Wednesday, August 19, 2020

19 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी सविस्तर माहिती//date 19 August 2020 current affairs detailed information available


                   📝'IPL 2020 ची स्पॉन्सरशिप📝


📝आयपीएल 2020 चे टायटल स्पॉन्सरशिप ड्रीम - 11 या कंपनीला 222 कोटींना मिळाले आहे, अशी माहिती आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी दिली.

📝 या वर्षीच्या आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपवरून  व्हिवो कंपनी मागे हल्यानंतर बीसीसीआय भारतातील स्पॉन्सर शोधत होते. 

📝 बीसीसीआय व्हिवो कंपनीचे स्पॉन्सरशिप रद्द करत नवीन स्पॉन्सरशिपसाठी अर्ज मागवले होते.

📝 आता मोबाईल फँटेंसी लीगसाठी प्रसिद्ध असलेल्या ड्रीम इलेव्हनने अनेक कंपन्यांना मागे टाकत आयपीएलची टायटल स्पॉन्सरशिप मिळवली आहे.

 📝  टाटा समूह आता ड्रीम-11, पतंजली आणि बइजू अशा दिग्गज कंपन्यांनी यंदाच्या आयपीएलचे टायटल स्पॉन्सर बनण्यासाठी बोली लावली होती. 

📝  मात्र ड्रीम-11 ने सर्वाधिक बोली लावत यात बाजी मारली.
_________________________________________________

📝सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांची बीएसएफच्या डीजी पदावर नियुक्ती📝


📝सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांची सीमा सुरक्षा दलाच्या मुख्य निर्देशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

📝 २०१८ साली सीबीआय विरुद्ध सीबीआय प्रकरणामुळे ते चर्चेत आले होते.  

📝राकेश अस्थाना १९८४ बॅचचे गुजरात केडरचे अधिकारी आहेत. 

 📝त्यांनी काही हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास केला आहे. 

📝१९९७ साली चारा घोटळायात त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना अटक केली होती.

📝सीबीआयमध्ये ते पोलीस अधीक्षकपदावर होते.

📝 २०१८ साली लाचखोरीचा आरोप झाल्यानंतर सीबीआयमधून त्यांना हटवण्यात आले.

📝तत्कालीन सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्या इशाऱ्यावरुन हे सर्व झाल्याचा आरोप अस्थाना यांनी केला होता.
_________________________________________________

📝 रोहित शर्मासह चौघा क्रीडापटूंची यंदाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस 📝 


📝पुरस्कारांच्या निवडीसाठी केंद्रीय क्रीडा खात्याच्या १२ सदस्यीय समितीची बैठक आज संपन्न 

  📝🏏 रोहित शर्मा    - क्रिकेटर
  📝🤼‍♀️ विनेश फोगाट. - कुस्ती
  📝🏓 मनिका बात्रा   -बॅडमिंटन
  📝🏃 मरिअप्पन थांगावेलू -धावपटू
_________________________________________________

📝मणीपूरमध्ये इजाई नदीवर जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल’📝


📝भारतीय रेल्वे मणीपूरमध्ये इजाई नदीवर जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल’ बांधत आहे.

📝ठळक बाबी...

📝नोनी जिल्ह्यातल्या मारंगचिंग गावाजवळ डोंगराळ भागात इजाई नदीवर हा पूल बांधण्यात येत आहे.पूलाची उंची 141 मीटर आहे, जी युरोपातल्या 139 मीटर उंचीच्या माला-रिजेका पूलापेक्षा अधिक आहे.हा प्रकल्प जिरीबाम-तुपुल-इंफाळ BG लाइन प्रकल्पाचा एक भाग आहे, ज्याची एकूण लांबी 703 मीटर असणार.
_________________________________________________

📝BRICS अमली पदार्थ-रोधी कार्यरत गट’ची चौथी बैठक संपन्न.📝

📝ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका आणि भारत या देशांचा समावेश असलेल्या ‘BRICS अमली पदार्थ-रोधी कार्यरत गट’ याची चौथी बैठक या आठवड्यात पार पडली.  12 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या वर्षाची बैठक रशिया या द पार पडली.

📝भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्त्व अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी केले.

📝चर्चेतले मुद्दे...

📝BRICS राज्यांमधील अमली पदार्थांच्या स्थितीसंबंधी मतांची फलदायी देवाणघेवाण, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर अनधिकृत पद्धतीने होणारी अंमली पदार्थांच्या तस्करीच्या पद्धती, मानसिक संतुलन बिघडविणारे पदार्थ आणि त्यांचे पूर्वगामी तसेच परिस्थितीवरील विविध अंतर्गत आणि बाह्य घटकांचा होणारा परिणाम असे अनेक मुद्दे चर्चेअंतर्गत समाविष्ट केले गेले.

📝BRICS विषयी...

