Friday, August 7, 2020

लिलाव प्रक्रियेद्वारे ठरवणार प्रो कबड्डी लीगच्या आगामी हंगामाचे प्रक्षेपण.

लिलाव प्रक्रियेद्वारे ठरवणार प्रो कबड्डी लीगच्या आगामी हंगामाचे प्रक्षेपण.

 देशातील दुसऱ्या क्रमांकाची लोकप्रिय लीग असा दर्जा प्राप्त करणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या आगामी हंगामाचे प्रक्षेपणाचे हक्क लिलाव प्रक्रियेद्वारे ठरण्याची दाट शक्यता आहे.

 सध्याचे प्रक्षेपणकर्ते स्टार इंडिया यांच्या महसूल वाटपाच्या प्रस्तावामुळे संघ आणि संयोजक मशाल स्पोर्ट्स पेचात सापडले आहेत.

 स्टार इंडियाने यापेक्षा उत्तम प्रस्ताव ठेवला नाही, तर प्रक्षेपणाचे हक्क पारदर्शक लिलाव पद्धतीने निश्चित व्हावे, यासाठी सर्व संघमालकांनी एकत्रित येऊन मोर्चेबांधणी केली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

 इंडियन प्रीमियर लीगप्रमाणे प्रो कबड्डी लीगचा लिलाव व्हावा. ते स्टार इंडियाला थेट देऊ नये, अशी मागणी आम्ही मशाल स्पोर्ट्सकडे केली आहे.

 प्रो कबड्डी लीगचे बाजारमूल्य उत्तम आहे. स्टारच्या मशाल स्पोर्ट्समधील भागीदारीत हितसंबंध दडले आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…