पोलीस भरती बाबत नवाब मलिक यांची मोठी घोषणा
बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शिख , पारसी, ज्यू या अल्पसंख्य समाजातील उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये या अल्पसंख्यक समाजातील उमेदवारांना महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये निवड होण्यासाठी या समाजातील उमेदवारांना भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याची ची घोषणा केली आहे यामध्ये हे लेखी व मैदानी चाचणी ची तयारी करून घेण्याच्या तयारीसाठी सध्या 14 जिल्ह्यांमध्ये भरतीपूर्व उमेदवारांची ची निवड प्रक्रिया चालू केली आहे आहे अशी माहिती ती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली.
महाराष्ट्रात चालू वर्षांमध्ये नोव्हेंबर डिसेंबर अखेर जवळपास साडेबारा हजार पोलीस शिपाई भरती होणार आहे. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त पोलीस दलामध्ये अल्पसंख्यांक उमेदवारांची निवड व्हावी या दृष्टिकोनातून ही मोफत प्रशिक्षण प्रक्रिया चालू करण्याच्या दृष्टिकोनातून ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. सध्या 14 जिल्ह्यांमध्ये ही निवड पद्धत चालू केली उर्वरित जिल्ह्यांमध्ये पण ही प्रक्रिया लवकर चालू होणार आहे. चौदा जिल्ह्यांची माहिती पुढीलप्रमाणे. वर्धा, गडचिरोली, अमरावती, नांदेड, जालना, पुणे, यवतमाळ, परभणी, सोलापूर, औरंगाबाद, बुलडाणा, नाशिक, बीड आणि अकोला सध्या या जिल्ह्यातून उमेदवारांनी भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करायच्या आहेत.
अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा निवडलेल्या स्वयं संस्था यांच्याकडे अर्ज करावयाचे आहेत.
सध्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये हे स्वयं संस्थाची निवड करण्याची पद्धत चालू आहे ते पूर्ण झाल्यानंतर त्या जिल्ह्यांमध्ये इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणासाठी निवड केलेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे फॅसिलिटी देणार येणार आहे.
हे प्रशिक्षण प्रक्रिया उमेदवारांना दोन महिन्यासाठी लागू असणार आहे त्यामध्ये त्यांना प्रतिमहा 1500 रुपये व अशाप्रमाणे दोन महिन्यासाठी तीन हजार रुपये देणार आहेत. याशिवाय एक ट्रॅक्ट सूट, बूट घेण्यासाठी 1 हजार रुपये , आणि पुस्तक खरेदी करण्यासाठी तीनशे रुपये देणार आहेत याशिवाय प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना दररोज नाश्त्याची सोय केली आहे. हे प्रशिक्षण दोन महिन्यासाठी लागू असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून किमान एक हजार उमेदवारांची निवड करण्याची ची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी एका जिल्ह्यातून किमान 5 लाख 60 हजार रुपये एवढा खर्च असून त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातून जरी 30 उमेदवार प्रशिक्षणासाठी आले तरी त्यांचे प्रशिक्षण घेण्याचे स्वयं सेवक संस्थांवर बंधनकारक करण्यात आलेला आहे. तरी राज्यातील अल्पसंख्यांक उमेदवाराने या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त फायदा घेऊन पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी आव्हान नवाब मलिक यांनी केला आहे.
अशीच प्रक्रिया 2009 साली राबवण्यात आली होती. यातून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक अल्पसंख्यांक तरूणांची राज्यात पोलिस दलामध्ये निवड झाली होती.
📝 पोलीस भरती 2020 ऑनलाईन फ्री टेस्ट सोडवा
📝 पोलीस भरती 2020 ऑनलाईन फ्री टेस्ट सोडवा

No comments:
Post a Comment