20 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी
राज्य विशेष
📝विधवा महिलांच्या कल्याणासाठी ‘अभयकिरणम्’ योजनेला या राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली - केरळ.
📝या ठिकाणी संरक्षण उपकरणांसाठी पहिल्या औद्योगिक प्रकल्पाची स्थापना करण्यासाठी छत्तीसगड सरकारचा उद्योग विभाग आणि एटमास्टको लिमिटेड कंपनी यांच्यात एक सामंजस्य करार झाला - बीरेभांट खेडा, दुर्ग जिल्हा.
_________________________________________________
राष्ट्रीय
📝समानता आणि परस्परसंवाद तत्वांवर आधारित मानकीकरण व अनुरुप आकलन या क्षेत्रात सहकार्यासाठी या संस्थेनी भारतीय मानक विभाग (BIS) सोबत एक सामंजस्य करार केला - भारतीय तंत्रज्ञान संस्था, रुडकी.
📝भारताचे प्रथम दस्तऐवज संग्रहालय – बीकानेर येथे राजस्थान स्टेट आर्काइव्ह्ज संस्थेच्या आवारात.
📝केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेली बहु-संस्था मंडळ जे ‘ब’ आणि ‘क’ श्रेणी (अतांत्रिक) पदांसाठी उमेदवारांची छाटणी करण्यासाठी ‘सामान्य पात्रता परीक्षा (CET)’ घेणार - राष्ट्रीय भरती संस्था (NRA).
📝कोविड योद्ध्यांचे आरोग्य राखण्याच्या उद्देशाने, ‘आयुरक्षा’ हा अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) आणि या विभागाचा एक संयुक्त उपक्रम आहे - दिल्ली पोलीस.
_________________________________________________
आंतरराष्ट्रीय
📝नाझी होलोकॉस्ट घटनेच्या 75 वर्षांहून अधिक काळानंतर, या देशाच्या आणि जर्मनीच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी 18 ऑगस्ट रोजी जर्मनीमध्ये प्रथमच एकत्र उड्डाण केले - इस्रायल.
_________________________________________________
संरक्षण
📝19 ते 21 ऑगस्ट 2020 रोजी या शहरात ‘नौदल कमांडर परिषद’ आयोजित करण्यात आली आहे - नवी दिल्ली.
1.15 लक्ष कोटी डॉलर एवढ्या रकमेसह जगातला सर्वात मोठा सार्वभौम संपत्ती कोष, ज्याची जागतिक पातळीवर सुमारे 9200 कंपन्यांमध्ये हिस्सेदारी आहे जे सर्व सूचीबद्ध समभागांपैकी 1.5 टक्के मालकी ठेवते - नॉर्वे.
_________________________________________________
व्यक्ती विशेष
📝भारतीय खते संघ, दक्षिण विभाग (FAI SR) याचे नवे अध्यक्ष - किशोर रुंगटा.
_________________________________________________
दिनविशेष
📝जागतिक छायाचित्रण दिन – 19 ऑगस्ट.
_________________________________________________
सामान्य ज्ञान
📝केंद्रीय विद्युत नियमन आयोग (CERC) - स्थापना: 24 जुलै 1998; मुख्यालय: नवी दिल्ली.
📝दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन (DVC) - स्थापना: 07 जुलै 1948; मुख्यालय: कोलकाता.
📝केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) - स्थापना: वर्ष 1941; मुख्यालय: नवी दिल्ली.
📝भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था (IREDA) - स्थापना: 11 मार्च 1987; मुख्यालय: नवी दिल्ली.
📝लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी – स्थापना: वर्ष 1959; स्थळ: मसूरी, उत्तराखंड.
📝कर्मचारी निवड आयोग (SSC) - स्थापना: 4 नोव्हेंबर 1975; मुख्यालय: नवी दिल्ली.
_________________________________________________

No comments:
Post a Comment