📝BRICS हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच राष्ट्रांचा समूह आहे. 2006 साली या समूहाची स्थापना झाली. 2011 साली BRIC समुहात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि समूहाला BRICS हे नाव दिले गेले.

📝रशियाच्या येकतेरिनबर्ग शहरात दिनांक 16 जून 20x09 रोजी BRIC समूहाची पहिली औपचारिक परिषद आयोजित करण्यात आली होती. 2009 सालापासून BRICS राष्ट्रे औपचारिक परिषदेत दरवर्षी भेट घेतात.
_________________________________________________

📝भारत सरकारचे ‘राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान’.📝


📝दिनांक 15 ऑगस्ट 2020 पासून आरोग्य क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचा पुढाकार घेतला गेला आहे. भारतात “राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान” (National Digital Health Mission) या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

📝या कार्यक्रमामध्ये तंत्रज्ञानाची खूप मोठी आणि महत्त्वाची भूमिका असणार आहे. कोणत्याही व्यक्तीला औषधोपचार करताना होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी तंत्रज्ञानाची अतिशय उत्तम पद्धतीने मदत घेवून हे अभियान राबविण्यात येणार आहे.

📝प्रत्येक भारतीयासाठी “हेल्थ आय.डी.”

📝प्रत्येक भारतीयाला एक “हेल्थ आय.डी.” म्हणजेच विशिष्ट “आरोग्य ओळखपत्र” देण्यात येणार.

_________________________________________________

📝सार्थक’: भारतीय तटरक्षक दलाचे चौथे गस्ती जहाज.📝


📝13 ऑगस्ट 2020 रोजी भारतीय तटरक्षक दलाच्या ‘सार्थक’ नामक गस्ती जहाजाचे जलावतरण करण्यात आले.

📝जहाजाची वैशिष्ट्ये आणि इतर ठळक बाबी..

📝 तटरक्षक दलासाठी बनविण्यात येणाऱ्या पाच गस्ती जहाजांच्या मालिकेतले हे चौथे गस्ती जहाज आहे.गोवा शिपयार्ड लिमिटेड या सार्वजनिक कंपनीने या जहाजाची रचना आणि बांधणी स्वदेशी तंत्रज्ञानाने केली आहे.जहाजात अत्याधुनिक अशी नौकानयन आणि संचार साधने, संवेदक आणि यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत.

📝105 मीटर लांबी असलेल्या या जहाजाचे वजन 2350 टन असून जहाजाला 9100 किलोवॅटची दोन इंजिन आहेत, ज्या माध्यमातून 6000 नॉटीकल मैलांपर्यत 26 नॉटस गति प्राप्त केली जाऊ शकते.
_________________________________________________

📝कोळशाच्या राखेचा वापर वाढविण्यासाठी रिहांद येथे NTPC कडून पायाभूत सुविधेची स्थापना.📝


📝 देशातील सर्वाधिक ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी म्हणजेच NTPC लिमिटेड या कंपनीने दूरवरच्या सिमेंट प्रकल्पांना स्वस्त दरात कोळशाच्या राखेची वाहतूक करण्यासाठी उत्तरप्रदेशातल्या रिहांद प्रकल्पात पायाभूत सुविधेची उभारणी केली आहे.

📝उत्तर प्रदेशातल्या टीकरिया शहरापासून 458 कि.मी. अंतरावरील ACC सिमेंट उत्पादक प्रकल्पाला कोळशाची राख पुरविण्यासाठी 3450 मेट्रिक टन (MT) कोळशाची राख वाहून नेणाऱ्या BOXN प्रकारच्या रेल्वे वॅगनच्या पहिल्या रेकला NTPCच्या रिहांद सुपर थर्मल पॉवर स्टेशनचे कार्यकारी संचालक बालाजी अय्यंगार यांनी 16 ऑगस्ट 2020 रोजी हिरवा झेंडा दाखविला.
_________________________________________________

📝प्रोजेक्ट लायन’ आणि ‘प्रोजेक्ट डॉल्फिन’ या संवर्धन कार्यक्रमांची घोषणा.📝


📝 देशातल्या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी चाललेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, 15 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रोजेक्ट लायन’ आणि ‘प्रोजेक्ट डॉल्फिन’ या नव्या संवर्धन कार्यक्रमांची घोषणा केली.

 📝 ‘प्रोजेक्ट टायगर’ आणि ‘प्रोजेक्ट एलिफंट’ यांच्या यशानंतर आता आगामी काळात आशियाई सिंह आणि गंगा डॉल्फिन या प्रजातींच्या संवर्धनासाठी भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामानातले बदल मंत्रालयाने 10 वर्षांच्या कार्यक्रमाची योजना आखली आहे.
_________________________________________________

महाराष्ट्र पोलीस भरती 2020 ऑनलाईन फ्री टेस्ट सोडवा.

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…