Friday, July 31, 2020

फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय तापनाभिकीय प्रायोगिक अणुभट्टी (ITER) येथे कार्याला प्रारंभ झाला

फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय तापनाभिकीय प्रायोगिक अणुभट्टी (ITER) येथे कार्याला प्रारंभ झाला

🔸28 जुलै 2020 रोजी फ्रान्समधील सेंट पॉल-लेझ-दुरांस या शहरात उभारलेल्या ITER टोकमॅकच्या असेम्ब्लीचे काम सुरु झाले. त्यानिमित्त फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी एक आभासी सोहळा आयोजित केला होता.

प्रकल्पाविषयी

🔸आंतरराष्ट्रीय तापनाभिकीय प्रायोगिक अणुभट्टी (इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लियर एक्सपिरिमेंटल रिएक्टर  - ITER) हा फ्रान्समध्ये एक मोठ्या प्रमाणावर केला जाणारा वैज्ञानिक प्रयोग आहे, ज्यामधून न्यूक्लियर फ्यूजनद्वारा व्यावसायिक पातळीवर ऊर्जा तयार करणे शक्य आहे. भारत, चीन, अमेरिका, रशिया, जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपीय संघ हे सात देश या प्रकल्पाचा भाग आहेत.

🔸न्यूक्लियर फ्यूजनद्वारा ऊर्जा निर्मिती करण्याच्या उद्देशाने फ्रान्समध्ये चालविणार्‍या आंतरराष्ट्रीय तापनाभिकीय प्रायोगिक अणुभट्टी (ITER) संशोधन प्रकल्पासाठी उपकरणे पुरविण्यात भारताने पुढाकार घेतला आहे. ITER-भारत प्रकल्प हा संपूर्ण प्रकल्पामधील एक भाग सिरिश देशपांडे यांच्या नेतृत्वात चालवला जात आहे. आतापर्यंत पुरविण्यात आलेल्या एकूण यंत्रसामुग्रीपैकी जवळजवळ 40 टक्के भार भारतातून आला आहे.

🔸भारत प्रकल्पाला त्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी, क्रायोस्टॅट, इन-व्हेसल शिल्ड्स, कुलिंग वॉटर,  क्रायोजेनिक आणि क्रायो-डिस्ट्रिब्यूशन प्रणाली, RF आणि बीम तंत्रज्ञान वापरून सहाय्यक हीटिंग उपकरणे,  मल्टिमेगा वॅट वीज पुरवठा आदी बाबींमध्ये भारताने भरीव योगदान देत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…