Tuesday, August 18, 2020

18 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी सविस्तर माहिती /Police bharti 18 August 2020 current affairs detail information

18 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी सविस्तर माहिती


पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन .

👉 न्यूज जर्सी येथे त्यांचं निधन झालं.
वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

👉 ते  भारतीय शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक होते.

👉 पंडित जसराज यांना भारत सरकारने २००० मध्ये संगीत क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल  पद्मविभूषण पुरस्काराने गौवरले होते.
_______________________________________________

क्रिडा मंत्रालयाचा राष्ट्रव्यापी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ कार्यक्रम

👉केंद्रीय क्रिडा मंत्रालयाकडून 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सर्वात मोठ्या देशव्यापी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ नामक धावशर्यतीचे आयोजन केले जात आहे

👉केंद्रीय क्रिडामंत्री किरेन रिजीजू यांनी 14 ऑगस्ट 2020 रोजी या उपक्रमाचे उद्घाटन केले.

शर्यतीचे स्वरूप

👉सध्याची महामारीची स्थिती लक्षात घेऊन आणि वैयक्तिक अंतराच्या निकषांचे पालन करून या उपक्रमात सहभागी होणाऱ्या धावपटूंना त्यांच्या स्वतःच्या गतीने त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही ठिकाणी धावण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

👉त्या व्यतिरिक्त धावपटू या अनेक दिवस धावण्याच्या उपक्रमाच्या कालावधीत मध्येच धाव खंडित करू शकतात.

👉धावपटूंनी कापलेले एकूण अंतर आणि त्यासाठी घेतलेला वेळ याची माहिती GPS घड्याळाच्या मदतीने किंवा स्वतः नोंदवता येऊ शकतो.

👉15 ऑगस्टला असलेल्या देशाच्या 74व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या 151व्या जयंतीनिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
_________________________________________________

स्टँड अप अंगेंस्ट व्हायोलेन्स

» महाराष्ट्र शासन

» 14 ऑगस्ट

» ‘स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस’ हे वेब ॲप म्हणजे महिलांची सुरक्षा त्यांच्या हातात उपलब्ध करुन देण्याचा स्तुत्य उपक्रम आहे

» अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी आणि मदत मिळवून देण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरेल.

» महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर.
_________________________________________________

सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत प्रथम क्रमांकावर

👉सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. तर सेंद्रिय शेतीच्या क्षेत्राचा विचार केला तर भारत जगात नवव्या क्रमांकावर आहे. भारतातील सिक्कीम या राज्यांमध्ये हे फक्त आणि फक्त सेंद्रिय शेती केली जाते. सिक्किम ए राज्य पूर्णता सेंद्रिय शेती करणारे भारतातीलच नव्हे हे तर जगातील पहिले राज्य ठरले आहे.

👉भारताने 2018-2019 या आर्थिक वर्षात 5,151 कोटी रुपयांच्या सेंद्रिय कृषी उत्पादनाची निर्यात केली. या उत्पादनामुळे निर्यातीमध्ये जवळपास 50 टक्के वाढ झाली आहे.
_________________________________________________

भारतातील सर्वात मोठी प्लाझ्मा बँक  कलखनऊमध्ये

👉 राजधानी लखनौ येथील किंग जॉर्ज मेडिकल यूनिर्व्हर्सिटी येथे प्लाझ्मा बँक कार्यान्वित झाली असून ही बँक देशातील सर्वात मोठी असल्याचा दावा केजीएमयू संस्थेने केला आहे.

👉या प्लाझ्मा बँकेत ८३० यूनिट प्लाझ्मा सुरक्षित ठेवण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे.

👉केजीएमयूच्या शताब्दी भवन येथे ब्लड बँकेजवळ प्लाझ्मा बँकेची स्थापना करण्यात आली आहे.

👉आतापर्यंत ४५ कोरोना योद्‌धा नागरिकांनी प्लाझ्मा दान केला असून २५ जणांना त्याचा लाभ देण्यात आला आहे.
_________________________________________________

📝महाराष्ट्र पोलीस भरती 2020 ऑनलाइन टेस्ट सोडवा

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…