Thursday, August 6, 2020

कोविड-19 विषाणूसंबंधित देशातल्या पाच समर्पित बायोरेपॉझिटरी

कोविड-19 विषाणूसंबंधित देशातल्या पाच समर्पित बायोरेपॉझिटरी

🔸केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नेतृत्वात देशतला पहिला ‘1000 SARS-CoV-2 RNA जीनोम सिक्वेंसींग’ कार्यक्रम यशस्वी पार पाडला गेला आहे. जैवतंत्रज्ञान विभागाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

🔸यांच्या अंतर्गत देशभरात आढळलेल्या रुग्णांची आणि केलेल्या तपासणीतून निष्पन्न झालेली संपर्ण माहिती एका ठिकाणी डिजिटल स्वरूपात गोळा करण्यात आली ज्याला ‘बायोरिपॉझटरी’ असे म्हटले जाते. अश्या भारतात पाच समर्पित कोविड-19 बायोरिपॉझटरी स्थापन करण्यात आल्या आहेत.

त्या पुढीलप्रमाणे आहेत –

ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (THSTI) फरीदाबाद

इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्स (ILS) भुवनेश्वर

इंस्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीअरी सायन्स (ILBS) नवी दिल्ली

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS) पुणे

इंस्टिट्यूट फॉर स्टेम सेल सायन्स अँड रीजनरेटिव्ह मेडिसिन (InStem) बेंगळुरू.

🔸आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते जैवतंत्रज्ञान विभागाने विक्रमी वेळेत स्थापना केलेल्या या आस्थापनांच्या सर्वात मोठ्या जाळ्याचा शुभारंभ करण्यात आला आणि त्या राष्ट्राला समर्पित केल्या.

🔸देशभरातल्या संशोधकांना संशोधनासाठी हा सिक्वेन्स डेटा जागतिक प्रयत्नांचा भाग म्हणून लवकरच सामायिक केला जाणार आहे. या माहितीच्या आधारे विषाणूचा प्रसार कश्या पद्धतीने होत आहे ते समजण्यास मदत होणार आणि त्यावर संक्रमण साखळी तोडणे, नवीन संक्रमणास प्रतिबंध घालणे आणि अश्या विविध उपायांवर संशोधन करता येणार आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…