Tuesday, September 15, 2020

Current Affairs 14 / 15 September 2020 चालू घडामोडी सुपरफास्ट 14 / 15 सप्टेंबर 2020

Current Affairs 14 / 15 September 2020
चालू घडामोडी सुपरफास्ट 14 / 15 सप्टेंबर 2020



 🔹दिग्गज अभिनेते ........यांची ' नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
➡️ परेश रावल 

✍️माननीय राष्ट्रपतींनी अभिनेते आणि पद्मश्री श्री परेश रावल यांनी चेअरमनपदी नियुक्ती केली आहे.

🔹हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायधीश म्हणून कोणाची निवड झाली होती?
➡️ॲना चंडी

✍️ॲना चंडी केरळ राज्यात कायद्याची पदवी घेणाऱ्या पहिल्या मल्याळी महिला मानल्या जातात.

✍️सन 1959 मध्ये त्या केरळ हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायधीश बनल्या.

🔹नवीन शैक्षणिक धोरण कधीपासून लागू होत आहे.
➡️ 2022 

✍️नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचे गुणपत्रिकेचे ओझे काढून टाकण्यात आले असून नवीन अभ्यासक्रम पद्धती देश स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करीत असताना, 2022 पासून लागू होत आहे.

🔹कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कॅरेबिअन प्रमिअर लिग स्पर्धेत........ संघाने CPL चं विजेतेपद मिळवलं आहे.
➡️त्रिंबागो नाईट रायडर्स 

✍️अंतिम सामन्यात नाईट रायडर्सने सेंट लुशिया झौक्सवर 8 गडी राखून मात केली.

✍️विजयासाठी मिळालेलं 155 धावांचं आव्हान नाईट रायडर्सने लेंडल सिमन्सच्या नाबाद 84 धावांच्या  खेळीच्या जोरावर पूर्ण केलं.

🔹 ‘यू.एस. ओपन 2020’ महिला टेनिस स्पर्धा कोणी  जिंकली?
➡️नाओमी ओसाका

✍️ जापानच्या नाओमी ओसाका हिने ‘यू.एस. ओपन 2020’ या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात व्हिक्टोरिया अझरेंकाचा पराभव करीत महिला एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले. 

👉स्पर्धेच्या इतर गटाचे विजेते -
पुरुष एकेरी - राफेल नदाल (स्पेन)
पुरुष दुहेरी – माटे पाव्हीक (क्रोएशिया) आणि ब्रुनो सोरेस (ब्राझील)
महिला दुहेरी - लॉरा सिगेमुंड (जर्मनी) आणि वेरा झ्वोनारेवा (रशिया)

👉आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ (ITF) विषयी...

✍️ही जागतिक टेनिस, व्हीलचेयर टेनिस आणि बीच टेनिस स्पर्धांसाठीची प्रशासकीय संस्था आहे. 1913 साली ‘आंतरराष्ट्रीय लॉंन टेनिस महासंघ’ म्हणून याची स्थापना केली गेली.

✍️ याचे मुख्यालय लंडन (ब्रिटन) येथे आहे. आज या संघटनेशी 211 राष्ट्रीय टेनिस संघटना आणि सहा क्षेत्रीय संघटना संलग्न आहेत.

✍️ऑस्ट्रेलियन ओपन (जानेवारी), फ्रेंच ओपन (मे-जून), विंबल्डन (जून-जुलै) आणि यू.एस. ओपन (ऑगस्ट-सप्टेंबर) या स्पर्धा ITF तर्फे आयोजित केल्या जातात.

🔹जागतिक प्रथमोपचार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो.
➡️ 12 सप्टेंबर 2020

✍️2000 साली इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रॉस अँड रेड क्रिसेंट सोसायटीज (IFRC) या संस्थेच्यावतीने या दिवसाची स्थापना करण्यात आली.

🔹या राज्य सरकारने 12 सप्टेंबर रोजी ‘स्मार्ट रेशन कार्ड योजना’चा आरंभ केला 
➡️ पंजाब.

🔹हे राज्य कुपोषण दूर करण्यासाठी ‘पोषण सरकार’ कार्यक्रम राबविणार आहे 
➡️ मध्यप्रदेश.

🔹पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 सप्टेंबर रोजी 193 किलोमीटर लांबीच्या गॅस पाइपलाइनच्या या राज्यातल्या दुर्गापूर-बांका खंडाचे उद्घाटन झाले 
➡️ बिहार.

🔹.......या राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री महिला कल्याण योजना’ जाहीर केली आहे, त्याअंतर्गत 17 सप्टेंबरपासून महिलांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार 
➡️ गुजरात.

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…