भारतीय क्षेपणास्त्रे आणि त्यांची वैशिष्ट्ये
_________________________________________________
📝 1. बराक 8 :
बराक 8 हे भारत आणि इस्रायल यांच्याकडून संयुक्तपणे विकसित केले जाणारे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे हवेत अधिकतम 16 किमी उंचीवर आणि 100 किमी लांबीवरील लक्ष्यांवर मारा करू शकते
_________________________________________________
📝 2. निर्भय : -
निर्भय’ या क्षेपणास्त्राची क्षमता ही अमेरिकेच्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांएवढी आहे. निर्भय क्षेपणास्त्राची 1000 किलोमीटर पर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता असून त्यावर 300 किलो वजनाची पारंपरिक अण्वस्त्रे बसवता येतात.
_________________________________________________
📝 3. पिनाका अग्निबाण प्रणाली 6 :-
पिनाक अग्निबाण प्रणाली 6 अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित करतो, यांचा पल्ला 40 किमी आहे.
________________________________________________
📝 4.आकाश :
आकाश हे हवेत अधिकतम 18 किमी उंचीवर आणि 25 ते 30 किमी लांबीवर मारा करू शकणारे स्वदेशी क्षेपणास्त्र आहे.
________________________________________________
📝5.ब्राम्होस :
ब्राम्होस हे भारत आणि रशियामार्फत संयुक्तरीत्या विकसित केले जात असलेले सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्र आहे. या सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राचा वेग 2.8 मॅच क्रमांक आहे. म्हणजेच त्याचा वेग ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा 2.8 पटीने जास्त असेल. यानुसार त्याचा वेग ताशी 3,400 कि.मी. इतका असेल. ब्राम्होस याचे उड्डाण पाणबुडी, विमान, जहाज तसेच जमिनीवरून केले जाऊ शकेल.
________________________________________________





No comments:
Post a Comment