Saturday, August 22, 2020

22 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी अतिशय महत्त्वाचे


22 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी अतिशय महत्त्वाचे


राज्य विशेष

📝या राज्य सरकारने शहरी भागातल्या गरीब व गरजू लोकांना 8 रुपयांत पौष्टिक भोजन देणारी ‘इंदिरा रसोई’ योजना लागू केली - राजस्थान.

📝ज्ञान-विज्ञान

📝या संस्थेच्या संशोधकांनी ‘हलाईड पेरोव्हस्काईट’ (Cs2PtI6) नामक फोटोइलेक्ट्रोकेमिकल पदार्थाचा वापर करून एक नवीन सामग्री शोधली आहे, जे सौर ऊर्जेचा उपयोग करून पाण्याचे प्रभावीपणे हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायुमध्ये विभाजन करू शकते - भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास.
________________________________________________


राष्ट्रीय

📝या सरकारी वीज कंपनीला नीती आयोग आणि गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने त्याच्या अक्षय ऊर्जा व्यवसायासाठी संपूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन करण्यासाठी परवानगी दिली - NTPC मर्यादित.

📝केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानातले बदल मंत्रालयाने या शहरात ‘एकात्मिक प्रादेशिक कार्यालय’ (IRO) स्थापन करण्याचा निर्णय घेतला – विजयवाडा, आंध्रप्रदेश.

📝सर्व वृक्षारोपण प्रकल्पाच्या अंतर्गत लागवड करण्यात आलेल्या प्रत्येक रोपाची देखरेख करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) याचे मोबाईल ॲप - ‘हरित पथ’.

📝या योजनेच्या अंतर्गत, कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) डिसेंबर 2020 पर्यंत जास्तीत जास्त 90 दिवसांच्या बेरोजगारीसाठी सरासरी वेतनाच्या 50 टक्के रक्कम देणार आहे - अटल बिमित व्यक्ति कल्याण योजना.

📝देशातले पहिले राज्य जे राष्ट्रीय भरती संस्था (NRA) परीक्षेत मिळविलेल्या गुणांच्या आधारे सरकारी नोकरी देणार - मध्यप्रदेश.

📝न्यूयॉर्क शहरातल्या हँड राइटिंग फॉर ह्युमॅनिटी या संस्थेनी आयोजित केलेल्या जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम पुरस्काराचा विजेता - के. जी. मोहनन नायर (केरळ).
________________________________________________

क्रिडा
📝‘राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार 2020’ याचे विजेता
 - रोहित शर्मा (क्रिकेट), मरियप्पन टी. (पॅरा), मणिका बत्रा (टेबल टेनिस), विनेश (कुस्ती), राणी (हॉकी).

📝जीवन गौरव श्रेणीत ‘तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसिक पुरस्कार 2020’ याचे विजेता - (मृत) मगन बिसा.

📝‘मौलाना अबुल कलाम आझाद (माका) करंडक 2020’ याचे विजेता - पंजाब विद्यापीठ, चंदीगड.
________________________________________________
दिनविशेष
📝धर्म किंवा विश्वास याच्या आधारावर झालेल्या हिंसाचाराला बळी पडलेल्यांच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय दिन – 22 ऑगस्ट.

अर्थव्यवस्था

📝या पेमेंट बँकेनी ‘जन बचतखाता’ योजना सादर केली आहे, जे आधार प्रमाणीकरण आधारित एक डिजिटल बचत खाते आहे - फिनो पेमेंट्स बँक.
________________________________________________
सामान्य ज्ञान

भारतीय राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागार (NFA) – स्थापना: वर्ष 1964; ठिकाण: पुणे, महाराष्ट्र.

राष्ट्रीय अॅल्युमिनियम कंपनी मर्यादित (NALCO) - स्थापना: वर्ष 1981; मुख्यालय: भुवनेश्वर, ओडिशा.

राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) - स्थापना: वर्ष 1988; मुख्यालय: दिल्ली.

राष्ट्रीय ध्रुवीय व महासागर संशोधन केंद्र (NCPOR) - स्थापना: 25 मे 1998; मुख्यालय: वास्को दा गामा, गोवा.

भारतात या वर्षी घटनात्मक दुरुस्तीद्वारे पंचायती राज व्यवस्था लागू केली गेली होती - वर्ष 1992.

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…