Tuesday, July 28, 2020

सर्वोच्च न्यायालयात आज तीन महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावण

सर्वोच्च न्यायालयात आज तीन महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावण

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🔸पदवी परीक्षा - मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात युवासेनेसह देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर  सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. आयोगाच्या निर्णयाला देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थी आणि संघटनांनी आव्हान दिले. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

🔶मराठा आरक्षण - नवी दिल्ली : मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे. मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षणाचा कायदा करण्यात आला. उच्च न्यायालयाने मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात १२ टक्के व सरकारी नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षण देण्याचा आदेश दिला. त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

🔸राजस्थान सत्तापेच - जयपूर : राजस्थानमधील सत्तापेच कायम आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होईल. दरम्यान, विधानसभेचे अधिवेशन ३१ जुलैला बोलावण्याची विनंती करणारा सुधारित प्रस्ताव मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे शनिवारी रात्री पाठवला. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी १८ आमदारांसह बंडखोरी केल्यामुळे हा सत्तापेच निर्माण झाला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…