🎇 अखेर कोविड -19 आली लस🎇
🔰 रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मोठी घोषणा केली आहे. रशियाने कोरोना लस लाँच केली, असे पुतीन यांनी म्हटले आहे.
🔰 रशियाने आज कोरोना व्हायरसवरील लसीची नोंदणी केली आहे. असं करणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे.
🔰 माझ्या एका मुलीलाही ही कोरोना लस देण्यात आली आहे, असे पुतीन यांनी स्पष्ट केले आहे.
🟠 या खासगी बँकेनी लोकांमध्ये आशा जागवण्यासाठी ‘कुछ नया सोचो’ मोहीमेचा प्रारंभ केला - येस बँक.
🟣 भारतीय रोखे व विनिमय मंडळाने (SEBI) पोर्टफोलिओ व्यवस्थापकांच्या नोंदणीशी संबंधित कामांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून अर्जदारांना आता SEBIच्या या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सर्व संप्रेषणे दाखल करावी लागणार - पूर्व (कोलकाता), उत्तर (दिल्ली), दक्षिण (चेन्नई) आणि पश्चिम (अहमदाबाद).
🟤 मे 2021 या काळात सेंट पीटर्सबर्ग येथे होणाऱ्या IAA विश्व परिषदेत दिल्या जाणाऱ्या ‘2020 IAA कंपास चॅप्टर एक्सलन्स अवॉर्ड’चा विजेता – IAA इंडिया चॅप्टर.
🟡 ‘फ्यूचरब्रँड इंडेक्स 2020’मध्ये या भारतीय कंपनीला अॅपल कंपनीनंतर दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा ब्रँड म्हणून स्थान मिळाले - रिलायन्स इंडस्ट्रीज.
🔵 ही संस्था आणि आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण संशोधन व क्षमता बांधणी संस्था (IIHEd) यांनी संयुक्तपणे 6 आणि 7 ऑगस्ट 2020 रोजी 'कोविड-19 नंतर विद्यापीठाचे पुनर्गठण आणि रूपांतरण’ या विषयावर एक जागतिक परिषद आयोजित करणार आहे – ओ.पी. जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी.
🔴 चार वर्षांच्या कालावधीसाठी पंतप्रधान कार्यालयात नवीन उपसचिव - नवल किशोर राम.
🔶महाराष्ट्रातील मुख्य संस्था 🔶
1. सत्यशोधक समाज
- स्थापना: 24 सप्टेंबर 1873, पुणे
- संस्थापक: महात्मा फुले
- ब्रीद वाक्य: सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी
2. प्रार्थना समाज
- स्थापना: 31 मार्च 1867, मुंबई
- संस्थापक अध्यक्ष: डाॅ. आत्माराम पांडुरंग
- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले.
3. सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना असोसिएशन)
- स्थापना: 2 एप्रिल 1870, पुणे
- संस्थापक: न्या. रानडे & गणेश वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी
4. आर्य समाज
- स्थापना: 10 एप्रिल 1875, मुंबई
- संस्थापक: स्वामी दयानंद सरस्वती

No comments:
Post a Comment