Sunday, August 2, 2020

गलवान खोऱ्यातील २० शहिदांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर.

गलवान खोऱ्यातील २० शहिदांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर.

👉 पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जूनला चिनी फौजांशी शौर्याने लढताना शहीद झालेल्या २० भारतीय जवानांची नावे राजधानीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरली जाणार आहेत. यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.

👉 भारत व चीन यांच्या फौजांमध्ये १५ जूनच्या रात्री गेल्या पाच दशकांतील सर्वात भीषण संघर्ष झाला होता. चीनतर्फे गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉइंट १४च्या परिसरात टेहळणी चौकीच्या उभारणीला भारतीय सैनिकांनी विरोध केल्यानंतर, चिनी सैनिकांनी खिळे लावलेल्या काठय़ा, लोखंडी कांबी वापरून त्यांच्यावर भीषण हल्ले केले होते. यात शहीद झालेल्या लष्करी जवानांमध्ये १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी कर्नल बी. संतोष बाबू यांचा समावेश होता.

👉 या घटनेमुळे पूर्व लडाखच्या सीमेवरील तणाव मोठय़ा प्रमाणात वाढला. भारताने याचे वर्णन ‘चीनची पूर्वनियोजित कृती’ असे केले होते.

👉 संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी १७ जुलैला पूर्व लडाखमधील लुकुंग सीमा चौकीला दिलेल्या भेटीत, बिहार रेजिमेंटच्या सैनिकांनी चिनी फौजांशी लढताना दाखवलेल्या अतुलनीय धैर्याचे कौतुक केले होते

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…