Sunday, August 16, 2020

16 ऑगस्ट 2020 अतिशय महत्वाचे चालू घडामोडी /16 August 2020 very important current affairs

16 ऑगस्ट 2020 अतिशय महत्वाचे चालू घडामोडी 

राष्ट्रीय
        भारत सरकारचा पुढाकार ज्याच्या अंतर्गत देशातल्या प्रत्येक व्यक्तीला डिजिटल ‘हेल्थ आय.डी.’ दिले जाणार - राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान.

शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व विषयी जनजागृती करण्यासाठी तरुणाईला एकत्र आणण्याच्या उद्देशाने युवा कल्याण व क्रिडा मंत्रालयाने 15 ऑगस्ट रोजी आरंभ केलेला देशव्यापी उपक्रम - फिट इंडिया युथ क्लब.

हे राज्य 12 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीच्या प्रस्तावासह देशातले पहिल्या क्रमांकाचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास आले आहे - ओडिशा.

देशभरातल्या शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण आणि नवसंशोधनाला चालना देण्यासाठी नॅसकॉम संस्थेच्या सहकार्याने अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग यांनी 15 ऑगस्ट रोजी आरंभ केलेला उपक्रम - ‘ATL AI स्टेप अप मॉड्यूल’.

जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी या शहरात ‘बायोफार्मा अ‍ॅनालिसिस सेंटर’ (CBA) याचे उद्घाटन केले – पुणे, महाराष्ट्र.

गंगा डॉल्फिनच्या संवर्धनासाठी पर्यावरण, वन आणि हवामानातले बदल मंत्रालयाचा 10 वर्षांचा प्रकल्प - 'प्रोजेक्ट डॉल्फिन'.

आंतरराष्ट्रीय
शिक्षक प्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, पोलीस प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये हे राज्य सरकार अमेरिकेमधील पेनसिल्व्हानिया राष्ट्रकुल सोबत सहकार्य करणार आहे - कर्नाटक.

मॉरिटानिया देशाचे नवीन पंतप्रधान - मोहम्मद औल्द बिलाल.

पहिला पारसी आखाती देश व इजिप्त आणि जॉर्डन यांच्यानंतरचा तिसरा अरब देश ज्याने ‘अब्राहम शांती करारावर स्वाक्षरी केली - संयुक्त अरब अमिराती.

अर्थव्यवस्था
ऑनलाइन गुंतवणूकदार शिक्षण संसाधन केंद्र, जे NSE इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड ट्रस्ट आणि ही संस्था यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे - भारतीय व्यवस्थापन संस्था, बेंगळुरू.

व्यक्ती विशेष

ऑगस्ट 2020 पासून निर्यात अभिमुख एकक (EOU) आणि विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) यांच्यासाठीचे निर्यात विकास परिषद’ (EPCES) याचे नवीन महासंचालक - आलोक वर्धन चतुर्वेदी.

राज्य विशेष

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या शहरात भारत मातेच्या 37 फूट उंच कासेच्या पुतळ्याचे अनावरण केले - भोपाळ, मध्यप्रदेश.

या राज्य सरकारने 15 ऑगस्ट रोजी ‘______ आव्हान उद्योजकता कार्यक्रम’चा आरंभ केला - अरुणाचल प्रदेश.

या राज्य सरकारने स्थानिक व्यापार आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी विकसित केलेला ‘यलो चेन’ नामक एकल खिडकी ई-वाणिज्य मंच कार्यरत केला - नागालँड.

BSE (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) या संस्थेनी भांडवल उभारण्यासाठी स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन आणि समर्थन देण्याच्या हेतूने या राज्य सरकारने स्थापना केलेल्या आयहब नामक इनक्युबेटर केंद्रासोबत करार केला – गुजरात.

ज्ञान-विज्ञान

या संस्थेनी 3 किलोमीटरच्या क्षेत्रात उडणारे सूक्ष्म ड्रोन शोधून काढू शकणारी आणि लेजर तंत्राचा वापर करून एक ते अडीच किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रातले ड्रोन निष्क्रिय करू शकणारी ‘ड्रोन-रोधी’ प्रणाली विकसित केली आहे – संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO).

सामान्य ज्ञान

प्रामुख्याने गंगा आणि ब्रह्मपुत्र नद्यांमध्ये आढळणारी गोड्या पाण्यातली डॉल्फिन प्रजाती - प्लॅटनिस्टा गंगेटिका गंगेटिका (गंगेटिक रिव्हर डॉल्फिन).

या साली भारतीय पोलीस सेवाने (IPS) भारतीय शाही पोलीसांची जागा घेतली - वर्ष 1948.

गुप्तचर विभाग (IB) - स्थापना: वर्ष 1887; मुख्यालय: नवी दिल्ली.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) - स्थापना: 10 मार्च 1969; मुख्यालय: नवी दिल्ली.

राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) याची स्थापना - 15 ऑक्टोबर 1984.

राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभाग (NCRB) याची स्थापना - 11 मार्च 1986.

राष्ट्रीय अन्वेषण विभाग (NIA) याची स्थापना - 31 डिसेंबर 2008.
अमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) याची स्थापना - 17 मार्च 1986.


No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…