Wednesday, August 19, 2020

📝सरकारी नोकरीसंदर्भात मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय; आता होणार सामायिक परीक्षा📝


📝सरकारी नोकरीसंदर्भात मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय; आता होणार सामायिक परीक्षा📝


📝युवा पिढीच्या नोकरीसंदर्भात मोदी सरकारने (Modi government) आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

📝सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून राष्ट्रीय भरती संस्था (National Recruitment Agency)स्थापन करण्यात येणार आहे.

📝त्याद्वारे एकच सामायिक परीक्षा (CET) देऊन तरुणांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल.

📝शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी युवा पिढी अनेक मार्ग चोखाळते. 

📝प्रत्येक संस्था आणि कंपन्या आपापल्या परीक्षा ठेवतात आणि चांगल्या नोकरीच्या महत्त्वाकांक्षेने तरुण या सगळ्या परीक्षा देतात. 

📝आता मोदी सरकारने घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे हे चित्र पालटण्याची शक्यता आहे.

📝केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी कॅबिनेट बैठकीत (Cabinet meeting) झालेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली.

📝आता सरकारी संस्थेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी सामायिक परीक्षा असेल. 

📝त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था National Recruitment Agency स्थापन करण्यात येणार आहे.

📝या संस्थेत एकदा नोंदणी केली की, एकच परीक्षा देऊन आपली योग्यता युवकांना सिद्ध करावी लागेल. 

📝त्यामुळे नोकरीसाठी दारोदारी परीक्षा देत भटकण्याची वेळ युवा पिढीवर येणार नाही.

📝प्रकाश जावडेकर यासंदर्भात माहिती देताना म्हणाले, "युवकांना जागोजाही परीक्षा द्यायला जावं लागू नये म्हणून एकच Common Eligibility test असेल.

📝यात गुणवत्ता सिद्ध करून उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल."

📝विमानतळांचं खासगीकरण📝


📝आज झालेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये National Recruitment Agency खेरीज आणखी एक मोठा निर्णय झाला.

📝देशातल्या 6 विमानतळांचं व्यवस्थापन आणि दैनंदिन व्यवहार खासगी संस्थेला देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

📝विमान प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने हे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचं जावडेकर म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…