चालू घडामोडी सुपरफास्ट
दिनांक 29 ऑगस्ट 2000
✒मॅरिएक लुकास रिज्नेवेल्ड(नेदरलँड) यांना ️२०२० चे आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक यांच्या "The Discomfort of Evening" या कादंबरीस जाहीर.
✒️२०१९ साठी हा पुरस्कार "टॉमी वियरिंगा" यांना जाहीर झाला होता.
✒️भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय महिला व्यापार केंद्र (International Women Trade
Centre)कोझिकोडे येथे केरळ राज्य सरकार उभारणार आहे.
✒️प्रधान मंत्री जन-धन योजनेची सहा वर्षे पूर्ण झाले आहे.
✒️“प्रधान मंत्री जन-धन योजना (PMJDY) - वित्तीय समावेशनासाठीचे राष्ट्रीय अभियान” सादर करण्यात आली.
✒️(PMJDY) योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी दि. 28 ऑगस्ट 2014 पासून केली जात आहे.
✒️मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार - 2020 विजेती -मारिके लुकास रिजनेवेल्ड (नेदरलँड)
✒️ मारिके लुकास रिजनेवेल्ड (नेदरलँड) हा पुरस्कार मिळवणारी ती सर्वात कमी वयाची व्यक्ती ठरली आहे.
✒️ मारिके लुकास रिजनेवेल्ड यांचे पुस्तक -द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हनिंग या पुस्तकामध्ये एका कट्टर ख्रिश्चन समुदायातील एका शेतकरी कुटुंबाची कथा रेखाटण्यात आलेली आहे.
✒️चीन आणि पाकिस्तानपासून वाढता धोका लक्षात घेऊन भारताने अखेर इस्रायलकडून आणखी दोन ‘फाल्कन’ एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम (एवॅक्स) विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
✒️कु. सुधा पाईनुली यांची आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापना झालेल्या ‘एकलव्य मॉडेल निवासी शाळा’ (EMRS) याच्या शिक्षकाची प्रथमच ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
✒️पुढील महिन्याभरात इंटास फार्मा देशातील पहिली प्लाझ्मा थेरेपी लसीच्या माानवी चाचणीला सुरूवात करणार आहे.
✒️भारताच्या क्षमतेला आणि जागतिक शांततेला चालना देणे आणि त्याचबरोबर जागतिक अर्थव्यवस्था अधिक स्थिर ठेवण्यास मदत करणे हे आपल्या सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’चे लक्ष्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे सांगितले.
✒️जगभरातील करोनाबाधितांच्या एकूण मृत्यूंच्या संख्येतही भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
✒️ भारतात आतापर्यंत करोनामुळे ६२ हजार ६३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
✒️ पहिल्या स्थानावर अमेरिकेत करोनामुळे १ लाख ८५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे त्या खालोखाल दुसऱ्या स्थानावर ब्राझीलमध्ये १ लाख १९ हजार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
✒️अमेरिकेतील टेक्सासच्या बेलर कॉलेजऑफ मेडिसीन (बीसीएम) या संस्थेने करोनावरील लशीसाठी भारतातील बायोलॉजिकल ई लिमिटेड म्हणजे बीई कंपनीशी करार केला आहे.
✒️बीई कंपनीचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे.
✒️भारताचे माजी क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी यांचा शनिवार, २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते खेळ प्रोत्साहन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment