Wednesday, July 29, 2020

चालू घडामोडी 2020/BelYo”: भारताचे पहिले ‘कोविड-19 ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म’

“BelYo”: भारताचे पहिले
 ‘कोविड-19 ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म’

🔸“BelYo” या नावाने भारताचे पहिले ‘कोविड-19 ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म’ तयार करण्यात आले आहे.

🔸भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी (ICMR) मान्यता दिलेल्या 730 शासकीय प्रयोगशाळा आणि 270 खासगी प्रयोगशाळांपर्यंत पोहोचणे आणि माहिती गोळा करणे हे हा मंच तयार करण्यामागचे उद्दीष्ट आहे.

ठळक बाबी

🔸हा मंच भौतिक स्वरूपात असलेली नागरिकांची कोविड-19 संबंधित वैद्यकीय आणि लसीकरण माहिती डिजिटल स्वरूपात रूपांतरित करतो, जी रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणाऱ्या आरोग्य सेतूसारख्या कोणत्याही अॅपमार्फत पुनर्प्राप्त केली जाऊ शकते.

🔸एखादी व्यक्ती क्यूआर कोडच्या मदतीने स्वतःचे परीक्षण करू शकते आणि त्यासंबंधीची माहिती पुनर्प्राप्त करू शकते, ज्यामुळे प्रक्रिया 100 टक्के संपर्क-विरहित होते.

🔸हा मंच बेलफ्रिक्स बीटी ही कंपनी, बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेच्या (IISc) संगोपनाखाली असलेली योसिंक ही स्टार्टअप कंपनी यांनी संयुक्तपणे विकसित केला आहे.

🔸याच्या विकासासाठी एमफॅसिस एफ1 फाउंडेशन या संस्थेनी वित्तपूरवठा केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…