Thursday, September 10, 2020

Current affairs superfast 10 September 2020 in Marathi - चालू घडामोडी सुपरफास्ट 10 सप्टेंबर 2020


  चालू घडामोडी सुपरफास्ट  10 सप्टेंबर 2020

Current affairs superfast 10 September 2020 in Marathi




✒️ भारताद्वारे 10 नवीन पाणथळ स्थळांचा रामसर यादीत समावेश करण्यात आलेला आहे यापैकी महाराष्ट्राचे कोणते स्थळ आहे?
➡️नांदूर माधमेश्वर (महाराष्ट्रातील प्रथम रामसर स्थळ)

किशोपुर-बियानी, बियास, नांगल हे 3 पंजाबमधील / नवाबगंज, पर्वती-आग्रा, समान, समसपूर, संदी, सरसई / सध्या भारतात एकूण 37 पाणथळ स्थळांचा रामसर यादीत समावेश

✒️ पार्तुगालच्या ...... यांनी आंतरराष्ट्रीय गोलचं शतकं केला आहे.
➡️ख्रिस्तियानो रोनाल्डो

स्वीडनविरुध्दच्या सामन्यात नोंदवला 100 वा गोल /100 गोल करणारा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधला केवळ दुसरा खेळाडू / पहिला अली दाई  109, दुसरा रोनाल्डो   101 तिसरा दहारी  86.

✒️ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ......... यांना 2021 नोबेल शांतता पुरस्कासाठी नामांकन मिळालं आहे.
➡️डोनाल्ड ट्रम्प

इस्त्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमधील शांतता करारासाठी मध्यस्थी करुन दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

✒️ मोबाइलच्या ‘फाइव्ह जी’ तंत्रज्ञानाची यंत्रणा उभारण्यासाठी भारत, इस्रायल व ..... हे सहकार्य करणार आहेत.
➡️ अमेरिका  

मोबाइलच्या ‘फाइव्ह जी’ तंत्रज्ञानाची यंत्रणा उभारण्यात हुआवे या चीनच्या कंपनीला अमेरिका व भारतासह अनेक देशांनी वगळले असतानाच आता ही यंत्रणा उभारण्यासाठी भारत, इस्रायल व अमेरिका हे सहकार्य करणार आहेत.

✒️ नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी .......सध्या लागू होणार नाही, असं सांगत न्यायालयानं आरक्षणाच्या अंमलबजावणीला तूर्तास स्थगिती दिली आहे.
➡️मराठा आरक्षण 

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर झालेल्या सुनावणीत न्यायालयानं या खटल्याची सुनावणी मोठ्या खंठपीठाकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे.

✒️ ‘भारतीय रेडिओ-खगोलशास्त्राचे जनक’ अशी ख्याती असलेले, लहर-संवेदनांतून खगोल अभ्यास करणारे..........पुण्यात निवर्तले; 
➡️ प्रा. गोविंद स्वरूप सोमवारी (७ सप्टेंबर) 

खगोलशास्त्रातील त्यांचे कार्य ‘टाइप यू सोलर रेडिओ बर्स्ट’ यासारख्या शास्त्रीय भाषेत मांडणे गहन आणि अनेकांना अनाकलनीय ठरेल. पण सौरलहरींचे परावर्तन या अभ्यासविषयात त्यांचे संशोधन जगात मोलाचे मानले जाते. 

✒️ करोनावर लस उपलब्ध झाली तरी ती कुणाला, कशी व केव्हा उपलब्ध होणार हा सर्वात मोठा प्रश्न असून आता.........यात पुढाकार घेऊन लशीची खरेदी व पुरवठा याची जबाबदारी घेतली  आहे.
➡️ युनिसेफने 

‘दी युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड ’म्हणजे ‘युनिसेफ ’ही जगातील सर्वात मोठी लस खरेदी करणारी संस्था असून ते दरवर्षी विविध लशींचे 2 अब्ज डोस खरेदी करीत असतात.
ही संस्था आता ‘रिव्हॉल्विंग फंड ऑफ दी पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या मदतीने कोविड 19 लशींची खरेदी करणार आहे.

✒️ “.........या वर्षाच्या सुरुवातीला चांद्रयान-3 चंद्राच्या दिशेने झेपावेल. चांद्रयान-2 सारखी चांद्रयान-3 मोहिम असेल.
➡️ 2021

चांद्रयान-2 प्रमाणे चांद्रयान-3 तीन मोहिमेत लँडर, रोव्हर असेल पण ऑर्बिटर नसेल” केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्टेटमेंटमध्ये ही माहिती दिली.
 या ऑर्बिटरच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती वैज्ञानिकांना मिळत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…