ण माहिती.

      जय हिंद मित्रांनो
                जर आपण महाराष्ट्र पोलीस भरती ची तयारी करत आहात तर त्या संबंधित लेखी परीक्षांचा कोणत्या पद्धतीने तयारी करावी जेणेकरून मला जास्त जास्त गुण कसे मिळतील? हा प्रश्न भरपूर मित्रांच्या मनात असतोच परंतु अभ्यास कसा करावा याबद्दल माहिती नसल्यामुळे आपला पाहिजे तेवढा पेपर मध्ये स्कोर होत नाही आज मी तुम्हाला कशा पद्धतीने पोलीस भरतीचा अभ्यास करावा जेणेकरून पेपर मध्ये तुम्हाला 90+गुण मिळतील याबद्दल माहिती देणार आहे.

              सर्वात प्रथम परीक्षा ही 100 गुणांची होणार आहे.
गणित              - 25 गुण
सामान्य ज्ञान     - 25 गुण
बुद्धिमत्ता          - 25 गुण
मराठी व्याकरण - 25 गुण

      या पद्धतीने पोलीस भरती चा अभ्यासक्रम आहे. तर आता आपण जाणून घेऊया कोण कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करावा.

सामान्य ज्ञानासाठी - विद्याभारती किंवा के सागर यांचा पोलीस भरतीचा पुस्तकांचा अभ्यास करावा या पुस्तकामध्ये तुम्हाला बेसिक माहिती मिळेल.

सामान्य ज्ञान - एकनाथ पाटील ठोकळा (PSI STI ASO)

गणित - सतीश वसे सर यांचा fast track किंवा- magic tricks या पुस्तकांचा आपण वापर करू शकता

मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे किंवा फास्टट्रॅक मराठी व्याकरण या पुस्तकांचा वापर करू शकता.

बुद्धिमत्ता चाचणी - अनिल अंकलीनी किंवा युनिक ॲकॅडमी चा बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचा वापर करू शकता

       याच्या व्यतिरिक्त चालू घडामोडी साठी दत्ता सांगोलकर यांचा पुस्तकांचा वापर करू शकता.


   या सगळ्यांनी व्यतिरिक्त मित्रांनो तुमच्याजवळ 2014 पासून ते आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरती च्या प्रश्नपत्रिका जवळ असणे गरजेचा आहे.

कारण पोलीस भरती मध्ये 60  ते 70 टक्के प्रश्न हे रिपीट होतात.
                   

अजून जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील पोलीस भरती बद्दल ते मला कमेंट करू शकतात किंवा 9967566868 या नंबर वर संपर्क साधू शकता.

पोलीस भरतीची ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.



No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…