Saturday, August 29, 2020

चालू घडामोडी :29 ऑगस्ट 2020 सविस्तर माहिती

 

  अमेरिका ने चीन ला सर्वात मोठा दिला दणका पीएलए’ समर्थक 24 चिनी कंपन्यांवर घातली बंदी



महत्त्वाचे मुद्दे -

✒️ जगातील दोन महत्त्वाचे देश अमेरिका आणि चीनमधील वाद सध्या वाढतानाच दिसत आहेत.या दोन देशांमध्ये दक्षिण चीन महासागर, हाँगकाँग आणि तैवानच्या मुद्द्यावर समोरासमोर  वाद आहे.

✒️ अमेरिकेचने चिनी सैन्याची मदत करणाऱ्या 24 कंपन्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

✒️ तसेच बंदी घातल्यानंतर या कंपन्या अमेरिकेत व्यापार करू शकणार नाहीत.

✒️या ज्या कंपन्या आहेत त्या दक्षिण चीन महासागरात कृत्रिम बेट तया करून सैन्य तळ उभारण्यास चीनला मदत करत असल्याचा आरोप अमेरिकेनं केला आहे.

✒️ सुबी रीफ हा स्पार्टल बेटांचा भाग असुन यावर चीनचं नियंत्रण आहे.  परंतु व्हिएतनाम , फिलिपिन्स आणि तैवान हे देखील यावर आपला दावा नेहमी करतात.

✒️चीन या देशाने आतापर्यंत दक्षिण चीन महासागरात अनेक कृत्रिम बेटं उभारली आहेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र, युद्धनौका आणि फायटर जेट तैनात केली आहेत.

✒️ दक्षिण चीन महासागरावरून फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि व्हिएतनाम या देशांसोबत चीनचा वाद सुरू आहे.

✒️दक्षिण चीन महासागराच्या ९० टक्के भागावर चीन आपला दावा करत आहे.

पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट फ्री मध्ये सोडवा..
_________________________________________________

जगातील सगळ्यात मोठं ‘अटल टनल’ भारतात तयार झाला.

महत्त्वाचे मुद्दे

✒️ जगातिल सगळ्यात लांब रोड टनल अखेर भारतात तयार झाला आहे.त्याची लांबी जवळपास १० हजार फुट आहे.

✒️ रोहतांग या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या बोगद्याचं नाव ‘अटल टनल’ देण्यात आले आहे. हा टनेल बनवण्यासाठी  १० वर्षांचा कालावधी लागला आहे.

✒️भाजप या पक्षाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून या बोगद्याचे नाव ठेवलं आहे.

✒️ या बोगद्याची लांबी ८.८ किलोमीटर इतकी आहे.  हे उंच बोगदा आहे १०, १७१ फुटांवर रोहतांग या ठिकाणी अटल  टनेल तयार करण्यात आलं आहे.

✒️या बोगद्यामुळे मनाली  ते लेह हे अंतर ४६ किलोमीटरनं कमी झाले आहे.

✒️ जवळपास समुद्रसपाटीपासून १२ हजार फुटांच्या उंचीवर साकारण्यात येणारा हा बोगदा जगातील सर्वात मोठा ट्रॅफिक टनल मानला जात आहे.

_________________________________________________

 इस्रायलकडून विकत घेणार ‘एवॅक्स’ सिस्टम' भारत सरकार ही सिस्टम चीन-पाकिस्तानवर ठेवणार नजर.

महत्त्वाचे मुद्दे

✒️चीन आणि पाकिस्तानपासून वाढता धोका लक्षात घेऊन भारताने अखेर इस्रायलकडून आणखी दोन 'फाल्कन' एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम (एवॅक्स) विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
✒️एवॅक्स सिस्टिमला आकाशातील भारताचे नेत्र असे म्हटले जाते.
✒️ही इस्रायली एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम रशियन बनावटीच्या इल्यूसीन-७६ विमानावर बसवण्यात येणार आहे.
✒️दोन नव्या फाल्कन सिस्टिमच्या समावेशानंतर भारताकडे असलेल्या एवॅक्सची संख्या पाच होईल.
✒️इंडियन एअर फोर्स आधीपासून अशा तीन सिस्टिम वापरत आहे. 
✒️भारताला पुढच्या तीन ते चार वर्षात इस्रायलकडून ही एवॅक्स सिस्टिम मिळेल

पोलीस भरती 2020 मराठी व्याकरण फ्री टेस्ट सोडवा.
_________________________________________________

निर्यात सज्जता निर्देशांक 2020’मध्ये गुजरात राज्यचा प्रथम क्रमांकावर झेप

महत्त्वाचे मुद्दे

✒️नीती आयोगाने (राष्ट्रीय परिवर्तन भारत संस्था) ‘निर्यात सज्जता निर्देशांक 2020’ (EPI 2020) जाहीर केला आहे.

✒️राज्यांच्या एकूण यादीतील पहिले तीन क्रमांक  - गुजरात, महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांचे आहे.

✒️भूपरिवेष्टित राज्यांच्या यादीतील पहिले तीन क्रमांक -- राजस्थान, तेलंगणा आणि हरियाणा यांचे आहे

✒️हिमालयी राज्यांच्या यादीत पहिले तीन क्रमांक  – उत्तराखंड, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश यांचे आहे

✒️केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत पहिले तीन क्रमांक – दिल्ली, गोवा आणि चंदीगड यांचे आहे
_________________________________________________

वेस्ट इंडिजचा ब्राव्होचा भीमपराक्रम! ‘असा’ विक्रम करणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू

महत्त्वाचे मुद्दे 

✒️वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो याने टी२० क्रिकेटमध्ये कोणालाही न जमलेला पराक्रम करून दाखवला.

✒️टी२० क्रिकेटमध्ये ५०० बळी टिपणारा ड्वेन ब्राव्हो हा जगातील पहिला खेळाडू ठरला.

✒️कॅरेबियन प्रिमियर लीग २०२० च्या सामन्यात ब्राव्होने सेंट ल्युसिया झोक्सचा फलंदाज रखीम कॉर्नवॉलला बाद करत ही कामगिरी केली.

✒️ब्राव्होने ५४९ टी२० सामन्यात ५०० बळी घेण्याची किमया साधली.

✒️आंतरराष्ट्रीय टी२० सामने आणि टी२० लीग स्पर्धा यांमध्ये मिळून ब्राव्होने हा पल्ला गाठला.

✒️टी२० क्रिकेटमधील सर्वाधिक बळींच्या यादीत ड्वेन ब्राव्होनंतर दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आहे.

✒️ब्राव्हो आतापर्यंत जवळपास २१ वेगवेगळ्या संघांकडून टी२० सामने खेळला आहे
_________________________________________________

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…