महाराष्ट्रात पोलीस दलामध्ये 12,835 भरती डिसेंबर अखेर भरण्यात येणार आहे.
पोलीस शिपाई गट – क संवर्गातील 2019 या भरती वर्षात रिक्त असलेली 5297 पदे व 2020 या भरती वर्षात सेवानिवृत्ती, पदोन्नती, राजीनामा मुळे रिक्त होणाऱ्या पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण 6726 पदे त्याचप्रमाणे मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्त
निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मिती 975 पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील 500 हून अधिक अशी एकूण 12 हजार 538 पदे भरण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकांमध्ये हा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पोलीस भरती ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
कोरोना च्या काळात जवळपास राज्य शासनाने सर्वच भरती थांबवल्या होत्या परंतु राज्य शासनाला पोलिसांचा तुटवडा खूप जास्त भासत असल्यामुळे तात्काळ भरती घेण्यात येणार आहे असे गृहमंत्री म्हणाले.
तर मित्रांनो पोलीस भरती तरी होणारच आहे आपण जास्त जास्त तयारी केली पाहिजे त्यासाठी योग्य अभ्यासाचे नियोजन आणि फिजिकल साठी तयारी केलीच पाहिजे
अशाप्रकारे पोलीस भरती विषयी काही अपडेट मिळाली तर नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत आणू जर आपल्याला कोणताही प्रश्न विचारायचा असेल तुम्ही थेट आमच्याशी संपर्क साधू शकतात आमच्या ईमेल वर ती मेल करू शकतात.

No comments:
Post a Comment