MPSC | PSI STI ASO | पोलीस भरती | जिल्हा परिषद | तलाठी| ग्रामसेवक | रेल्वे | स्टाफ सिलेक्शन कमिशन | बँक |सर्व स्पर्धा परीक्षा
चालू घडामोडी ~ सुपरफास्ट ~ दिनांक 7 सप्टेंबर 2020
➡️करोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी, तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून आरोग्य शिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सांगितले.
➡️बलात्कारातून गर्भवती राहिलेल्या दोन मुलींना २३व्या आठवडय़ात गर्भपात करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली या मुली १३ आणि १६ वर्षांच्या आहेत.
➡️शासकीय नोकर भरती थांबवली नाही, पूर्वीप्रमाणेच भरती होणार – अर्थ मंत्रालय
➡️सरकारच्यावतीने घेतल्या जाणाऱ्या एसएससी, यूपीएससी, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड आदी प्रमाणे इतरही भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबवली जाणार आहे.
➡️Coronavirus: भारतानं ब्राझिलला टाकलं मागं; बनला जगातील दुसरा सर्वाधिक बाधित देश
➡️जगातील सर्वाधिक बाधित देशांच्या यादीत आता केवळ अमेरिकाच भारताच्या पुढे
➡️राज्यात गेल्या २४ तासांत करोना संसर्गाचे तब्बल २३ हजार ३५० नवे रुग्ण आढळले असून कालचा उच्चांक मागे पडून आज नवा उच्चांक नोंदवला गेला आहे.
➡️१९७३ मधील केरळ राज्य सरकार विरुद्ध केशवानंद भारती खटल्यातील मुख्य पक्षकार व केरळमधील कासरगोड एडनीर मठाचे शंकराचार्य केशवानंद भारती यांचं आज पहाटे निधन झालं.
➡️भारतीय नौदल आणि रशियाचे नौदल यांचा 11 वा द्वैवार्षिक संयुक्त सागरी सराव 4 आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आला आहे.
➡️“इंद्रा नेव्ही-20”चा मुख्य उद्देश दोन्ही नौदलामधले आंतर-संचालन अधिक दृढ करणे आणि बहु आयामी सागरी अभियानासाठी आकलन आणि पद्धती विस्तृत करणे हा आहे.
➡️पहिला, ‘निरभ्र आकाशासाठी स्वच्छ वातावरणाचा आंतरराष्ट्रीय दिवस (7 सप्टेंबर 2020) - "क्लीन एयर फॉर ऑल".
➡️या राज्याच्या वीज महामंडळाने ‘किफायती एलईडी बल्ब योजना’चा आरंभ केला असून त्यांच्या अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लोकांना बल्बचे वाटप केले जाणार - पंजाब.
➡️हे राज्य सरकार नागरिकांच्या आरोग्याच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी 15 सप्टेंबरपासून राज्यात ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम राबविणार आहे - महाराष्ट्र.
➡️या राज्यात पाच दिवस चालणाऱ्या 26 व्या ‘OMC गुरू केलूचरण महापात्रा पुरस्कार महोत्सव 2020’चे ऑनलाईन उद्घाटन 5 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आले - ओडिशा.
➡️या संस्थेच्या संशोधकांनी फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी एक उपचार पद्धत विकसित केली - जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर एडवांस्ड सायंटिफिक रिसर्च (बेंगळुरू).
➡️या गणितज्ञांनी डोडेकेड्रॉन (भूमिती आकार) यावरील छेदल्या न जाणाऱ्या मार्गांविषयी एक मूलभूत प्रश्न सोडविला - जयदेव अत्रेय, डेव्हिड ऑलिसिनो आणि पॅट्रिक हूपर.
➡️3D सिस्मिक माहितीचे स्वयंचलितपणे अर्थ लावण्यासाठी या संस्थेच्या वैज्ञानिकांनी न्यूरल तंत्राच्या आधारे (मशीन लर्निंग आधारित) एक पद्धत तयार केली - वाडीया इंस्टीट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजी (देहरादून).
➡️हॅमबर्ग शहरात झालेल्या ‘2020 ट्रायथलॉन वर्ल्ड चॅम्पियनशिप’ स्पर्धेच्या महिलांच्या शर्यतीची विजेती - जॉर्जिया टेलर-ब्राउन (ब्रिटन).

No comments:
Post a Comment