सुपरफास्ट चालू घडामोडी दिनांक 6 सप्टेंबर 2020
➡️देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणुकदारांना आकर्षित करणं, व्यावसायिक परिस्थितीत सुधारणा आणणं आणि राज्यांमध्ये स्पर्धा निर्णाण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ईज ऑफ डुईंग बिझनेसची रँकिंग आज जाहीर करण्यात आलं.
➡️अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे रँकिंग जाहीर केलं.
➡️ या यादीमध्ये पहिले स्थान आंध्र प्रदेशाचे आहे सलग दुसऱ्या वर्षीही आपले स्थान कायम केले.
➡️ दुसरे स्थान उत्तर प्रदेश, तिसरे स्थान तेलंगणा व चौथ्या स्थानावर मध्यप्रदेश, पाचव्या स्थानावर झारखंड, सहाव्या स्थानावर छत्तीसगढ, सातव्यावर हिमाचल प्रदेश आणि आठव्या स्थानावर राजस्थान ही राज्ये आहेत.
➡️सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र १३व्या क्रमांकावर आहे.
➡️शासकीय नोकर भरतीच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर टीका होऊ लागल्याने, आता अर्थ मंत्रालयाकडून याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
➡️ केंद्र सरकारच्या कुठल्याही नोकरीवर बंदी लावण्यात आली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
➡️चार वेळा ऑलिम्पिक विजेतेपद पटकावणाऱ्या मो फराह आणि नेदरलँड्सची सिफान हसन यांनी डायमंड लींग अथेलेटिक्स स्पर्धेत दमदार कामगिरी करत एक तासाच्या शर्यतीत नव्या विक्रमांची नोंद के ली.
➡️रिकाम्या स्टेडियममध्ये ब्रिटनच्या फराहने पुनरागमन करताना एक तासामध्ये २१,३३० मीटरचे अंतर पार के ले.
➡️त्याने इथियोपियाच्या हायले गेब्रसेलासी याने रचलेला २१,२८५ मीटरचा विक्रम मोडीत काढला.
➡️सिफान हसनने महिलांच्या शर्यतीत १८,९३० मीटर इतके अंतर पार करत नवा विक्रम प्रस्थापित के ला.
➡️तिने २००८ मध्ये डायर टय़ूनने रचलेला १८,५१७ मीटरचा विक्रम मोडला.
➡️BIMSTEC (बहुउद्देशीय तांत्रिक व आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर उपक्रम) यांच्या स्थापनेनंतर 23 वर्षांनंतर ‘BIMSTEC सनद’ याला अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे.
➡️2 सप्टेंबर 2020 रोजी श्रीलंका देशाच्या अध्यक्षतेखाली BIMSTEC गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत यासंबंधी घोषणा करण्यात आली.
➡️भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व परराष्ट्र सचिव (पूर्व) विजय ठाकूर सिंग यांनी केले.
➡️BIMSTEC समूह दिनांक 6 जून 1997 रोजी अस्तित्वात आला. त्याचे कायमस्वरूपी सचिवालय ढाका (बांग्लादेश) येथे आहे.
➡️या समूहात बंगालच्या उपसागरालगतच्या दक्षिण आशियातल्या भारत, बांगलादेश, भुटान, नेपाळ, श्रीलंका तसेच आग्नेय आशियातल्या म्यानमार आणि थायलँड या सात देशांचा समावेश आहे.
➡️1962 सालापासून दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी ‘राष्ट्रीय शिक्षक दिन’ साजरा केला जातो.
➡️शिक्षणतज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ‘शिक्षक दिन’ म्हणून पाळला जातो.

No comments:
Post a Comment