दिनांक 24 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी अतिशय महत्त्वाचे
राज्य विशेष
👉सप्टेंबर 2020 आणि जानेवारी 2021 या कालावधीत या राज्यात ‘थंबिमहोत्सवम् 2020’ नावाने पहिलाच राज्य चतुर महोत्सव आयोजित केला जाणार आहे - केरळ.
👉या राज्यातली APCNF, कोवेल फाऊंडेशन या संस्थांनी राज्यात 14 जैव-ग्रामपंचायत आणि 226 जैव-खेड्यांचा विकास करण्यासाठी पंचवार्षिक योजना तयार केली आहे - आंध्रप्रदेश.
👉आदिवासी कल्याण मंत्रालय झारखंड, छत्तीसगढ आणि या राज्यातल्या आदिवासींमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यासाठी सुकलेल्या नाल्यांचे पुनर्संचयन करण्यासाठी ‘1000 स्प्रिंग्स’ उपक्रमाची योजना आखत आहे - मध्यप्रदेश.
_________________________________________________
आंतरराष्ट्रीय
👉 या संस्थेच्या आणि शिव नादर विद्यापीठाच्या संशोधकांनी पर्यावरणपूरक लिथियम-सल्फर (Li-S) बॅटरीच्या उत्पादनासाठी एक तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा केला आहे, जी सध्या वापरल्या जाणाऱ्या या लिथियम-आयन बॅटरीपेक्षा तीनपट जास्त ऊर्जा कार्यक्षम असणार - भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई.
👉या संस्थेच्या संशोधकांनी इंजेक्शनद्वारे दिले जाऊ शकणारे ‘CPT31’ नावाचे नवीन औषध विकसित केले आहे, जे पेशींमध्ये HIV विषाणूला दीर्घकाळापर्यंत प्रवेश करण्यापासून रोखते – अमेरिकेचे युटा विद्यापीठ.
👉या देशाने ‘गाओफेन-9 05’ नावाचा ऑप्टिकल रिमोट सेन्सिंग उपग्रह अंतराळात सोडला - चीन.
👉हंगामाच्या नवीन भाताचे स्वागत करण्यासाठी पश्चिम ओडिशा आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये आयोजित केला जाणारा महोत्सव - नुआखाई महोत्सव.
_________________________________________________
व्यक्ती विशेष
👉‘तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2020’ची विजेती, जी भारतीय आणि चीनी अशा दोन्ही बाजूंनी एव्हरेस्ट पर्वतावर चढणारी पहिली भारतीय महिला आहे - अनिता कुंडू.
_________________________________________________
सामान्य ज्ञान
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (AICF) - स्थापना: वर्ष 1951; मुख्यालय: चेन्नई.
अखिल भारतीय टेनिस संघ (AITA) - स्थापना: वर्ष 1920; मुख्यालय: नवी दिल्ली.
भारतीय बॅडमिंटन संघ (BAI) - स्थापना: वर्ष 1940; मुख्यालय: नवी दिल्ली.
राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळ (NHDC) याची स्थापना – वर्ष 1983.
NMDC मर्यादित (राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ) - स्थापना: 15 नोव्हेंबर 1958; मुख्यालय: हैदराबाद.
राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड - स्थापना: 18 फेब्रुवारी 1982; मुख्यालय: विशाखापट्टणम.
_________________________________________________

No comments:
Post a Comment