Monday, August 24, 2020

पोलीस भरती 2020 चालू घडामोडी संक्षिप्त माहिती......//Police bharti 2020 current affairs detail information


पोलीस भरती 2020 चालू घडामोडी संक्षिप्त माहिती......

📝सैन्याला पहिले 50 लाख डोस देण्याचा मोदी सरकारचा विचार.📝

👉भारत सरकार करोना लस खरेदी करण्याचा विचार करत असून पहिल्या टप्प्यात 50 लाख डोस खरेदी  करण्यासंबंधी चर्चा सुरु आहे.

👉केंद्र सरकारकडून करोना लस मिळण्याचा पहिला मान करोना योद्धा, भारतीय सैन्य आणि विशिष्ट श्रेणीतील लोकांना दिला जाण्याची शक्यता  आहे.

👉केंद्र सरकारचं संपूर्ण लक्ष लसीचं पुरवठा साखळी आणि वितरणावर आहे.

👉केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात लसीचं वितरण करण्याची योजना आखत आहे जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत करोना लस पोहोचावी.

👉वर्षाअखेर किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला करोना लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे.
_________________________________________________

📝बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताचे सलग तीन विजय.📝

👉भारताने ‘फिडे’ ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत पहिल्या दिवशी झिम्बाब्वे, व्हिएतनाम आणि उझबेकिस्तान यांना नमवत सलग तीन विजयांची नोंद केली.

👉भारताने पहिल्या लढतीत झिम्बाब्वेला 6-0 असे सहज हरवले. मग व्हिएतनामवर 4-2 असा आणि उझबेकिस्तानवर 5.5-0.5 असा विजय मिळवला.

👉सलग तीन विजयांमुळे भारत आणि चीन यांनी प्रत्येकी सहा गुण कमावले आहेत.
_________________________________________________

📝भाजपा खासदाराची मागणी; JEE, NEET परीक्षा पुढे ढकला.📝

👉‘जेईई २०२०’ आणि ‘नीट’ परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरत असताना, आता भाजपाचे दिग्गज नेते व राज्यसभा खासदार डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांच्याकडे नीट व जेईई सारख्या परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.

👉खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी शुक्रवारी या संबधी एक ट्विट करत म्हटले की, “मी नुकतीच शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून त्यांना सुचवले आहे की, नीट आणि अन्य परीक्षा दिवाळी नंतर घेतल्या जाव्यात. 

👉परीक्षांची तारीख निश्चित करण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर सोपवलेल असल्याने, यामध्ये काही अडचण यायला नको मी तातडीने पंतप्रधानांना या संदर्भात पत्र पाठवणार आहे.”
_________________________________________________


📝केरळ प्रथमच ‘चतुर’ महोत्सव साजरा करणार.📝

👉️केरळ राज्यात प्रथमच ‘चतुर’ (ड्रॅगनफ्लाय नावाचा कीटक) महोत्सव साजरा केला जाणार आहे.

👉 या कार्यक्रमाला ‘थंबिमहोत्सवम् 2020’ असे नाव देण्यात आले आहे.
👉हा कार्यक्रम सप्टेंबर 2020 या महिन्यात आरंभ होण्याचे नियोजित आहे. जानेवारी 2021 या महिन्यात होणाऱ्या ‘राज्य चतुर शिखर परिषदेत या कार्यक्रमाची सांगता होणार.

👉️या काळात समाजातल्या विविध घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यक्रमांची मालिका सादर केली जाणार आहे. 

👉लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि त्यांचे निरीक्षण कौशल्य सुधारण्यासाठी ‘ड्रॅगनफ्लाय बॅकयार्ड वॉच’ नावाचा एक कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे.

👉सोसायटी फॉर ओडोनेट स्टडीज आणि थंबिपुरनम या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने WWF-इंडिया या संस्थेच्या केरळ शाखेच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

👉️हा कार्यक्रम राष्ट्रीय जैवविविधता मंडळ, संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम, संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम आणि IUCN-CEC या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने WWF इंडिया, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि इंडियन ड्रॅगनफ्लाय सोसायटी या संस्थांच्यावतीने संयुक्तपणे आयोजित केल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय चतुर महोत्सव’चा एक भाग आहे.

📝चतुर कीटकाविषयी...

👉️संधिपाद संघाच्या ओडोनेटा गणातला एक कीटक आहे. याचे शास्त्रीय नाव “क्रोकोथेमिस एरिथ्रा” असे आहे. ‘चटकचांदणी’ नावानेही चतुर हा कीटक ओळखला जातो.

