📝📝राष्ट्रीय भरती संस्थेची स्थापना करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.📝📝
(हे भारतीय सरकारी नोकरी साठी लागू असणार आहे अजून राज्य सरकारने त्याच्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने येथे लक्ष ठेवावे)
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
📝पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय भरती संस्था (NRA) याची स्थापना करण्याला मंजुरी देण्यात आली आहे.
📝 केंद्रीय सरकारमधील पदांच्या भरती प्रक्रियेला एकात्मिक करण्यासाठी हा पुढाकार घेतला गेला आहे.
📝वर्तमान परिस्थिति...📝
📝वर्तमानात, सरकारी नोकरीत जाण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना, वेगवगेळ्या पदांसाठी असलेल्या विविध भरती समितीच्या वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात.
📝त्यासाठी उमेदवारांना वेगवगेळ्या समितीचे परीक्षा शुल्क देखील भरावे लागते आणि अनेकदा परीक्षा देण्यासाठी दूरवर प्रवास देखील करावा लागतो.
📝दरवर्षी साधारणपणे, 1.25 लक्ष सरकारी नोकऱ्यांसाठी 2.5 कोटी इच्छुक उमेदवार विविध परीक्षा देतात. मात्र, आता एकाच सामाईक पात्रता परीक्षेमुळे या उमेदवारांना एकदाच ही पात्रता परीक्षा द्यावी लागणार आणि ती उत्तीर्ण झाल्यावर त्यानंतर ते यापैकी कोणत्याही एका भरती समितिकडे किंवा एकाच वेळी विविध समित्यांकडे उच्चस्तरीय परीक्षा देण्यासाठी अर्ज सादर करु शकणार.
📝सरकारी आणि सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातल्या अराजपत्रित पदांसाठी NRA मार्फत एक सामाईक पात्रता परीक्षा घेतली जाणार. वर्तमानातल्या विविध परीक्षांच्या ऐवजी आता पुढे दरवर्षी जाहिरात निघालेल्या सरकारी नोकऱ्यांसाठी एकच सामाईक पात्रता परीक्षा घेतली जाणार.
📝NRA संस्थेविषयी...📝
📝राष्ट्रीय भरती संस्थेची स्थापना संस्था नोंदणी कायद्याच्या अंतर्गत असणार आहे.
📝केंद्र सरकारमधले सचिव दर्जाचे अधिकारी संस्थेचे अध्यक्ष असणार. या संस्थेत रेल्वे मंत्रालय, अर्थमंत्रालय / वित्तसेवा विभाग, कर्मचारी निवड आयोग, क्षेत्रीय ग्रामीण बँक आणि बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) यांचे प्रतिनिधी असणार.
📝सरकारने राष्ट्रीय भरती संस्थेसाठी (NRA) 1517.57 कोटी रुपये मंजूर केले आहेत. तीन वर्षांमध्ये हा खर्च करण्यात येणार.
📝परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये...📝
📝सामाईक पात्रता परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाणार.पदवी, 12 वी उत्तीर्ण आणि दहावी उत्तीर्ण अशा पातळ्यांसाठी वेगवेगळ्या सामाईक पात्रता परीक्षा असणार, जेणेकरुन विविध पातळ्यांवर वेगवेगळी भरती प्रक्रिया करता येणार.
📝सामाईक पात्रता परीक्षा प्रमुख 12 भारतीय भाषांमध्ये घेतली जाणार. सध्या सगळ्या परीक्षा केवळ इंग्रजी आणि हिंदी या दोनच भाषेतून होत आहेत.
📝सामाईक पात्रता परीक्षेच्या अंतर्गत, तीन समित्यांमार्फत होणाऱ्या परीक्षा समाविष्ट करण्यात आल्या आहेत; यात, कर्मचारी निवड आयोग (SSC), रेल्वे भरती मंडळ आणि बँकिंग कर्मचारी निवड संस्था यांचा समावेश आहे. पुढे, टप्प्याटप्याने आणखी समित्या यात समाविष्ट केल्या जाणार आहेत.
📝सामाईक पात्रता परीक्षा देशभरातल्या 1,000 केंद्रांवर घेतली जाणार. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक परीक्षा केंद्र असणार.
📝 विशेषतः देशातल्या 117 आकांक्षी जिल्ह्यांमध्ये या परीक्षेसाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
📝सामाईक पात्रता परीक्षा ही उमेदवारांची पहिली यादी निश्चित करण्यासाठीची पहिली परीक्षा असणार. परीक्षेत मिळविलेले गुण तीन वर्षांसाठी ग्राह्य धरले जाणार.
📝सामाईक पात्रता परीक्षा कितीही वेळा देता येणार, त्यावर कुठलेही बंधन असणार नाही. मात्र, त्यासाठीच्या कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार.
📝अनुसूचित जाती/जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी सध्याच्या वयोमर्यादेबाबतच्या शिथिलता पुढेही कायम राहणार.

No comments:
Post a Comment