Saturday, August 22, 2020

22 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी सविस्तर माहिती// 22 August 2020 current affairs detail information

 


📝 Dream 11 ची स्पॉन्सरशिप फक्त IPL 2020 पुरतीच – BCCI चा निर्णय .📝


📝भारत-चीन यांच्यातील ताणल्या गेलेल्या संबंधामुळे बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाची स्पॉन्सरशिप Dream 11 कंपनीला दिली.

📝 पुढच्या हंगामात दोन्ही देशांमधले संबंध सुधारले नाही तर पर्याय म्हणून Dream 11 कंपनीलाच वाढीव बोलीवल २०२२ पर्यंत करार वाढवून देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

📝 पण आता Dream 11 सोबत IPL 2020 पुरताच करार केला जाणार आहे.

📝पुढील वर्षांच्या कराराबद्दल बीसीसीआय नंतर चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं कळतंय.

📝 तेराव्या हंगामासाठी करण्यात आलेल्या करारानुसार Dream 11 आणि बीसीसीआय यांच्यातला करार ३१ डिसेंब २०२० पर्यंत लागू असणार आहे.

📝 यासाठी Dream 11 ने बीसीसीआयला २२२ कोटी रुपये मोजले आहेत.

📝तेराव्या हंगामासाठी Dream 11 बीसीसीआयला २२२ कोटी रुपये मोजणार आहे.

📝 आणि इतर दोन हंगामात VIVO ने परत येण्यासाठी नकार दिल्यास Dream 11 त्या हंगामासाठी बीसीसीआयला २३४ कोटी रुपये मोजणार होती.

📝 पण पुढील हंगामासांठी बीसीसीआयलया आणखी जास्त किंमत मिळण्याची आशा असल्यामुळे त्यांनी Dream 11 सोबतचा करार फक्त तेराव्या हंगामापुरता मर्यादीत ठेवण्याचं ठरवलंय.

📝VIVO कंपनी आयपीएलच्या प्रत्येक हंगामासाठी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होती.

📝 करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बीसीसीआयला यंदा स्पॉन्सरशिपच्या स्वरुपात मिळणारी रक्कम ही जवळपास अर्धी आहे.
________________________________________________

📝दिल्ली पोलीसांच्या निवासी वसाहतींमध्ये आयुर्वेदीक आरोग्य सेवा वाढविण्यासाठी ‘धन्वंतरी रथ’ तैनात.📝


📝‘आयुरक्षा’ उपक्रमाच्या अंतर्गत दिल्ली पोलीसांच्या निवासी वसाहतींमध्ये आयुर्वेदीक सेवांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवून ‘आयुर्वेद प्रतिबंधक व प्रोत्साहनपर आरोग्य सेवा’ यांचा विस्तार करण्यासंबंधी अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) आणि दिल्ली पोलीस यांच्यात एक सामंजस्य करार झाला आहे.

📝या सेवा ‘धन्वंतरी रथ’ हे फिरते वाहन आणि पोलीस कल्याणकारी केंद्र यांच्यामार्फत पुरविल्या जात आहेत. या सेवा आयुष मंत्रालयाच्या पाठिंब्याने अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) पुरवित आहे.

📝‘आयुरक्षा’ उपक्रम...📝

📝‘आयुरक्षा’ हा अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) आणि दिल्ली पोलीस यांचा एक संयुक्त उपक्रम आहे, ज्यामार्फत आयुर्वेदीक औषधोपचारांचा वापर करून कोविड-19 महामारीच्या काळात सर्वात पुढे काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

📝या प्रकल्पाचा विस्तार करीत ‘आयुर्वेद प्रतिबंधक व प्रोत्साहनपर आरोग्य सेवा’ आता दिल्ली पोलीस कर्मचार्यांच्या कुटूंबीयांपर्यंत दिल्या जात आहेत.

📝या प्रकल्पाच्या अंतर्गत दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे 80 हजार पोलीस कर्मचार्‍यांना ‘आयुरक्षा’ वैद्यकीय संचाचे वितरण करण्यात आले.

📝आता असे संच त्यांच्या कुटुंबीयांना देखील दिल्या जात आहेत.

📝‘धन्वंतरी रथ’ हे आयुर्वेद आरोग्य सेवांचे फिरते केंद्र आहे, ज्यामध्ये चिकित्सकांची एक चमू कार्यरत असणार आहे आणि ते नियमितपणे दिल्ली पोलीस निवासी वसाहतींना भेट देणार.
_________________________________________________

📝भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या सुरक्षेसाठी ड्रोन आधारित टेहळणी प्रणालीचा वापर.📝

📝कमीत कमी मनुष्यबळामध्ये खूप मोठ्या जागेवर सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन टेहळणी प्रणाली एक अतिशय महत्त्वाची आणि किफायतशीर प्रणाली म्हणून उदयाला येत आहे.

📝रेल्वेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे आणि सुरक्षा व्यवस्थेला आणखी पाठबळ पुरवणे हा ड्रोन प्रणाली तैनात करण्याचा उद्देश आहे.

📝ठळक बाबी..

📝मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे स्थानकाची संकुले, रेल्वे ट्रॅक सेक्शन यार्ड, कार्यशाळा इत्यादीसारख्या रेल्वेच्या जागांची अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षा करण्याकरीता आणि त्यावर लक्ष ठेवण्याकरीता दोन ‘निन्जा’ मानव-रहीत हवाई वाहनांची खरेदी केली आहे.