_________________________________________________

📝हरित पथ’ ॲप: राष्ट्रीय महामार्गांवर वृक्षारोपणावर लक्ष ठेवण्यासाठी NHAIचे मोबाइल ॲप.📝

👉रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) 'हरित पथ' या नावाचे एक मोबाइल ॲप तयार केले आहे.

👉सर्व वृक्षारोपण प्रकल्पाच्या अंतर्गत प्रत्येक झाडाची जागा, वाढ, प्रजाती तपशील, देखभाल कार्ये, लक्ष्य आणि त्याच्या प्रत्येक कार्यक्षेत्राच्‍या कामगिरीचे निरीक्षण याविषयी माहिती साठविण्यासाठी या ॲपचा वापर करण्यात येणार आहे.

👉राष्ट्रीय महामार्गावरील झाडांचे 100 टक्के दीर्घायुमान सुनिश्चित करण्यासाठी किमान 1.5 मीटर उंचीच्या वृक्षारोपण पद्धतीवर जोर देण्यात आला आहे.
_________________________________________________

📝एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया’ऐवजी ‘अदानी एअरपोर्ट्स ऑफ इंडिया’ म्हणून ओळखलं जाईल.📝

👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समूहाला देण्याच्या निर्णयाला बुधवारी मंजूरी दिली आहे.

👉भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नाव बदलून ‘अदानी एअरपोर्ट्स ऑफ इंडिया’ असं होईल  अशी खोचक टीका केली आहे.

👉मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये तीन विमानतळांचा कारभार अदानी समूहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्याचे फायनॅन्शीयल एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
_________________________________________________

📝आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर.📝

👉करोनाच्या कालावधीत होणाऱ्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारी व्यापक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. 

👉त्यानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे (ईव्हीएम) बटण दाबण्यासाठी मतदारांना हातमोजे उपलब्ध करून देण्यात येणार असून अलगीकरणात असलेल्या रुग्णांना मतदानाच्या दिवशी अखेरच्या एका तासात मतदान करण्याची मुभा देण्यात येणार आहे

👉 वापर केल्यानंतर विल्हेवाट लावता येतील असे हातमोजे देण्यात येण्याची शक्यता आहे.

👉जो परिसर संक्रमित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे तेथील मतदारांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाणार आहेत. 

👉मतदान केंद्रांचे मतदानाच्या आधीच्या दिवशी र्निजतुकीकरण करणे बंधनकारक करण्याची शिफारसही निवडणूक आयोगाने केली आहे.

👉प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेश द्वारावर थर्मल चाचणी यंत्र बसविण्यात येणार असून निवडणूक अथवा निमवैद्यकीय कर्मचारी मतदारांची थर्मल चाचणी करणार आहेत. 

👉मतदान केंद्रात १५०० ऐवजी जास्तीत जास्त एक हजार मतदारांना प्रवेश देण्यात येणार आहे.

_________________________________________________

📝खासगीरीत्या उत्पादित पिनाका क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी.📝

👉️दिनांक 19 ऑगस्ट 2020 रोजी भारतीय भुदलाने पोखरणच्या चाचणी क्षेत्रात खाजगी क्षेत्रातल्या कंपनीने देशातच तयार केलेल्या सहा ‘पिनाका’ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली.


👉️भारतात पहिल्यांदाच, इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड (EEL) या खासगी कंपनीने ‘पिनाका’ क्षेपणास्त्र तयार केले आहे.

👉 ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत संरक्षण संशोधन विकास संस्थेनी (DRDO) कंपनीला पिनाकाक्षेपणास्त्राच्या निर्मितीचे कंत्राट दिले होते.

👉आता शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी संरक्षण दलाला आयुध निर्मिती मंडळ (ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड) या संस्थेवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
_________________________________________________


📝पिनाका क्षेपणास्त्र...

👉पिनाका क्षेपणास्त्र प्रणाली ही संरक्षण संशोधन विकास संस्थेनी (DRDO) विकसित केलेली स्वदेशी बनावटीचे ‘मल्टी बॅरेल’ क्षेपणास्त्र प्रणाली आहे.

👉️हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे गाइडेड क्षेपणास्त्र आहे.‘पिनाका मार्क 1’ची मारक क्षमता 40 किलोमीटर, तर ‘पिनाका मार्क 2’ची मारक क्षमता 75 किलोमीटरपर्यंत आहे.
_________________________________________________


No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…