📝 वास्तविक वेळेत शोध, चलचित्रपट तयार करण्याची या ड्रोनची क्षमता आहे आणि स्वयंचलित फॉल सेफ मोडमध्ये देखील त्यांचे परिचालन करता येते.

📝रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) चार कर्मचाऱ्यांच्या एका पथकाला ड्रोन उड्डाणाचे, त्याद्वारे लक्ष ठेवण्याचे आणि देखभालीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

📝रेल्वेच्या सुरक्षेसाठी ड्रोनचा व्यापक प्रमाणावर वापर करण्याचे RPF दलाने ठरवले असून आतापर्यंत 31.87 लक्ष रुपये खर्चून दक्षिण पूर्व रेल्वे, मध्य रेल्वे, मॉडर्न कोचिंग फॅक्टरी, रायबरेली आणि दक्षिण पश्चिम रेल्वे येथे नऊ ड्रोन खरेदी करण्यात आले आहेत.

📝तसेच 97.52 लक्ष रुपये खर्चाने आणखी 17 ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

📝आतापर्यंत RPFच्या 19 कर्मचाऱ्यांना ड्रोनचे प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि त्यापैकी चार जणांना ड्रोन उड्डाणाचा परवाना प्राप्त झाला आहे.

📝ड्रोन प्रणालीचे उपयोग...

📝रेल्वेच्या संकुलात जुगार, कचरा फेकणे, फेरीने विक्री करणे यांसारख्या गुन्हेगारी तत्वांवर लक्ष ठेवण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त आहे.

📝याचा वापर विविध प्रकारच्या माहितीचे संकलन आणि विश्लेषणासाठी होणार आहे.

📝या माहितीचा उपयोग रेल्वेगाड्यांच्या सुरक्षित परिचालनासाठी आणि संवेदनशील भागांमध्ये होऊ शकतो.

📝आपत्ती घडलेल्या ठिकाणी मदत, बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी तसेच विविध संस्थांमध्ये समन्वयासाठी देखील ड्रोन तैनात केली जाऊ शकतात.

📝रेल्वेच्या मालमत्तांवर होणारी अतिक्रमणे रोखण्यासाठी या मालमत्तांचा नकाशा तयार करण्यासाठी देखील ड्रोन उपयुक्त आहेत.

📝खूप जास्त प्रमाणात होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करताना जास्त गर्दी होणारी ठिकाणे, गर्दीची वेळ आणि गर्दी पांगवण्यासाठी आवश्यक असलेले उपाय याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती ही प्रणाली उपलब्ध करू शकते आणि त्यानुसार गर्दी नियंत्रणाच्या योजना तयार करून त्यांची अंमलबजावणी करता येणार.

📝ड्रोनच्या एका कॅमेऱ्याने आठ ते दहा कर्मचाऱ्यांची गरज असलेल्या खूप मोठ्या भागावर लक्ष ठेवता येऊ शकते.

📝 त्यामुळे मनुष्यबळाची टंचाई असताना अतिशय कमी मनुष्यबळामध्ये कामे करता येतात.
_________________________________________________

📝‘लिपिक’ पदाचे पदनाम आता ‘महसूल सहायक’- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात.📝

📝 महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक गट पदाचे पदनाम आता महसूल सहायक करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात  यांनी दिली.

📝महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची राज्यातील महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘लिपिक गट क‘ कर्मचाऱ्यांची तांत्रिक लिपिक ऐवजी ‘महसूल सहायक‘ असे पदनाम करावे अशी मागणी होती.

📝 राज्य शासनाने महसूल कर्मचारी संघटनेची ही मागणी मान्य केली आहे.

📝कर्मचाऱ्यांना पदनाम बदलामुळे शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नसल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.
_________________________________________________

📝हिंदी महासागरात युद्धनौका सज्ज.📝

📝पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर तणावाची स्थिती असताना भारताच्या टॉप नौदल कमांडर्सची कालपासून दिल्लीमध्ये तीन दिवसीय परिषद सुरु झाली आहे.

📝दिल्लीत नौदल कमांडर्सची परिषद होत असताना तिथे लडाखमध्ये दोन्ही देशांचं सैन्य आमने-सामने आहे.

📝या सीमावादाच्या पार्श्वभूमीवरच हिंदी महासागर क्षेत्रात भारतीय नौदल अलर्ट मोडवर असून कुठलीही कामगिरी पार पाडण्यासाठी भारतीय युद्धनौका सज्ज आहेत.
_________________________________________________

📝क्रीडा मंत्रालयाकडून पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याचे संकेत📝


📝️राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या बक्षीस रकमेत घसघशीत वाढ करण्याचे संकेत क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.

📝️राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्याला 25 लाख रुपये आणि अर्जुन पुरस्कार विजेत्याला 15 लाख रुपयांचे बक्षीस यापुढे देण्याचा विचार क्रीडा मंत्रालय करत आहे.

📝अर्थातच याबाबत अधिकृत घोषणा क्रीडा मंत्रालयाने केलेली नाही.

📝सध्या खेलरत्न पुरस्कार विजेत्याला साडेसात लाख रुपये आणि अर्जुन पुरस्कार विजेत्याला पाच लाखांचे बक्षीस क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात येते.

📝️जर हा प्रस्ताव मान्य झाला तर या वर्षीपासूनच वाढीव बक्षीस रक्कम पुरस्कारप्राप्त खेळाडूंना देण्यात येणार असल्याचे समजते असे क्रीडा मंत्रालयातील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
_________________________________________________


No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…